बॅक फ्रॉड्स (Bank Frauds)
कोर्ट पैरवी अधिकारी
बॅक फ्रॉड्स:– डेबीट कार्ड/क्रेडीट कार्ड माहिती किंवा पिन/पासवर्डची माहिती गैरमार्गाने, मिळवून त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृतपणे वापर करुन फसवणून करणे.
- फिर्यादी व्यक्ती कडून त्याचे बॅक खात्याचे स्टेटमेंट(ज्या मध्ये संदिग्ध व्यवहाराची नोंद स्पष्ट दिसेल) प्राप्त करुन घेणे. (भारतिय पुरावा कायदा चे कलम 65(ब) चे प्रमाणपत्र घ्यावे.)
- बॅक खात्याचे स्टेटमेंट वरुन बॅक ट्रान्झेक्शन कोणत्या प्रकारे झाले आहे याची माहिती घेणे.
- Online देवान-घेवान झाले असल्याचे दिसून आल्यास संबधित बँकेकडून संशयित व्यवहाराचे I.P. Address with Date and Time ची माहिती प्राप्त करुन घेणे. (भारतिय पुरावा कायदा चे कलम 65(ब) चे प्रमाणपत्र घ्यावे.)
- बॅक खात्याचे स्टेटमेंट वरुन (ATM Withdrawal) निकासी झाले असल्याचे दिसून आल्यास, किंवा ATM वरुन Withdrawal झाले असल्याचे निदर्शनास आल्यास, CCTV Footage प्राप्त करणे, त्या वरुन आरोपीचा शोध घेणे. (भारतिय पुरावा कायदा चे कलम 65(ब) चे प्रमाणपत्र घ्यावे.)
- बॅक खात्याचे स्टेटमेंट वरुन (ATM CARD/DEBIT CARD वापरुन) Card Swipe झाले असल्याचे दिसून आल्यास संबधित बँकेकडून संबंधित दुकानदाराचे पुर्ण विवरण (Merchant Details) प्राप्त करणे. त्यावरुन आरोपीचा शोध घेणे. (भारतिय पुरावा कायदा चे कलम 65(ब) चे प्रमाणपत्र घ्यावे.)
- अन्य बॅक खात्यात रक्कम ट्रान्सफर झाली असल्यास त्या लाभार्थी बँक खात्याची वर नमूद प्रमाणेच माहिती प्राप्त करणे.
- Onilne Transaction चे बाबतीत संबधित बँकेकडून प्राप्त झालेले I. P. Address with Date and Time हे संबधित Internet ServiceProvider यांना पाठवून त्याचे Physical Location माहिती करुन घेवुन तेथील संबधित संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व ते वापरणारा आरोपी निश्चित करुन त्यास अटक करुन पुढील तपास करणे. (भारतिय पुरावा कायदा चे कलम 65(ब) चे प्रमाणपत्र घ्यावे.)
- गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय मिळणेसाठी पाठविणे.
- साक्षीदारांचे जबाब नोंदविणे.
- गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.