सोशल नेटवर्कींग चा वापर करुन केलेले गुन्याचा तपास

सोशल नेटवर्कींग चा वापर करुन केलेले गुन्याचा तपास

सोशल नेटवर्कींग वरुन अश्लिल,  घाणेरडे, अपमानकारक, धमकीचे, अभद्र, बदनामीकारक मेसेज केले जातात, खंडणी मागितली जाते, पैश्याचे अमिष दाखवून लुबाडले जाते… (सोशल नेटवर्कींग साईट्स उदा. फेसबुक, ट्विटर इत्यादीवर पोष्ट करणे अथवा प्रसारीत करणे.)

  • अश्लिल बदनामीकारक मेसेजेसचे प्रिंटआउट्स फिर्यादी कडून प्राप्त करुन घेणे. (फिर्यादीचे या बाबतचे भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
  • अश्लिल बदनामीकारक मेसेजेस बाबत संबधित Social Networking Site ( SNS) प्रोव्हायडर यांच्या कडून I.P. Address with Date and Time सह प्राप्त करुन घेणे. (Social Networking Site ( SNS) प्रोव्हायडर यांच्या कडून  या बाबतचे भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
  • त्यानंतर प्राप्त झालेले IP Address with Date and Time हे संबधित Internet Service Provider (ISP) यांना पाठवून त्याचे Physical Address प्राप्त करुन घेणे. (फिर्यादीचे या बाबतचे भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
  • ISP यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती म्हणजेच Physical Address येथे प्रत्यक्ष भेट देवून तेथील संबधित संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व संशयित आरोपी निश्चित करुन आवश्यकते नुसार अटक करणे.
  • गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय अहवाल मिळणेसाठी पाठविणे.
  • साक्षीदारांचे जबाब नोंदविणे.
  • गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.

सायबर क्राईम गुन्ह्याचे तपासाबाबत तपासी अधिकारी करिता, काही मुद्दे..

टीप :-

  1. सोशल मीडिया चे ऑफिस किंव्हा ISP चे ऑफिस सोबत करायचा पत्रव्यवहार आपल्या जिल्ह्याच्या सायबर सेल शाखेमार्फत करावा, आणि तपासी अंमलदार ने जिद्दीने पाठपुरावा करणे महत्वाचे.
  2. अश्या गुन्ह्यातील आरोपीचे लोकेशन भारतभर कुठेही दिसतात. (खासकरून दिल्ली मधील गुडगाव, दिल्लीचे  बाजूला लागून असलेले राज्य उदा. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, तसेच कलकत्ता, मध्य प्रदेश  इत्यादी.) त्यामुळे साहजिकच तपासी अधिकारी चे मनात संभ्रम निर्माण होतो. पण मनाने खचून न जाता निवडक आणि कामाचे पुरावे शोधता आले पाहिजत. तपासी अधिकारी SDR मध्ये मिळालेल्या सर्व पत्यावर फिरत राहिला तर गुन्ह्याचे (फायनल चे) कागदपत्र वाढणार, बाकी फलश्रुती काही होणार नाही.
  3. तपासी अधिकारी ने वेळेत तपास केला, योग्य पुरावे निवडले, आणि तपासला वेळ दिला तर आरोपी पर्यंत निश्चितच पोहचता येते. (सायबर सेल ची साथ महत्वाची)
  4. या गुन्ह्यात मिळणारे पुरावे कागदोपत्री ठोस असतात.
  5. तुमच्या कडे तपासला आलेल्या गुन्हा वरून गुन्हा जरी 10 – 15 हजाराचा, 1 लाख 2 लाखाचा आणि किरकोळ वाटत असला, तरी आरोपी किरकोळ नाही हे लक्षात घ्या. त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करून तुमच्या फिर्यादी सारख्या अश्या अनेक सामान्य लोकांना लुटले आहे, आणि तो फक्त लुटलेल्या पैश्याचे भरोश्यावर करोडपती झाला आहे  हे लक्षात घ्या. त्याला न्यायालयाचे समोर आणणे महत्वाचे आहे.
  6. इतर जिल्ह्यातील सायबर सेल चे संपर्कात रहा, त्या आरोपीने सारख्या फोन, लॅपटॉप, नावाचा चा वापर करीत, बाकी जिल्ह्यातील सामान्य लोकांना पण लुटल्याचे पुरावे मिळतील. (एकमेकांचे तपासा बाबत चर्चा झाल्यास common पुरावे शोधता येतात. महत्वाचे पुरावे निवडणे आणि आरोपीचे नाव fix करणे सोपे जाते.)
  7. IT Act च्या कायद्याचे खाजगी मोबाईल ॲप ची लिंक आपणास पुरवीत आहोत. (तपासी अधिकारी ने आवर्जून संग्रही ठेवावे असे आहे. नक्की download करा.) https://play.google.com/store/apps/details?id=in.psdike.itact

Leave a Comment