CRO-Control Room Officer नियंत्रण कक्ष अधिकारी
CRO - Control Room Officer (नियंत्रण कक्ष अधिकारी)
प्रत्येक पोलिस अधिक्षक कार्यालयात एक पोलीस नियंत्रण कक्ष असतो.
- नियंत्रण कक्ष अधिकारी CRO, म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याची, पोलीस अधीक्षक नेमणूक करतात.
- या सोबतच इतर सहाय्यक पोलीस अधिकारी सुद्धा पोलीस नियंत्रण कक्ष अधिकारीचे मदतीला असतात.
- नियंत्रण कक्ष येथील सर्व कामकाज सुरळीत चालावे यासाठी CRO जबाबदार असतात.
- CRO office मध्ये पोलीस स्टेशन प्रमाणेच एक स्टेशन डायरी ठेवलेली असते, CRO OFFICE हे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रण कक्ष असल्याने त्या स्टेशन डायरीत जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व महत्वाच्या घटनांची नोंद घेतली जाते.
CRO ने सांभाळायचे दप्तर.
- DCR – Daily Crime Register,
- जिल्हा आरोपी अटक रजिस्टर,
- जिल्हा रात्रगस्त रजिस्टर,
CRO ने रोज करायचा पत्रव्यवहार.
- DCR – Daily Crime Report.
- पोलीस स्टेशन वरून येणारे स्पेशल रिपोर्ट.
- वरिष्ठ अधिकारी चे आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी ईमेल/फॅक्स/फोन संपर्क करणे.
वरिष्ठ अधिकारी नी सोपवलेली इतर कामे.
- (MERS) एम.ई.आर.एस./डायल 112 वर येणारे कॉल वर नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा पातळीवरील नाकाबंदी समन्वय ठेवणे.
- जिल्हा पातळीवरील बिनतारी संदेश.
- इतर आदेश वरिष्ठ अधिकारी चे आदेशानुसार निर्गमित करणे.
पोलीस नियंत्रण कक्ष अधिकारी यांचे सर्वसाधारण कर्तव्य.
- नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून नेहमी एक अधिकारी कर्तव्यावर असेल या प्रमाणे अधिकाऱ्यांचे ड्युटीचे नियोजन करावे.
- नियंत्रण कक्ष येथील सर्व दुरध्वनी व मोबाईल फोन चालु स्थितीत आहे याची खात्री करावी. बंद असल्यास तो चालु करण्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी.
- दंगा नियंत्रण पथकात अंमलदार हजर राहतील याची खात्री करुन त्यांची नियमीत दोन वेळा गनना (गिनाती) घेण्यात यावी.
- दंगा नियंत्रण पथकातील सर्व अंमलदार कायदा व सुव्यवस्थाच्या प्रसंगी कुठलाही वेळ न गमावता त्वरीत सर्व साहित्यानिशी रवाना होईल या दृष्टिने वरिष्ठ अधिकरिनी आदेशित केल्या प्रमाणेचे वेळे करिता नियंत्रण कक्ष येथे हजर व सतर्क राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच या व्यतिरीक्त इतर कालावधीचे वेळी गरज असल्यास लागलीस सर्व अंमलदारांना एकत्र करुन रवाना करावे.
- (MERS) एम.ई.आर.एस./डायल 112 वर येणारे कॉल मध्ये जातीय तणावाचे/घटनांचे / धार्मीक स्थळ विटंबनाचे/ धार्मीक तणाव वाढविणारे सोशल मिडीयावरील पोस्ट बाबत / कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या कोणतेही घटने संदर्भातील कॉल आल्यास त्वरीत पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना माहिती देवून सतर्क करावे.
- अतिमहत्वाचे व्यक्ती यांचा दौरा/ मिरवणुका / धरणे आंदोलने / निवडणुका ई. कोणत्याही पुर्वनियोजीत बंदोबस्त करीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार हे किमान बंदोबस्ताचे 02 तास आधी बंदोबस्त चे ठिकाणी पोहचतील याची खात्री करावी.
- अचानक घडलेल्या घटनांनमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ ती माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देवुन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुचणे प्रमाणे नजीकच्या पो.स्टे. चा स्टॉफ / आर.सी.पी./ अग्निशमन पथके/ रूग्णवाहिका इत्यादी. प्रभारी अधिकारी यांचे मागणी प्रमाणे व आवश्यकते प्रमाणे रवाना करावे.
- जिल्ह्यातून अचानक मागणी केल्यास मिळू शकेल अश्या बंदोबस्त स्टाफ ची माहिती तक्ता चे स्वरूपात CRO येथे आगावू मिळवून ठेवावी. या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अगोदरच चर्चा करून ठेवावी. जिल्ह्यातून ऐन वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, जिल्ह्यातील कुठल्या पो.स्टे. कडे बोट उपलब्ध आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन ला पोहणारे किती जवान व सार्वजनिक कार्यकर्ते उपलब्ध आहेत. याची माहिती जमवून ठेवावी. तसेच जिल्ह्यातील सर्प मित्र, प्राणीमित्र, यांची माहिती तक्ता स्वरूपात पोस्ट प्रमाणे जमा करून ठेवावी.
अचानक उदाभवणाऱ्या घटनात, CRO - Control Room Officer नियंत्रण कक्ष अधिकारी ची भूमिका.
कुठल्याही कारणाने अचानक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही..
- नियंत्रण कक्ष येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाचा चार्ज स्वतः कडे घ्यावा. व नियंत्रण कक्ष येथून सर्व सुचना निर्गमित कराव्यात.
- ज्या कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या कारणाची माहिती घ्यावी, तसेच सदर प्रश्न हाताळण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असणारे अधिकारी व पोलीस स्टाफ यांची माहिती घेऊन त्वरीत १) पोलीस अधीक्षक, २) अपर पोलीस अधीक्षक, ३) उपविभागीय पोलीस अधिकारी. ४) पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा. ५) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला याबाबत अवगत करुन सतर्क करावे.
- कायदा व सुव्यवस्था प्रश्न अचानक निर्माण झाला असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना माहिती देवून त्या ठिकाणी बिट मार्शल व पोलीस स्टेशनचा स्टाफ त्वरीत रवाना करावा.
- आणीबाणीच्या अश्या प्रसंगी पो.स्टे. ला उपलब्ध स्टाफची संख्या व अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे का? याची माहिती संबंधीत प्रभारी अधिकारी कडून घेऊन, स्टाफ ची मागणी असल्यास वरिष्ठ अधिकारी व पो.नि. जि.वी.शा. यांना माहिती द्यावी. वरिष्ठ अधिकारीच्या आदेश प्रमाणे नजिकच्या पोलीस स्टेशनचा पोलीस स्टाफ त्वरीत रवाना करावा. (कोठल्या पोलीस स्टेशन, किंव्हा ऑफीस मधून किती स्टाफ रवाना केला याच्या नोंदी CRO च्या स्टेशन डायरीला घ्याव्यात.)
- घटनास्थळी बंदोबस्त रवाना करण्याबाबत नजिकचे पोलीस स्टेशनला सुचित केल्याचे तसेच त्या पोलीस स्टेशनने बंदोबस्त रवाना केल्याचे व घटनास्थळी बंदोबस्त पोहचल्याची नोंद स्टेशन डायरीला घ्यावी.
- नियंत्रण कक्ष येथे हजर असलेले दंगा नियंत्रण पथक (RCP आर.सी.पी.) सर्व साहित्यानिशी हजर आहे याची खात्री करुन, वरिष्ठ अधिकारी च्या आदेश प्रमाणे बंदोबस्तकरीता रवाना करावे.
- घटनास्थळी जाणारा नजिक पो.स्टे. चा पोलीस स्टाफ हा शासकिय वाहनानेच रवाना होईल याची दक्षता घ्यावी.
- पोलीस अधीक्षक कार्यालय मधील सर्व शाखा प्रभारी अधिकारी तसेच राखीव पोलीस निरीक्षक,(RPI) पोलीस मुख्यालय, यांना संपर्क करुन त्यांच्या अधिनस्त सर्व पोलीस स्टाफ बंदोबस्ताचे तयारीनिशी तात्काळ हजर ठेवण्यास सांगावे.
- पोलीस निरीक्षक, मोटार परीवहन विभाग, (MTO) यांना बंदोबस्त करीता वाहन व चालक पर्याप्त संख्येत उपलब्ध करणेबाबत सुचित करावे.
- सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पो.नि. मोटार परीवहन विभाग, रा.पो.नि. पोलीस मुख्या. यांना सुचित केल्याबाबतची नोंद स्टेशन डायरीला घ्यावी.
- घटनास्थळी जाळपोळ होत असल्यास नजिकच्या ठिकाणचे अग्नीशमन वाहने, वरिष्ठ अधिकारिंना सूचित करून घटनास्थळी पाठवावे.
- घटनास्थळावरील परिस्थिती सांभाळताना पो.स्टे. प्रभारी अधिकारी व ईतर वरीष्ठ अधिकारी बंदोबस्तात व्यस्त राहत असल्याने नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी दुय्यम अधिकारी यांना संपर्क करुन संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट व परिसरात दुय्यम अधिकाऱ्यांना पेट्रोलींगसाठी रवाना करावे व फिक्स पॉईंट बंदोबस्त तसेच पेट्रोलींग सुरु झाल्याची खात्री करावी. त्याबाबत स्टेशन डायरीला नोंद करावी.
- जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व उपविभागीय अधिकारी (SDM/SDO) यांची नावे व मोबाईल क्रमांक यादी नियंत्रण कक्ष येथे ठेवून अशा घटनांची माहिती संबंधीत तहसिलदार व एस.डी.एम. यांना त्वरीत देऊन त्याबाबत स्टेशन डायरीला नोंद घ्यावी.
- घटनास्थळा चे ठिकानची वाहतूक व्यवस्था बिघडली असल्यास पो.नि. वाहतूक शाखा यांना त्वरीत अवगत करावेत.
- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळतांना पोलीसांकडून बळाचा वापर झाला असल्यास त्याची त्वरीत माहिती वरीष्ठ अधिकारी यांना तसेच IG व DG (Control) आय.जी. व डि.जी. कंट्रोल यांना द्यावी.
- कायदा व सुव्यवस्थाच्या घटनेमध्ये जखमी यांना उपचारासाठी ज्या ठिकाणी हलविण्यात आले तेथील प्रभारी अधिकारी किंवा इतर घटकातील असल्यास तेथील नियंत्रण कक्षास माहिती द्यावी.
- कायदा व सुव्यवस्था प्रश्न हाताळतांना जखमी झालेल्या नागरीकांची व पोलीसांची संख्या व ईतर माहिती तसेच झालेल्या वित्तीय हाणीची माहिती वरीष्ठांना द्यावी.
- घटनास्थळी व परीसरात जाळपोळ दगडफेक सुरु असल्याची माहिती असल्यास त्वरीत त्याबाबत राज्य परीवहन महामंडळाला (ST Bus महामंडळ) याांना सुचित करावे.
- घटनास्थळी तणाव अगर शांतता आहे तशी माहिती वेळोवेळी घेऊन वरीष्ठांना पुरवावी.
- कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळल्यानंतर संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त लावला गेला असल्याची खात्री करावी.
- पोलीस स्टेशन व्हिडीओग्राफर (अंमलदार) घटने बाबत किंवा त्यानंतरच्या परिस्थिती बाबत व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत असल्याची खात्री करावी.
- घटनेचे पडसाद इतरत्र उमटले असल्यास त्वरीत पोलीस अधीक्षक / अपर पोलीस अधीक्षक / संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी / पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांना माहिती द्यावी व त्या ठिकाणी वरील प्रमाणे कार्यवाही करून पूर्तता करावी.
परिसरात जातीय दंगल झाल्यास नियंत्रण कक्ष ची भूमिका..
- ज्या कारणावरून जातीय दंगल घडली त्या कारणाची माहिती करून घ्यावी. कोण-कोणत्या जाती / धर्माच्या नागरीकांमध्ये दंगल झाली आहे, जमावाला कोणी भडकाविण्याचे काम केले असल्यास त्याचे नाव माहिती करून घ्यावे तसेच / घटनास्थळी किंवा पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ पोहचला अगर कसे? याची माहिती घ्यावी.
- उपरोक्त माहिती त्वरित १) पोलीस अधीक्षक, २) अपर पोलीस अधीक्षक, ३) उपविभागीय पोलीस अधिकारी. ४) पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा. ५) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना त्वरीत द्यावी.
- वरील सर्व आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ राबवायच्या योजने प्रमाणे कार्यवाही करावी.
- अशा ठिकाणी राजकिय पदाधिकारी नेते जाणार असल्याची माहिती मिळाल्यास वरीष्ठांना सदरची माहिती तात्काळ द्यावी.
- दंगलीमधील किती आरोपी ताब्यात घेतले याबाबतची माहिती घ्यावी.
जातीय गुन्हे / जातीय एनसी दाखल झाल्यास नियंत्रण कक्ष अधिकारीनी करायची कार्यवाही.
- जातीय गुन्हा घडलेल्या घटनास्थळाची, त्यामध्ये सहभागी व्यक्ती / आरोपींची तसेच ज्या भिन्न समाजामध्ये गुन्हा घडला त्याबाबत, घटनेच्या कारणांसह संपुर्ण माहिती स्थानिक प्रभारी अधिकारी यांचे कडुन प्राप्त करावी.
- घडलेल्या गुन्हयाबाबत माहिती संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक (जिल्हा विशेष शाखा) यांना देण्यात यावी.
- गुन्हयाचे घटनास्थळी पो.स्टे. प्रभारी यांनी कधी व कीती वेळ भेट दिली याची माहिती द्यावी. घटनास्थळी व परिसरात फिक्स पॉईट व पेट्रोलींग बंदोबस्त नेमले बाबत खात्री करावी.
- गुन्हयाची प्रतिक्रीया आजुबाजुचे परिसरात उमटले किंवा कसे व त्याचे स्वरूप काय याची माहिती घेवुन वरिष्ठांना दयावी. (शक्यतो घटनाचा तक्ता तयार करून माहिती घ्यावी.)
- गुन्हयाची परिस्थीती हाताळतांना संबंधीत पो स्टे प्रभारी अधिकारी यांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असले बाबत विचारणा करून गरजे नुसार वरिष्ठ अधिकारी व DSB अधिकारी चे सुचणे प्रमाणे नजिकचे पो.स्टे.मधुन बंदोबस्त रवाना करावा.
- वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याची व भेट दिल्याची नोंद स्टेशन डायरीला करावी. गुन्हयाचा स्पेशल रिपोर्ट प्राप्त करून त्यामध्ये ठाणेदार, इतर वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिल्याची व संपविल्याची वेळ नमुद करावी.
- जातीय गुन्हे अन्वेषण दरम्यान “गुन्हयातील आरोपी अटकेबाबत माहिती प्राप्त करावी.
- पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना नेहमी संपर्क करून घटनास्थळावरील परिस्थीतीची अद्यावत माहिती नियमीत घ्यावी. त्याच्या नोंदी स्टेशन डायरीला घ्यावेत.
कोणत्याही समाजाच्या धार्मीक भावना दुखविणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर येवुन त्याविरोधात जमाव एकत्र आल्यास नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
- अशी पोस्ट कोणत्या समाजाची धार्मीक भावना दुखविणारी आहे याची माहिती घेवुन त्याकरीता जमलेला जनसमुदाय, ठिकाण नेतृत्व करणाऱ्याचे नांव ईत्यादीची माहिती घेवुन त्वरीत १) पोलीस अधीक्षक, २) अपर पोलीस अधीक्षक, ३) उपविभागीय पोलीस अधिकारी. ४) पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा. ५) पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सायबर यांना दयावी.
६) घटनेतील आरोपी अटके बाबत माहिती घ्यावी.
८) असा जमाव परत जात असतांना त्यांचे सोबत बंदोबस्त ठेवल्याची खात्री करावी.
९) जमाव एकत्र आल्यानंतर त्यांची घोषणाबाजी व हालचालीची व्हिडीओ कॅमेरामध्ये रेकॉर्डींग करणे बाबत सुचना देवून खात्री करावी.
११) जमाव हिंसक होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या संबंधाने पुर्वी दिलेल्या सुचना प्रमाणे कार्यवाही करावी.
१२) या संबंधीत प्रत्येक घटनेबाबत स्टेशन डायरीला नोंद घ्यावी.
जिल्ह्यात कोणत्याही पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही स्थळाची विटंबना घडून तणावाची स्थिती निर्माण झाल्यास पोलीस स्टेशन प्रभारी यांचे संपर्कात राहून नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही.
- अशा घटनेची माहिती तात्काळ संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देऊन विटंबना झालेल्या धार्मिक स्थळाची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांना कळवावे.
- जातीय तणाव निर्माण झाला असल्यास कोणत्या समाजाचे समुदायात झाला व त्याचे नेतृत्व करणारे व्यक्तीसह उपस्थित जनसमुदायाची माहिती द्यावी.
- अशी परिस्थिती हाताळण्याकरीता पोहचलेले पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांची माहिती घेऊन प्रभारी यांचे मागणी व आवश्यकतेनुसार परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे नजिकचे पोलीस स्टेशनचा बंदोबस्त रवाना करावा.
- श्वान पथक व अंगुलीमुद्रा पथकाला सतर्क करावे व आवश्यकता असल्यास लगेच रवाना करावे.
- घटनास्थळी व संवेदनशिल ठिकाणी फिक्स पॉईंट व पेट्रोलींग लागल्याची खात्री करावी.
- विटंबनेवरुन आजुबाजूचे परीसरात प्रतिक्रिया दिसून आल्यास तात्काळ वरीष्ठ अधिकारी यांना माहिती द्यावी.
घटनास्थळी पोलीस स्टेशन प्रभारी व वरील अधिकारी यांनी दिलेल्या भेटीच्या नोंदी स्टेशन डायरीला घ्याव्यात. घटनेतील आरोपी निष्पन्न / अटकेत आहे किंवा कसे ? याबाबत माहिती घ्यावी.
अशा घटनाबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना घटनेबाबत अवगत करुन सतर्क करावे.
अचानकपणे घडलेला मोठा अपघात, एखादे वस्तीमध्ये घडलेला अपघात, दोन भिन्न समाजाचे चालक असलेले वाहनाचा अपघात, अवैद्य जनावर वाहतूक करताना होणारा अपघात, मुत्युमुखी पडलेल्या इसमांची संख्या अधिक असणारे अपघात किंवा तत्सम अपघातामुळे अचानकपणे जमाव एकत्र येऊन जमावाचा रोश वाढण्याची व त्याची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही.
- अपघाताची माहिती त्वरीत संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देऊन नजिकचे पोलीस स्टेशनचे बिट मार्शल, ड्युटी अधिकारी व स्टाफ घटनास्थळी रवाना करावा.
- घटनेमधील जखमी, समाविष्ट वाहने, घटनेचे ठिकाण, जमलेला जमाव इत्यादीची माहिती घ्यावी.
- नजीकचे ग्रामीण रुग्नालय / प्राथमिक आरोग्य केंद्र येथून रुग्न वाहिका घटनास्थळी रवाना करावी.
- अपघातातील जखमींना नागरीकांनी परस्पर दवाखान्यात नेले असल्यास त्याबाबत संबंधीत प्रभारी अधिकारी यांना सुचित करावे.
- अपघात बाबत माहिती त्वरीत पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा व संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना द्यावी.
- घटनास्थळी रहदारी सुरळीत चालू आहे किंवा नाही याबाबत माहिती घेऊन पो.स्टे. प्रभारी तसेच प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा यांना अवगत करावे.
- स्थानिक पोलीस स्टेशनला तसेच नजिकेच पोलीस स्टेशनला पोलीस स्टाफ सतर्क ठेवण्याबाबत अवगत करावे व आवश्यकतेप्रमाणे रवाना करावे.
- अपघातामध्ये आग लागल्यास नजिकचे अग्नीशमन दलास घटनास्थळी रवाना करावे.
- अपघातावरुन जातीय अगर सामाजिक तणाव किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांना माहिती द्यावी व पुर्वी दिलेल्या सुचनांप्रमाणे कारवाई करावी व परीशिस्ट ‘अ’ मधील तक्त्याप्रमाणे नजिकच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ रवाना करावा.
- ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे वाहनाचा अपघात असल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालय येथील नियंत्रण कक्षाला संपर्क करुन फोम फायटर व तत्सम अग्नीशमन वाहनाची व्यवस्था करावी.
- अपघातामुळे रहिदारी बंद झाली असल्यास, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश प्रमाणे ती सुरळीत होईपर्यंत इतर मार्गाने वळती करणेबाबत इतर संबंधीत पोलीस स्टेशनला सुचित करावे.
- आग लागणाऱ्या घटनांची माहीती मिळताच नजिकच्या ठिकाणावरुन अग्निशामन दल रवाना करावे.
ठरवून आलेल्या बंदोबस्तात नियंत्रण कक्ष अधिकारी, CRO - Control Room Officer ची भूमिका.
विविध सन उत्सव तसेच धार्मीक कार्यक्रम निमीत्य समाजात मिरवणुका निघतात. त्याप्रसंगी नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी..
- मिरवणुकीची दिनांक, वेळ, सहभागी जनसमुदाय, नेतृत्व करण्याऱ्याचे नांवाची माहिती पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांचे कडुन घ्यावी. (शक्यतो तक्ता तयार करावा.)
- मिरवणुक मार्गामध्ये भिन्न धर्मियांची असणारी प्रार्थना स्थळे व त्याठिकाणी नेमलेल्या बंदोबस्ताची माहिती घ्यावी.
- मिरवणुकी करिता लावलेल्या बंदोबस्ताची प्रत DSB/पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांचे कडून, बंदोबस्तातील अधिकारी, अंमलदार यांचे नांव, मोबाईल क्रमांकासह प्राप्त करावी.
- मिरवणुक निघण्यापुर्वी 2 तास आधी बंदोबस्त लागल्याची खात्री करावी.
- मिरवणुक करीता बाहेर पो. स्टे. नी दिलेला अतिरीक्त बंदोबस्त वेळेवर पोहचल्याची खात्री करून स्टेशन डायरीला नोंद करावी.
- मिरवणुक सुरू झाल्याची व संपल्याची वेळ प्राप्त करून स्टेशन डायरीला नोंद करावी.
- मिरवणुक बंदोबस्तामध्ये पो.स्टे. तर्फे व्हिडीओ ग्राफर अंमलदार नेमल्याबाबत खात्री करावी.
- मिरवणुक परवानगी नियम व अटीचे उल्लंघन होवुन किंवा ईतर प्रकारचे अनुचीत प्रकार घडल्यास वरिष्ठांना माहिती द्यावी व त्याठिकाणी अतिरीक्त पोलीस स्टॉफ प्रभारी अधिकारी यांचे मागणी नुसार व वरिष्ठ अधिकारी व जि.वी.शा. यांचे आदेश/सुचणे प्रमाणे पुरवावा.
- मिरवणुक संबंधाने कोणताही गुन्हा नोंद झाल्यास तात्काळ माहिती वरिष्ठांना पुरवावी.
- वरील प्रमाणे झालेल्या कार्यवाहीच्या नोंदी वेळोवेळी स्टेशन डायरीला घेण्यात याव्यात.
विविध राजकिय पक्ष, शासकिय – निमशासकिय संघटना आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासकिय कार्यालय समोर, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर धरणे, मोर्चे, निदर्शने, उपोषणे, इत्यादी आंदोलने करतात. अशा वेळी नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी करावयाची कारवाई.
- अशी आंदोलने पुर्व नियोजित असल्याने त्याकरीता नेमलेला बंदोबस्त किमान ०२ तासापुर्वी लागला गेला आहे याची खात्री करावी.
- आंदोलनाचे ठिकाणी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उपस्थित आहेत याची खात्री करावी.
- पूर्वनियोजित अशा आंदोलना करीता नेमण्यात आलेला बंदोबस्त करीता अधिकारी व अंमलदार यांची संख्या तसेच बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांची माहिती ठेवावी.
- अशा आंदोलनामध्ये कोणता राजकिय पक्ष, संस्था, संघटना व पदाधिकारी समाविष्ट आहे तसेच त्याठिकाणी उपस्थित जनसमुदाय व आंदोलनाचे स्वरुपाची माहिती वरिष्ठांना कळवावी.
- आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकाऱ्यांची माहिती संबंधी पोलीस स्टेशन कडून प्राप्त करावी.
- आंदोलन सुरु झाल्याची व संपल्याची वेळ संबंधीत पोलीस स्टेशनकडून माहिती प्राप्त करावी.
- आंदोलनकर्ताकडून नियम व अटिंचे भंग झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यास त्याची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना द्यावी.
- अशा आंदोलनकर्त्याकडून हिंसक कृत्य होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यापूर्वी दिलेल्या सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी.
- अशा बंदोबस्तमध्ये पोलीस स्टेशन तर्फे कॅमेरासह व्हिडीओ ग्राफरची नेमणुक केली आहे याबाबत खात्री करावी.
- बंदोबस्त करीता देण्यात आलेला अतिरिक्त पोलीस स्टाफ पुर्णपणे पोहचल्याची खात्री करुन स्टेशन डायरीला नोंद घ्यावी व अपूर्ण असल्यास संबंधीत प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा यांना माहिती द्यावी.
- आंदोलन सुरु झाल्यापासून संपेपर्यंत नियमीतपणे आंदोलनाच्या स्थितीची माहिती घ्यावी.
- वरील सर्व बाबींच्या नोंदी वेळोवेळी स्टेशन डायरीमध्ये घ्याव्यात.
विविध प्रकारचे राजकिय, सामाजिक, धार्मिक, शासकिय, निमशासकिय, खाजगी कामानिमित्त अतिमहत्वाची व्यक्ती यांचे दौरे होत असतात अशा वेळी नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही.
- अति महत्वाचे व्यक्ती चा दौरा कार्यक्रम बाबत जिविशा कडून बंदोबस्त प्राप्त करावा.
- अति महत्वाचे व्यक्तीचे बंदोबस्त चे रुपरेशे प्रमाणे त्यांचे प्रयाणाचे ठिकाणावरुन निघाल्याची व त्यांच्या लोकेशनची माहिती करुन बंदोबस्त l अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी.
- अति महत्वाचे व्यक्ती यांचा संपूर्ण वाहन ताफा / कॅन्व्हॉय, लावण्यात आला असल्याची बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांचेकडून खात्री करावी.
- बंदोबस्त करीता नेमण्यात आलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्ताचे ठिकाणी किमान ०२ तास आधी पोहचल्याची खात्री करावी.
- अति महत्वाचे व्यक्ती यांचे दौऱ्यादरम्यान आंदोलन अगर विरोध होत असल्यास तात्काळ बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना तशी माहिती द्यावी..
- अति महत्वाचे व्यक्ती यांचे प्रवासावेळी त्यांचे वाहनास अडथळा होणार नाही यादृष्टीने संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी उपाययोजना करण्यासंदर्भात सुचना द्याव्यात.
- अति महत्वाचे व्यक्तीचे दौरा कार्यक्रम दोन किंव्हा जास्त जिल्ह्यात असेल तर दौऱ्या दरम्यान शेजारील जिल्हा नियंत्रण कक्ष अधिकारी यांचे संपर्कात राहून समन्वय ठेवावा.
- अति महत्वाचे व्यक्ती दौरा संबंधी प्रत्येक घडामोडीची नोंद स्टेशन डायरीला ठेवून माहिती वरीष्ठांना कळवावी.
(गंभीर तसेच ईतर भेटीयुक्त गुन्हे) दरोडा, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी, बँक चोरी, ए.टी.एम. चोरी, बॅग लिफ्टींग, पोलीस असल्याच्या बतावनीचे गुन्हे, इत्यादी.
- अश्या गंभीर तसेच ईतर भेटीयुक्त गुन्हे प्रकरणी आरोपी व गुन्ह्यात वापरलेली वाहनाची स्थानिक पोलीस स्टेशनकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सर्वत्र तात्काळ नाकाबंदी सुरु करावी.
- नाकाबंदीसाठी लावलेले पोलीस स्टाफची माहिती घेऊन स्टेशन डायरीला नोंद करावी.
- आजूबाजूचे जिल्ह्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देवून नाकाबंदीसाठी कळवावे.
- अशा गुन्ह्याची माहिती तात्काळ संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक- स्थानिक गुन्हे शाखा यांना फोनद्वारे द्यावी.
- पोलीस स्टेशन प्रभारी यांचेशी संपर्क करुन परीस्थितीनुसार श्वान पथक व अंगुलीमुद्रा पथक घटनास्थळी रवाना करावे.
- स्पेशल रिपोर्ट, सर्व भेटीयुक्त गुन्ह्यामध्ये संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट सुरु केल्याची व संपवल्याची वेळ प्राप्त करुन त्याची स्टेशन डायरीला नोंद घ्यावी. आणि राज्य पोलीस नियंत्रण कक्षाला स्पेशल रिपोर्ट पाठवितांना त्यात ती वेळ नमुद करावी. त्याचप्रमाणे अशा गुन्ह्यामध्ये इतर वरीष्ठ अधिकारी यांनी भेट दिली असल्यास ती सुध्दा स्पेशल रिपोर्टमध्ये नमुद करावी.
निवडणुका
- जिल्हा हद्दीत कोणत्याही सर्व निवडणुक करीता नेमण्यात आलेला बंदोबस्त संबंधीत पो.स्टे. ला वेळेवर पोहचल्याची खात्री करावी. गैरहजर अंमलदारांची माहिती संबंधीत ठाणेदार व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, यांना द्यावी.
- निवडणुक बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांनी लावलेल्या बंदोबस्ताची प्रत अंमलदाराचे नांव व मोबाईल क्रमांकासह प्राप्त करावी.
- मतदान केंद्रावर मतपेट्या पोहचल्याची खात्री करावी.
- मतदान चे दिवशी मतदान सुरू होण्याचे 02 तास आधी सर्व बंदोबस्त पोहचल्याची खात्री करावी. दर 02 तासांनी मतदानाची टक्केवारी व शांतता रिपोर्ट सह पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, यांना कळवावी.
- मतदाना दरम्याण कुठलाही अनुचीत प्रकार घडल्यास तात्काळ त्याची माहिती पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, यांना देवुन वरिष्ठ अधिकारी चे आदेशानुसार नजीकचे पो.स्टे. चा किंवा राखीव पोलीस स्टॉफ त्या ठिकाणी तात्काळ रवाना करावा.
- निवडणुक दरम्याण पो.स्टे. प्रभारी अधिकारी व इतर सर्व पोलीस पथके नियमीत पेट्रोलींग करतील याची खात्री करावी.
- मतदान संपल्यानंतर मतपेटी ( ई.व्ही.एम.) स्ट्रॉंग रूमला सुरक्षीत पोहचल्याची खात्री करावी.
- मतमोजनी सुरू होण्याचे 02 तास पुर्वी बंदोबस्त लागल्याची खात्री करावी व बंदोबस्त प्रत प्राप्त करावी.
- निवडणूक तसेच मतमोजणी बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांच्या संपर्कात राहावे.
- मतमोजनी संपल्यानंतर परिसरात पेट्रोलींग सुरू असल्याची खात्री करावी.
- वरील प्रमाणे सर्व बाबीचे वेळोवेळी स्टेशन डायरीला नोंद घ्यावी.