NCCRP - National Cyber Crime Reporting Portal (Helpline No.-1930)

Cyber Crime Helpline No For Online Financial Fraud - 1930.

फोन वरून / ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या व्यक्तीस त्वरित

सायबर हेल्पलाईन नंबर

1930

वर फोन करण्यास सांगावे.

किव्हा

www.cybercrime.gov.in

या वेबसाईटवर संपर्क करुन आर्थिक फसवणुक झाल्या बाबत आपली तक्रार नोंदविण्यास सांगावे.  

एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्यास (Online financial Fraud) अश्या आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या व्यक्तीने सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर फोन करून किव्हा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर संपर्क करुन आर्थिक फसवणुक झाल्या बाबत आपली तक्रार नोंदवावी व खालील प्रमाणे कार्यवाही करावी…

  1. 1930 या financial Fraud Helpline वर फोन करावे. त्यांनी विचारलेली माहिती सांगवी व आपली तक्रार ऑनलाईन पद्धतीने NCCRP – National Cyber Crime Reporting Portal वर नोंदवून घ्यावी. सदरची तक्रार ज्या पोलिस स्टेशन च्या हद्दीचे नाव आपण नोंदविले त्या पोलिस स्टेशनच्या नावाने दिसेल. (NCCRP च्या पोर्टल वर online तक्रार नोंदविली म्हणजे FIR नोंदविली असे होत नाही, हे तक्रारदारनी ध्यानात घ्यावे. (1930 यावर फोन करून तक्रार नोंदविण्याचा फायदा येवढाच की आपल्या तक्रारीवर लगेच मुद्देमाल शोध सुरू होतो व आपली रक्कम संबंधित बँक खात्यात गोठावली जाते. ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत त्वरित कार्यवाही  (quick action) खूप महत्वाची असते.)
  2. NCCRP पोर्टल वर तक्रार नोंदविताना ज्या पोलिस स्टेशनचे नाव तक्रारदारने सांगितले असेल त्या पोलिस स्टेशनला जाऊन आपली प्रत्यक्ष तक्रार द्यावी. (पोलिस स्टेशनला दिलेल्या व CCTNS मध्ये नोंदविलेल्या, computer Printed तक्रारीस FIR म्हणतात हे तक्रारदरणी ध्यनात घ्यावे.)

ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्यास (Online financial Fraud) मध्ये खलील प्रकारचे गुन्हे येतात….

  • Credit Card Fraud: Unauthorized use of credit card information to make unauthorized transactions.
  • ATM Skimming: Criminals attach devices to ATMs to capture card data and PIN numbers.
  • Online Banking Fraud: Hackers gain unauthorized access to online banking accounts to steal funds or sensitive information.
  • Investment Scams: Scammers promote fake investment opportunities to swindle individuals out of their money.
  • E-commerce Fraud: Fraudulent online purchases, fake listings, and non-delivery of goods purchased online.
  • Mobile Wallet Fraud: Unauthorized access to mobile wallet accounts or fraudulent transactions made through them.
  • Crypto Scams: Deceptive schemes related to cryptocurrencies, including fake ICOs (Initial Coin Offerings) and investment fraud.
  • Lottery and Prize Scams: Individuals are lured into paying fees or taxes for nonexistent prizes or lottery winnings.
  • Data Breaches: Hackers gain access to databases containing personal and financial information.
  • Insurance Fraud: Filing false insurance claims to receive financial compensation.
  • fraudulent schemes,
  • Online Banking Fraud,
  • NCCRP पोर्टल चे ऑनलाईन आर्थिक फसवणुक करिता सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 सेंटर “महाराष्ट्र सायबर कार्यालय मुंबई” येथे सुरु करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र सायबर कार्यालयातील हेल्पलाईन हाताळणी करण्याऱ्या पोलीस अंमलदार/अधिकारी यांचेकडून फोनवर तक्रारी घेतल्या जातात.
  • तक्रार घेताना तक्रारदार यांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, फसवणुकीबाबत माहिती (Transaction Details) घेवून तक्रार नोंद करण्यात येते.
  • तक्रारीची नोंद झाल्यानंतर त्या तक्रारीचा Acknowledgement No प्राप्त होतो. व सदर तक्रार संबधीत बँक / वॉलेट/ मर्चट यांना पोर्टलदवारे स्वयंचलीत (Automatic) मार्गाने पुढील कारवाईसाठी पाठविल्या जातात.
  • तक्रार नोंद झाल्यानंतर तक्रारदार यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज दवारे तक्रारीचा Acknowledgment No एका लिंक सह प्राप्त होतो.
  • तक्रारदार यांने सदर लिंकवर क्लिक करुन (www.cybercrime.gov.in) 24 तासांचे आत आपली उर्वरीत माहिती भरणे आवश्यक आहे.
  • त्यांनतर सदर तक्रार संबधीत पोलीस ठाणे यांचे पोर्टलवर Interim Complaint या टॅबमध्ये प्राप्त होईल.

Online आर्थिक फसवणुक बाबत www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर खालील प्रमाणे तक्रार नोंद करावी.

  • भारत सरकार यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) सुरू केली आहे.
  • आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या व्यक्तीने www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन Report Cyber Crime मध्ये Financial Fraud या टॅब मध्ये आपल्या तक्रारीची नोंद करावी.

( तक्रारदार यांना तक्रार नोंद करण्यासाठी पोर्टलवरील Resources मधील Citizen Manual मध्ये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत.

Online आर्थिक फसवणुक बाबत www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंद झाली आहे असे NCCRP पोर्टल च्या Admin Panel ला माहिती झाल्यावर त्या पोलिस अधिकारी नी खालील प्रमाणे कार्यवाही करावी…..

  • NCCRP – National Cyber Crime Reporting Portal (नॅशनल सायबर क्राईम पोर्टल) वर आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार Online Financial Fraud या कॉलम खाली प्राप्त होतात.
  • संबधीत बँक / वॉलेट/ मर्चट यांना तक्रारीमधील फसवणुक झालेली रक्कम गोठविण्याकरीता Request पोर्टलवरुन Citizen Financial Fraud Reporting या टॅब वरुन पाठविण्यात येतात.
  • सदर टॅबमध्ये Send to Intermediatory यावर क्लिक करुन बाजूस नमुद तक्रारी Select करुन संबधीत बँक / वॉलेट/ मर्चट यांना पुढील कारवाई साठी पाठविण्यात यावेत.
  • या टॅबचा वापर करुन 72 तासांच्या आतील तक्रारी बँक / वॉलेट/ मर्चन्ट यांना पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येतात.
  • ज्या पोलिस स्टेशनचे हद्दीत घटना घडली आहे त्यांनी तक्रारदारास बोलावून त्याची तक्रार, FIR-First Information Report, (फिर्याद) नोंदवून घ्यावी.
  • तक्रारदारास FIR REGISTRATION ची प्रत विनामूल्य द्यावी.
  • जिल्ह्यातील NCCRP पोर्टल च्या Admin Panel ला संपर्क करून, त्वरित पुरावे हस्तगत करावे. किती रक्कम जप्त केली याची स्टेटमेंट प्राप्त करावी, ज्या – ज्या बँक मधून पैसे ट्रान्स्फर झाले त्याचे स्टेटमेंट प्राप्त करावे. हे सर्व पुरावा म्हणून तपास डायरीस जोडावे.

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी NCCRP Portal मध्ये गुन्हा नोंदविल्यास खालील प्रमाणे तपासास मदत होते…

  • फिर्यादी च्या बँक खात्यातुन पैसे कुठल्या – कुठल्या बँक खात्यात गेले याची पूर्ण माहिती तपासी अधिकारी ना प्राप्त होते. ती माहिती तपासात मार्गदर्शक ठरते.
  • पोलिस व फिर्यादीस हुलकावणी देण्या साठी आरोपी वेगवेगळ्या नावाने भरपूर बँक खाते वापरतात. व एका खात्यात जमा असलेले फिर्यादी चे पैसे वेगवेगळ्या खात्यात जमा करतात. ज्या बँक खात्यात पैसे शेवटी वळते केले असतील ते त्या ठिकाणी गोठविले (freeze/hold) जातात. आरोपीस ते पैसे काढण्यास (withdrawal) करण्यास किंव्हा वळते करण्यास (Money transfer) करण्यास मज्जाव करण्यात येतो.
  • या चैन मधील सर्व बँक खाते गोठविले जातात, त्या मुळे आरोपीस बँक खात्यात परत ढवळाढवळ करता येत नाही.
  • पैसे लगेच गोठाविल्यामुळे तक्रारदारास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.
  • सदर प्रणाली मध्ये नवनवीन प्रयोग चालू असून बँक स्टेटमेंट इत्यादी तपासात उपयुक्त माहिती देण्याचा NCCRP चा प्रयत्न असतो, पुढे त्याचा फायदा तपासी अधिकारी ना होणार आहे. त्यामुळे तपासी अधिकरिंनी सतत या पोर्टल चा आढावा घ्यावा.

Leave a Comment