शासन निर्णय
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात मोबाईल फोनचा वापर करतांनाचे शिष्टाचार संदर्भात थोडक्यात.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात मोबाईल फोन वापरण्याबाबतचे शिष्टाचार.
Etiquette regarding use of mobile phones in government Offices by officer’s and employees. GR : Date : 23/07/2021.
- कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्रथम प्रामुख्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.
- कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइल फोनचा (भ्रमणध्वनी) वापर करावा.
- मोबाइल फोन वर बोलण्यात व्यस्त असताना जर लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
- भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमाचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.
- अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तसेच बैठकीदरम्यान महत्वाचे विषयावर चर्चा सुरू असतात. त्यामुळे अश्या जागी वावरत असतांना आपला मोबाइल फोन silent / vibrate mode वर ठेवावा.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान विनाकारण मोबाइल फोन हाताळणे, व्हाट्स आप संदेश तपासणे, ear piece / ear phone वापर करून फोन वापरचा प्रयत्न करणे, अशा बाबी टाळाव्यात.
- कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये, त्यामुळे महत्वाचे संदेश पोहचवायला अडचण जाते.
ऑफिसमध्ये मोबाईल फोन कसा वापरावा?
How to use mobile phone during office?
- मोबाइल फोनवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या (वरिष्ठ अधिकारी, कार्यालयातील सहकारी व लोकप्रतिनिधी) उपस्थितीची जाणीव ठेवावी.
- भ्रमणध्वनीवर बोलताना हळुवार व सौम्य आवाजात बोलावे, बोलताना फोन वरील व्यक्तीशी वाद घालू नये तसेच असंसदीय (वाईट व शिवीगाळयुक्त) भाषेचा वापर करू नये.
- कार्यालयीन कामकाजासाठी मोबाइल फोनचा वापर करताना पहिले श्यक्यतो लघुसंदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी शब्दात व वेळेत संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.
सारांश :- सादर बाबी या महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून शासकीय कर्मचारी करिता लागू केलेल्या आहेत. (शासन निर्णय वाचण्याकरिता येथे क्लिक करा.)