पोलिसांना सेवानिवृत्ती नंतर सक्षापेशी कामी प्रवास भत्ता - TA facility to Retired Police for Court Witness.
पोलिसांना सेवानिवृत्ती नंतर सक्षापेशी कामी प्रवास भत्ता देण्यात येतो त्यासंबंधात थोडक्यात...
- मुंबई नागरी सेवा नियम 1959 मधील नियम 532 खालील सध्याच्या टीपे ऐवजी पुढील टीप समाविष्ट करण्यात आलेली आहे.
- नविन टिप :- शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अथवा जिच्या सेवा अन्यथा समाप्त करण्यात आल्या आहेत अशा व्यक्तीला, शासन सेवेत कर्तव्य बजावत असताना ज्ञात झालेल्या बाबीं संदर्भात साक्ष देण्यासाठी न्यायालयात वा विभागीय चौकशीच्या कामी उपस्थित राहावे लागणार असल्यास, काटकसरी विषयी अंमलात असणाऱ्या तरतुदींच्या अधीन राहून, सेवानिवृत्त होण्यापूर्वी सदर व्यक्ती जितके वेतन घेत होती तितके वेतन घेणाऱ्या त्या व्यक्तीच्या संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांस दौऱ्याकरिता मिळणाऱ्या दराने प्रवासभत्ता आणि दैनिकभत्ता लागू राहील.”
- कुठल्या कामाकरीता हा भत्ता दिला जातो:- न्यायालयात साक्षापेशी करिता व विभागीय चौकशीच्या कामाकरिता हा प्रवासभत्ता व दैनिकभत्ता दिला जातो.
- बिल सदर करते वेळेस संबंधित अधिकाऱ्याचे समन्स पत्र तसेच आपण साक्ष कामी हजर होते या बाबतचे JMFC/विभागीय चौकशी अधिकारी यांचे पत्र जोडणे गरजेचे आहे.