हरविलेल्या व्यक्तीची शोध पत्रिका (Missing Person Search Slip)
हरविलेल्या व्यक्तींची शोध पत्रिका कशी तयार करावी? (How to prepare Missing Person Slip?)
हरविलेल्या व्यक्तींची शोध पत्रिका कशी तयार करावी? (How to prepare Missing Person Slip?)
- हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन तक्रारीत दिल्या प्रमाणे नमूद करावे.
- हरविलेल्या व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर, इत्यादी.
- हरविलेल्या व्यक्ती कसा हरविला, कधी हरवला, कुठे हरविला, या बाबत थोडक्यात हकीगत सांगितली जावी.
- हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेणे कमी त्याचे नेमके शररीक वर्णन उदा. वय, रंग, रूप, बांधा, जखमेच्या खुणा, शारारिक व्यंग इत्यादी सर्व. नमूद करण्यात यावे.
- हरविलेल्या व्यक्तीचा पेहराव, राहणीमान, शौक, सवयी, इत्यादी बाबतची माहीती लिहावी.
- हरविलेल्या व्यक्तीचा फोटो. (नजिकच्या काळचा)
- हरविलेली व्यक्ती मिळून आल्यास त्या बाबत कुठे माहिती द्यावी, त्याचा पत्ता, फोन नंबर, पोलिस स्टेशन डायरी फोन नंबर, तपासी अंमलदार यांचा मोबाईल नंबर, नातेवाईकांचा फोन नंबर इत्यादी.
- त्या खाली पोलिस स्टेशन चा गोल शिक्का वापरून व पोलिस तपासी अंमलदार ने आपला नावाचा शिक्का मारून आपली सही करावी.