दुखा:पतीचे गुन्ह्याची तक्रार FIR of injury
दुखा:पतीचे गुन्ह्याची तक्रार कशी लिहावी ?
How to write an FIR for the offense of injury?
फिर्यादी ची ओळख:-
- FIR मध्ये प्रथम खबर देणाऱ्याचे संपुर्ण नाव (वडिलांचे नाव सह), जात, वय, संपूर्ण पत्ता, व्यवसाय, मोबईल क्रमांक, आधार क्रमांक, याचा उल्लेख प्रथम खबर अहवालात करावा.
घ. ता. वेळ. ठिकाण/ विलंबाचे कारण:-
- FIR मध्ये FIR घेण्याची तारीख तसेच घटनास्थळाचे ठिकाण दिनांक व वेळ नमुद करावी.
- FIR/ प्रथम खबर घेण्यास विलंब झाला असल्यास विलंबाचे कारण तक्रारीत न विसरता लिहिले जावे. (जखमी झाले असल्याने उपचार घेणे आवश्यक झाले असल्याने, आरोपीच्या, FIR दिल्यास जिवे मारून टाकण्याच्या धमकीमुळे इत्यादी.)
गुन्ह्याचा हेतु :-
- प्रथम खबर अहवालात गुन्हयाचा हेतू काय होता तो लिहिला जावा.
- प्रथम खबर अहवालात आरोपी व फिर्यादीचे पूर्वीचे वादाबाबतचा नेमका उल्लेख करावा. / नसल्यास तसे लिहावे.
- वादाचे तत्कालीन कारण तक्रारीत नमूद करावे.
Atrocity Act :-
- पिडीत व्यक्ती अनुसुचित जाती जमातीचे सदस्य असल्यास त्याची जात फिर्यादीत नमुद करावी.
- आरोपी कुठल्या जातीचा आहे हे नमूद करावे.
- आरोपीस जखमी व्यक्ती अनुसुचित जाती जमातीचे आहे हे माहित असल्यास त्या बाबतचा स्पष्ट उल्लेख FIR मध्ये घ्यावा. आरोपीस पिडीतची, जखमीची जात कशी काय माहिती या बाबत थोडक्यात लिहावे.
- FIR मध्ये Atrocity कायद्याचे कलम लागणार असल्यास जातीवाचक काय उल्लेख झाला/ वाद झाला या बाबतचा स्पष्ट माहिती लिहावी.
आरोपी चे नाव व वर्णन:-
- प्रथम खबर अहवालात आरोपीची नावे नमुद करावी.
- आरोपी अनोळखी असल्यास अनोळखी लिहावे व आरोपीचे वर्णन लिहावे.
- तक्रारीत कोणत्या आरोपीने कोणते कृत्य केले याचा उल्लेख करावा.
साक्षीदार :-
- प्रथम खबर अहवालात घटना समक्ष पाहणारे साक्षीदारांची नावे नमुद करावी.
- साक्षीदार घटनास्थळी / त्याच ठिकाणी राहतात की दुसऱ्या कामाकरीता त्या ठिकाणी हजर झाले की कसे या बाबत स्पष्ट उल्लेख करावा.
- फिर्यादिस आरोपीकडून मारहाण होत असतांना फिर्यादीस सोडविण्यास आलेल्या लोकांची नावे FIR मध्ये साक्षीदार म्हणून घ्यावी.
हत्यार :-
- प्रथम खबर अहवालात आरोपींनी कोणते हत्यार वापरले याचा उल्लेख करावा.
- हत्यार ओळखीचे नसल्यास हत्याराचे वर्णन (खाना, खुणा) FIR मध्ये घेतले जावे.
- हत्याराने कश्याप्रकारे मारले याचा उल्लेख करावा. (उदा कुऱ्हाडीच्या धारदार पत्याने मारले की पकडायच्या मुठीने मारले.
- हत्याराणे मारतांना आरोपी पीडितास काय म्हणत होता ते शब्द त्याचेच भाषेत लिहावे.
दिवस/रात्र/प्रकाश/अंधार :-
- वादाची घटना रात्रीच्या वेळी घडली असल्यास फिर्यादीने घटना कोणत्या प्रकाशात पाहिली याचा उल्लेख FIR मध्ये करावा.
गुन्ह्यातील वाहन :-
- गुन्हयांसाठी आरोपीने वाहन वापरले असल्यास त्याचे वर्णन व वाहन नंबर प्रथम खबरीत नमुद करावे.
- आरोपीच्या वाहनात किती लोक आले होते याचा उल्लेख करावा. सार्वजनिक वाहन असल्यास वाहनतील इतर प्रवाश्यांना साक्षीदार करावे.
आरोपी भाषा/संभाषण/वक्तव्य :-
- गुन्हा करते वेळी आरोपी काय बोलत होते, तसेच त्यांनी जुन्या वादाबाबत काही वक्तव्य केले असल्यास त्याचा FIR मध्ये उल्लेख करावा.
- आरोपी ज्या भाषेत बोलत होता त्या भाषेतील संवाद जसेच्या तसे FIR ला घ्यावे.
- फिर्यादीच्या बोली भाषेत त्याला FIR समजावून सांगावे व तसा उल्लेख FIR चे शेवटी करावा.
CCTNS FIR/तोंडी रिपोर्ट :-
- CCTNS मध्ये FIR लिहिली जावी. त्याची एक प्रत फिर्यादीस विनामुल्य दिली जावी.
- CCTNS मधील FIR च्या फॉर्म मथील संबंधित सर्व कॉलम भरावेत.
सही :-
- तोंडी रीपोर्ट नोंदविणारे ठाणे अंमलदार यांनी त्यांचे सहीचे खाली त्यांचे नाव व पदनाम लिहावे.
- FIR/तक्रार देणार्याची सही FIR वर घ्यावी.
- CCTNS ची प्रत संबंधीत कोर्टात त्वरीत पाठवावी.