दुखा:पतीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे अंमलदाराने त्वरीत करावयाची कारवाही.

दुखा:पतीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे अंमलदाराने त्वरीत करावयाची कारवाही.

Action to be taken quickly by Thane Amaldar after registering a case/offence of injury..

घटनास्थळाचे सरंक्षण :-

  • घटनास्थळाचे संरक्षण करण्यास पोलीस कार्मचारी नेमावे. स्टे.डा.ला नोंद घ्यावी.

वरिष्ठ पोलीस अधिकारीना कळविणे :-

  • ठाणे अंमलदार यांनी घटनेबाबत नियंत्रण कक्ष व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवावे.

जखमींना उपचार:-

  • दुखा:पतीच्या घटनेत व्यक्ती जखमी असल्यास त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करावे.
  • जखमीस उपचारास पाठवितांना पोलीस स्टेशन चा अनुभवी अंमलदार जखमींचे बयाण घेणे कमी पाठवावा.

आरोपी शोध व अटक:-

  • आरोपी शोध व अटकेसाठी ठानेदार अधिकारीचे आदेशाने त्वरीत पथक पाठवावे.

जातीय गुन्हे :-

  • दोन वेगवेगळ्या गटातील वादातून हिंदू-मुस्लीम समाजातील वादातून अथवा अल्पसंख्यांक-सवर्णाचे वादातून दुखा:पतीचा गुन्हा घडला असल्यास त्याबाबत वरिस्ट अधिकारींना कळवुन त्वरीत बंदोबस्त नेमावा.

भेटीयुक्त गुन्हे:-

  • भेटीयुक्त गुन्हयात उपविभागीय पोलीस अधिकारी/सहा. पोलीस आयुक्त यांनी त्वरीत घटनास्थळी भेट ध्यावी या करीता त्या-त्या कार्यालयास कळवावे.

तपास डायरी हस्तांतरण :-

  • गुन्हा दाखल होताच तपासी अधिकाऱ्यांनी तपास हाती घ्यावा या करीता त्वरित तपस डायरीवर वरीस्ट अधिकारी (ठानेदार चे) चे शेरा घेवून तपस संबंधित अधिकारी/कर्मचारींना दिले बाबत नोंद घ्यावी.