पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण.. (Maintenance and welfare of parents and senior citizens..)

मुले पालकाची काळजी घेत नाही, त्यांची देखभाल करीत नाही, अश्या प्रकारची तक्रार पोलिस स्टेशनला आल्यास पोलिसांनी काय करावे…

पोलिस म्हणजे जवळपास सर्वं समश्यावरचे रामबाण उपाय असे सर्वंसामान्य व्यक्तीचे मत असते. असायलाही पाहीजे, कारण एखाध्या बाबतीत अधिकार नसेल तरीही पोलिस त्यात सामान्य व्यक्तीस काहीतरी जुगडू उपाय शोधून देतो. नाही काही झाले तरीही पोलिसांनी डोळे मोठे केले तरीही बरेचदा काम होवून जाते. हे सत्य आहे.

त्यामुळेच घरगुती दिवाणी भांडणे, वडीलोपार्जित मालमत्ता वाटपाची भांडणे, इत्यादी सुध्दा पोलिसांकडे येतात. त्याच कळीतील एक समश्या म्हणजे मुले पालकांची / आई वडिलांची काळजी घेत नाहीत ही एक. ही एक दिवानी समश्या आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीसांना विषेश काही अधिकार नाहीत. याच समश्येवर उपाय म्हणुन सरकारने “THE MAINTENANCE AND WELFARE OF PARENTS AND SENIOR CITIZENS ACT, 2007”  हा कायदा अंमलात आणला आहे. तसेच त्यात 2019 साली सुधारणा केल्या गेल्या आहेत.

प्रथम सांगायचे म्हणजे या कायद्या अंतर्गत पोलिसांना कार्यवाही करण्याचे अधिकार नाहीत.

या कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार महसूल विभागातील अधिकारी यांना आहेत. ( त्यामुळे मुलाकडून पालकाची काळजी घेतली गेली जात नाही आहे अश्या प्रकरणात त्या पालकांना उपविभागीय अधिकारी / तहशीलदार (अधिकार प्रदान केले असाल्यास) यांचे कडे खाली दिलेल्या नमुन्यात अर्जं करण्यास सांगावे. 

(आपल्याकडे मुलांकडून पालकांच्या प्रताडनाची तक्रार आल्यास आपण सदर तक्रारदारची काही फौजदारी /मारहाणीची /शिवीगाळीची तक्रार असेल तर त्यात फौजदारी कायद्याच्या कलमाप्रमाणे दाखलपत्र किव्हा अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्या प्रमाणे कार्यवाही करावी.)

THE MAINTENANCE AND WELFARE OF PARENTS AND SENIOR CITIZENS ACT, 2007 कायद्याखाली करायची कार्यवाही....

सदर THE MAINTENANCE AND WELFARE OF PARENTS AND SENIOR CITIZENS ACT, 2007 कायद्याखाली कार्यवाही करताना वापरायचे विविध नमुने.

महसूल कार्यालयाने प्रसारित केलेली नमुन्याची प्रत आपणास अभ्यास कामी देत आहोत. त्याचे अवलोकन करून पिडीत आई/वडीलांना खालील नमुण्यात उपविभागीय अधिकारी (SDM)/ तहशीलदार (अधिकार प्रदान केले असाल्यास) यांना अर्ज करण्यास सांगावे.

सदर THE MAINTENANCE AND WELFARE OF PARENTS AND SENIOR CITIZENS ACT, 2007 कायद्याखाली कार्यवाही करताना वापरायचे विविध नमुने पाहण्यासाठी येथे क्लिक करा.