CCTV By Court Order (न्यायालयीन आदेशान्वये कॅमेरे)
राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये न्यायालयीन आदेशान्वये कॅमेरे.
- उद्देश:- पोलीस कोठडीतील मृत्यु रोखण्यासाठी.
1) पोलीस स्टेशन मधील CCTV Camera system पूर्ण वेळ सुरू राहील याची काळजी घ्यावी.
2) CCTV Camera system काही तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यास अथवा त्यात थोडाफार बिघाड आल्यास अथवा camera काम करीत नसल्यास त्वरित नोडल ऑफिसर मार्फत जिल्हा स्तरीय पर्यवेक्षण समिती ला कळवावे.
3) CCTV Camera Vendor चे संपर्क क्रमांक जवळ ठेवावे.
4) रोज एकदा CCTV Camera System चे अवलोकन करावे.
5) CCTV Camera Footage 1 वर्ष पर्यंत NVR मध्ये जतन राहील येवाढी क्षमता system मध्ये दिली गेली आहे. परंतु एखाद्याने CCTV Camera चे फुटेज, 2005 चे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागितल्यास, जो पर्यंत त्या प्रकरणात अंतिम न्ययनिर्णय होत नाही तो पर्यंत मागितलेली CCTV Camera Footage जतन करून ठेवावी. (शासन निर्णय चे अवलोकन करावे.)
6) पोलीस स्टेशन च्या प्रत्येक कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण जिल्हा स्तरीय पर्यवेक्षण समिती, राज्य स्थरीय पर्यवेक्षण समिती, राज्य शासन, न्यायालय आणि सामान्य जनता, जेव्हा कधी मागेल तेव्हा आपल्याला पुरवायचे आहे.
7) पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी/कर्मचारी कडून आरोपी ला मारहाण केली जाणार नाही तसेच सामान्य जनतेला सौजन्याची वागणूक मिळेल या कडे लक्ष द्यावे.
- मा.सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.3543/2020 मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तसेच राज्य व जिल्हास्तरावर पर्यवेक्षण समिती (Oversight Committee) स्थापन करण्याचे आदेश दिले.
- या अनुषंगाने दि. 08/01/2021 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पर्यवेक्षण समिती व प्रत्येक जिल्हयासाठी विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
- मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार जिल्हास्तरावरील पर्यवेक्षण समिती ( District Level Cversight Committee ) असेल.
सदर समितीच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे आहेत :-
1. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे यांची देखरेख, देखभाल करणे तसेच ते सुस्थितीत ठेवणे.
2. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे यांची नेहमी देखरेख करण्याचे कामाचे सतत पर्यवेक्षण करणे
3. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे कार्यरत राहणे तसेच त्याची देखभाल करण्याच्या अनुषंगाने Station House Officer (SHO) यांचेशी संवाद साधणे
4. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे कार्यरत आहेत किंवा कसे याबाबत राज्यस्तरीय पर्यवेक्षण समितीला मासिक अहवाल सादर करणे.
पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याची जबाबदारी :-
( प्रत्येक पोलीस ठाण्यामधील सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण (Recording) सुरळीत सुरु राहतील याची जबाबदारी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याची असेल. सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असतील किंवा त्यासोबतच्या उपकरणांमध्ये कोणतीही त्रुटी आढळली तर Station House Officer (SHO) ने तात्काळ जिल्हास्तरावरील पर्यवेक्षण समितीला (District Level Oversight Committee ) कळविणे बंधनकारक राहील. )
जिल्हास्तरावरील पर्यवेक्षण समितीने (District Level Oversight Committee) त्या-त्या पोलीस आयुक्तालय/पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कार्यरत आहेत किंवा कसे याबाबतची बैठक घेऊन व योग्य ती कारवाई करून तसा अहवाल राज्यस्तरावरील पर्यवेक्षण समितीला (State Level Oversight Committee ) पोलीस महासंचालक यांचेमार्फत प्रत्येक महिन्यात कळविणे आवश्यक राहील.
रेल्वे पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही बाबत ज्या जिल्हयाचे हद्दीत संबंधित रेल्वे पोलीस स्टेशन असेल त्या जिल्हयासाठी जिल्हास्तरावरील पर्यवेक्षण समिती (District Level Oversight Committee) चे बैठकीसाठी संबंधित पोलीस अधिक्षक, लोहमार्ग हे सदस्य राहतील.
ज्या ठिकानी आरोपीचा वावर होतो, त्या सर्व ठिकानी.
- Entry – Exit Gate.
- Police Station Entry.
- Passage.
- Station House.
- Officers Room.
- Charge Room.
- Lockup.
- Other Room if Any.
कंट्रोल कुठे?
- PSO Chamber मध्ये.
सिस्टम ची स्टोरेज क्षमता :-
- 365 दिवस