स्वग्राम व रजा प्रवास सवलत (Home Town & Leave Travel Concession)

स्वग्राम व रजा प्रवास सवलत बाबत शासन निर्णय दि.10/06/2015 मधिल महत्वाचे मुद्दे..

स्वग्राम – स्वग्राम म्हणजे कर्मचाऱ्यांचे कायम वास्तव्याचे ठिकाण किंवा त्याच्या सेवापुस्तकात नोंदविलेले गांव किंवा योग्य त्या कारणास्तव घोषित केलेले अन्य ठिकाण (मालकीची स्थावर मालमत्ता जवळच्या नातेवाईकांचे म्हणजे आई-वडील, भाऊ यांचे कायम वास्तव्याचे ठिकाण )

महाराष्ट्र दर्शन –

 • राज्य शासकीय अधिकारी / कर्मचायांना चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात
  कोठेही जाण्यास सदर सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे.
 • ही सवलत राज्याच्या
  भौगोलिक सीमेच्या आत अनुज्ञेय आहे.
 • ही सवलत उपभोगतांना कमाल व किमान
  अंतराच्या प्रवासाची अट नाही. परंतु सदर सवलतीचे ठिकाण रजेच्या अर्जाद्वारे घोषित करणे आवश्यक आहे.
 • प्रवास सुरू करण्यापूवी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे.
 • वय 3 ते 12 वर्ष वयोगटातील लहान मुलांना अर्धे तिकीट अनुज्ञेय आहे.
 • या प्रवास सवलतीसाठी निमआराम गाडीचा प्रवास प्रवास अनुज्ञेय असल्यास व अशी आरामगाडी 12 वर्षाखालील मुलांसाठी पूर्ण तिकीट आकारत असल्यास पूर्ण तिकीटाचा प्रवासखर्च अनुज्ञेय राहील.
 • दोन ठिकाणे रेल्वेमार्गाने जोडलेली असल्यास रेल्वेनेच प्रवास करणे आवश्यक आहे. (त्यामुळे आरामागाडीने केलेल्या प्रवासखर्चाची प्रतिपूर्ती रेल्वेच्या अनुज्ञेय वर्गाच्या भाडयाशी सीमित करुन देय राहील.)
 • या सवलतीतर्गंत खाजगी व स्वत:च्या मालकीच्या वाहनाने केलेल्या प्रवासखर्चाची प्रतीपूर्ती संबंधित कर्मचाऱ्यांस अनुज्ञेय असलेल्या रेल्वे/ सार्वजनिक वाहनाच्या भाडयाशी सीमित करुन देय राहील.
 • रजा प्रवास सवलतीसाठी आरक्षण शुल्क (Reservation) देय राहील.
 • रजा प्रवास सवलत उपभोगल्यानंतर प्रवासखर्चाचे देयकांसोबत (Bill सोबत) रेल्वे / बसची तिकीटे सादर करणे बंधनकारक राहील.
 • विमान प्रवास अनुज्ञेय नसलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना या पुढे स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलती अंतर्गत, रेल्वेने जोडलेल्या ठिकाणांदरम्यानचा प्रवास सार्वजनिक /खाजगी विमान कंपन्याच्या विमांनानी करता येईल. मात्र, यासाठी संबंधितास रेल्वेच्या (राजधानी/शताब्दी एक्सप्रेस वगळून अन्य गाड्यांच्या ) अनुज्ञेय वर्गाचे भाडे व विमान प्रवासाचे भाडे यापैकी कमी असलेल्या रकमेची प्रतिपूर्ती मंजूर करण्यात येईल.
 • दावा सादर करतांना, विमानाचे तिकीट/बोर्डींग पास आणि तिकीटावर प्रवासाचे भाडे नमूद केलेले नसेल तर कर्मचाऱ्यांने/अधिकाऱ्यांने भरलेल्या भाडयाची रक्कम दर्शवणारी संबंधित कंपनीची पावतीही सोबत जोडावी लागेल.
 • या शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार देयके मंजूर केली जातात. मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यास वाटले की तो अतिरिक्त कागदपत्र मागू शकतो.तो मंजूर करणाऱ्या अधिकाराचा अधिकार आहे. उदा:- संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांची रजा प्रवास सवलत ज्या ठिकाणची (गणपतीपुळे) मंजूर आहे. त्या ठिकाणची पावती किंवा अजून काही कागदपत्रे मागण्याचा अधिकार संबंधित मंजूर कर्त्यास आहे.
 • या योजनेवरील खर्च, “स्वग्राम रजा प्रवास सवलत” यासाठी खर्ची घालण्यात येणाऱ्या संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखालील ज्या लेखाशिर्षाखाली त्याच्या सहायक अनुदानाचा खर्च, खर्ची घालण्यात येतो, त्या उपलेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व तो चालू आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

गटवर्ष –

 • या सवलतीसाठीच्या पहिल्या गटवर्षाची सुरूवात १ जानेवारी, १९९३ पासून झाल्याचे समजण्यात यावे. त्यामुळे हया गटवर्षाची गणना १९९३ – ९६, १९९७-२०००, २००१- ०४,……… अशी पुढे चालू राहील.
 • या प्रवास सवलतीच्या चार वर्षाच्या एका गटवर्षात दोन म्हणजेच दोन वर्षाच्या एका उपगटवर्षात एक याप्रमाणे स्वग्राम रजा सवलतींचा लाभ अनुज्ञेय राहील.
 • अथवा एका उपगटवर्षात एक स्वग्राम रजा प्रवास सवलत व दुसऱ्या उपगटवर्षात एक महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीचा लाभ अनुज्ञेय राहील.
 • शासकीय कर्मचाऱ्याने सदर सवलत त्या त्या उपगटवर्षात उपभोगणे आवश्यक आहे.
 • मागील उपगटवर्षात न घेतलेली रजा प्रवास सवलत पुढील उपगटवर्षाच्या ३१ डिसेंबर पर्यंत उपभोगणे आवश्यक राहील.
 • त्यांनतर व्यपगत होऊन अनुज्ञेय ठरणार नाही.

गटवर्ष खालीलप्रमाणे गृहीत धरण्यात आले आहेत..

 1. 1993-1996
 2. 1997-2000
 3. 2001-2004
 4. 2005-2008
 5. 2009-2012
 6. 2013-2016
 7. 2017-2020
 8. 2021-2024
 9. 2025-2028
 10. 2029-2032
 11. 2033-2036
 12. 2037-2040
 13. 2041-2044
 14. 2045-2048
 15. 2049-2052
 • राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुख्यालयापासून त्यांच्या स्वग्रामला, घरी जाण्यासाठी चार वर्षाच्या एका गटवर्षात दोन स्वग्राम रजा किंवा एक महाराष्ट्र दर्शन व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे.

कुटुंबाची व्याख्या –

 • स्वग्राम / महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीसाठी कुटूंबियामध्ये केवळ पती किंवा पत्नी व पूर्णपणे अवलंबुन असलेली दोन अपत्ये तसेच आई वडीलांचा समावेश असेल.
 • विधवा महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी दोन आपत्ये तसेच सासूसासरे यांचा समावेश असेल.
 • अधिकारी / कर्मचारी अविवाहित असेल तर महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलती अंतर्गत त्यावर अवलंबुन असनारे आई- वडिल व अवलंबुन असनारे अविवाहीत अज्ञान भाऊ व बहीण यांचेसमवेत सदर रजा सवलत उपभोगता येईल.
 • तथापि या बाबत आई वडील व भाऊ आणि बहीण यांचे रेशनकार्ड कर्मचाऱ्याच्या पत्त्यावरील असणे आवश्यक राहील.
 • दि. १ मे, २००१ पासून केवळ पती / पत्नी व दोन हयात अपत्यांच्या कुटूंबालाच ही सवलत लागू असेल.
 • दि.३० एप्रिल, २००१ रोजी दोन पेक्षा अधिक हयात अपत्ये असतील व त्यांची संख्या नंतर वाढली नसेल तरच अशा कुटूंबास या सवलतीचा लाभ अनुज्ञेय असेल.
 • दि. ३० एप्रिल, २००१ रोजी एकही हयात अपत्य नसलेल्या किंवा एकच हयात अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील हयात अपत्यांची संख्या वरील तारखेनंतर एकाच प्रसूतीमुळे दोनपेक्षा अधिक होत असली तरीही ही सवलत अनुज्ञेय ठरेल.
 • पण सुरवातीला जर जुळे झाले आणि नंतर पुन्हा एक आपत्य झाले तर ही सुवीधा मिळत नाही.

रजेचा कालावधी –

 • सदर सवलतीसाठी कर्मचाऱ्यांस रजेच्या कालावधीची मर्यादा असणार नाही.
 • अल्प रजेत अथवा लागून असलेल्या सार्वजनिक सुट्टयांमध्ये स्वग्रामी जाऊन आल्यास हा लाभ देय राहील. परंतु यासाठी संबधित नियंत्रक अधिकाऱ्याची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक आहे.
 • या प्रयोजनासाठी रजेमध्ये परिवर्तीत रजा, अर्जित रजा, प्रसुती रजा, सरासरी अर्धवेतनी रजा, असाधारण रजा यांचा समावेश असेल.
 • शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना एकत्र किंवा वेगळयाने, त्यांच्या सोयीनुसार प्रवास करता येईल.
 • तसेच प्रतिपूर्ती दावा एकमेकांच्या प्रवासावर अवलंबून राहणार नाही.
 • कुटूंबियांना ही सवलत देय ठरविताना शासकीय कर्मचारी रजेवर असेल किंवा नसेल याचा संबंध असणार नाही. परंतु कुटूंबियांना परतीचा प्रवास जाण्याच्या प्रवास दिनांकापासून सहा महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
 • हा परतीचा प्रवास ज्या गटवर्षात असेल त्याच गटवर्षात गणला जाईल.
 • ज्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब कामाच्या ठिकाणापासून दूर राहत असेल व शासकीय कर्मचारी व त्याचे कुटूंबिय दोन वर्षातून एकदा या सवलतीचा लाभ घेऊ शकत नसल्यास तो एकटा कर्मचारी प्रत्येक वर्षी एकदा ही सवलत उपभोगण्यास पात्र राहील. तसेच अशा कर्मचाऱ्यास महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्या गटवर्षात केवळ एक स्वग्राम व एक महाराष्ट्र दर्शन सवलत उपभोगता येईल.
 • दोघेही पती – पत्नी शासकीय सेवेत असल्यास ही सवलत दोहोंपैकी एकालाच कुटूंबियासह – उपभोगता येईल.
 • तसेच या सवलतीखालील प्रवासखर्चाची मागणी करताना देयकासोबत शासकीय सेवेतील पती अथवा पत्नीकडून या सवलतीचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

भारताबाहेर स्वग्राम असल्यास –

 • शासकीय कर्मचाऱ्याचे स्वग्राम भारताबाहेर असले तरीही ही सवलत अनुज्ञेय आहे.
 • परंतु स्वग्राम घोषणा नियंत्रक अधिकाऱ्याने स्विकृत केली असली पाहिजे.
 • प्रवासखर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात रेल्वे किंवा जलवाहनाचा विचार करता जवळच्या मार्गाने कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेल्या वर्गाच्या भाड्याशी सिमीत करुन प्रतिपूर्ती देय राहील.

प्रवास अग्रीम –

 • या प्रवास सवलतींसाठी अग्रीम अनुज्ञेय आहे.
 • परंतु या अग्रीमाची मर्यादा या तरतूदींखाली उपलब्ध अदांजित अर्थसहाय्याच्या रकमेच्या ४/५ एवढे उपलब्ध होईल.
 • (महत्वाचे) शासकीय कर्मचारी व त्याचे कुटूंबिय यांनी स्वतंत्रपणे प्रवास सवलत उपभोगण्याचे ठरविल्यास वेगवेगळे अग्रीम देय राहील. परंतु ते प्रमाण देयतेवर अवलंबून असेल.
 • स्वग्रामी जाण्याच्या व परतीच्या प्रवासातील अंतर तीन महिन्यांपेक्षा ( ९० दिवस) अधिक असल्यास केवळ जाण्याच्या प्रवासासाठी अग्रीम देय राहील.
 • जेव्हा परतीच्या प्रवासाचा अग्रीम मंजूर झाला असेल, परंतु शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटूंबियाचा स्वग्रामी मुक्काम तीन महिन्यांपेक्षा ( ९० दिवस) अधिक होत असल्याचे स्पष्ट झाले असेल तर ½ अग्रीम ताबडतोब परत करणे आवश्यक आहे.
 • या सवलतीखाली जाण्याचा प्रवास १५ दिवसांच्या आत सुरू करणे शक्य न झाल्यास प्राप्त अग्रीम ताबडतोब परत करणे आवश्यक आहे.
 • परतीच्या प्रवासानंतर एक महिन्याच्या आत प्रवास भत्ता दावा पारित होणे आवश्यक आहे.

स्वियेतर सेवेत (In voluntary service) असतांना रजा प्रवास सवलत – शासकीय कर्मचारी जर स्वियेतर सेवेत असेल तर त्या कर्मचाऱ्यास या तरतूदीखाली रजा प्रवास सवलत घेता येते, तथापि ही बाब त्याच्या स्वियेतर नियुक्तीच्या आदेशांत नमूद करणे आवश्यक आहे. मात्र या सवलतीवरील खर्चाचे दायित्व स्वियेतर नियोक्त्याचे राहील.

प्रवसाकरिता अनुदेय वाहन प्रकार..

Leave a Comment