Night Patroling (रात्रगस्त)

रात्रगस्त

गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच गुन्हा घडल्यानंतर तो लवकरात लवकर उघडकीस आणणे ही पोलिसांची मुख्य कर्तव्ये आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. 

एखाद्या क्षेत्राची सुरक्षितता राखण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी, गुन्हेगारांचे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परीसराची नियमित तपासणी करण्यासाठी रात्रीची गस्त आवश्यक आहे.

रात्रगस्त (नाईट पेट्रोलिंग) अधिकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या क्षेत्राची सुरक्षा आणि सुव्यवस्था  राखण्यासाठी  जबाबदार असतात. त्यांच्या कर्तव्यांमध्ये खालील बाबी समाविष्ट असतात:-

  • सुरक्षा: रात्रीची गस्त एखाद्या विशिष्ट क्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करते. हे क्षेत्र विशेषतः उच्च गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये किंवा जेथे चोरी किंवा घरफोडी होण्याचा धोका आहे अशा ठिकाणी महत्त्वाचे आहे.
  • गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी आणि संशयास्पद वर्तनाच्या इसमांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नियुक्त केलेल्या क्षेत्रामध्ये नियमित गस्त आयोजित करणे.
  • पाळत ठेवणे: रात्रीची गस्त गुन्हेगारांच्या संशयास्पद किंवा असामान्य हालचालींवर निरीक्षण ठेवण्यास देखील मदत करते. संभाव्य सुरक्षा धोके ओळखण्यात आणि गुन्हेगारी रोखण्यात मदत करू शकते.
  • रात्रगस्त कर्मचारी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालत असल्याने, त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते आणि सामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना वाढीस लागते.
  • आपत्कालीन प्रतिसाद: आपत्कालीन परिस्थितीत रात्रीची गस्त देखील महत्त्वाची असते. आग, वैद्यकीय आणीबाणी किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारखी आपत्कालीन परिस्थिती असल्यास, गस्तीवर असलेले कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती लवकर ओळखण्यास आणि त्वरीत योग्य प्रतिसाद देण्यास मदत करू शकतात.
  • नागरीकांकडुन आलेल्या सेवेच्या कॉलला प्रतिसाद देणे आणि त्यांच्या शिफ्ट दरम्यान घडणारे गुन्हे, अपघात किंवा इतर घटनांना त्वरीत प्रतीसाद देणे.
  • आवश्यकतेनुसार इतर कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी किंवा आपत्कालीन सेवा कर्मचार्‍यांना सहाय्यता प्रदान करणे. (RTO, Ambulance etc.)
  • सार्वजनिक सुरक्षेला चालना देण्यासाठी वाहतूक थांबे (नाकाबंदी) आयोजित करणे आणि वाहतूक कायद्यांची अंमलबजावणी करणे.
  • व्यवसायीक आणि सार्वजनिक इमारती सुरक्षित आहेत आणि त्यात सक्तीने प्रवेश केल्याची कोणतीही चिन्हे नाहीत याची खात्री करण्यासाठी बाहेरुन ढोबळमाणाने तपासनी करणे.
  • ज्या नागरिकांना मदतीची आवश्यकता असू शकते त्यांना मदत प्रदान करणे, जसे की दिशा दाखविणे किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत मदत देणे.
  • अहवाल लिहिणे:  त्यांच्या शिफ्ट दरम्यान घडणाऱ्या कोणत्याही घटना किंवा गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण करणे.
  • कोणत्याही घटनांना त्वरीत व योग्य प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी कर्मचार्‍यांशी संवाद राखणे.

(एकंदरीत, रात्रीच्या गस्ती अधिकार्‍यांचे कर्तव्य, त्यांच्या शिफ्ट दरम्यान सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखणे आणि उद्भवलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य कारवाई करणे हे आहे.

ग्रामीन भागात रात्रगस्त दरम्यान गस्तीसाठी मोठा परीसर असतो, त्यामुळे रात्रगस्त अधिकारी व कर्मचारी यांनी मिळुन सहकार्याने ही गस्त करणे अपेक्षीत आहे. सोबत पोलीस मित्र व गावातील पोलीस पाटील यांचे सहकार्य घ्यावे. 

  • ग्रामीण भागामध्ये गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी रात्रीची गस्त हा अविभाज्य भाग आहे.
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात रात्री २३ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हद्दीत हद्द विभागून त्याचे बीट प्रमाणे गस्तीसाठी प्रत्येक बीटात २ कर्मचारी लाठी, शिटी, टॉर्च, शस्त्रासह कर्मचारी नेमले जातात.
  • रात्रगस्त चे कर्मचारींनी आपले बीटचा संपूर्ण भाग फिरून शिटी वाजविणे, लोकांना थांबवून चौकशी करणे, दरम्यान संशयित इसम आढळून आल्यास ताब्यात घेणे. तसेच त्यांच्या बीटातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अधूनमधून चेक करावे. त्यांचे फोटो कढुन रात्रगस्त अधिकाऱ्यांस व इतर रात्रगस्त कर्मचाऱ्यांना सोशल मिडीयाचे माध्यमातुन पाठवावे. जेनेकरुन तो इतर ठिकानी मिळुन आल्यास त्यावर पाळत ठेवता येईल.
  • मंदिर, मठ, मशिद, दर्गा, उजाड वस्त्या या भागात गस्त ठेवणे, पडक्या इमारती, वस्ती असलेला भाग येथे गस्त करावयाची असते.
  • पोलीसांच्या या गस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनचा रात्रगस्त अधिकारी सरकारी वाहनाने किंवा इतर प्रकारे सोबत गस्तीच्या कर्मचाऱ्यांची यादी घेवून रात्री २३ ते पहाटे ५ वाजेदरम्यान प्रत्येक बीटातील कर्मचारी वेळोवेळी चेक करतो.
  • रात्रगस्त अधिकारी रात्रगस्त कर्मचारींना सूचना देतो व कर्मचाऱ्यांकडे असणाऱ्या नोटबुकांवर तारीख वेळ टाकून सही करतो.
  • रात्रगस्त वरील या सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी ५ वाजेनंतर ड्युटी संपवून पोलीस ठाणेत परत येऊन पोलीस स्टेशन डायरीत नोंद करायची असते.
  • पहाटे ५ ते ६ या दरम्यान गुन्हे शोध पथक (D.B.)  कर्मचाऱ्यांनी हद्दीत गस्त केल्यास पहाटेच्या वेळेस चोरटे चोरीचा माल घेऊन जात असताना सहज मिळून येतात.

शहरी गस्त-

  • शहरात घेण्यात येणारी गस्त ही हद्दीचे नियम पाडून एरीया प्रमाणे लावण्यात येते.
  • शहरातील रात्रगस्तची वेळ रात्री २३ ते पहाटे ५ पर्यंत असते.
  • रात्रगस्त कर्मचारी त्यांच्या एरीया मध्ये गस्त घालत असताना त्यांच्या एरीया मध्ये बँका, सराफाची दुकाने, जेलचा परिसर, ट्रेझरी गार्ड याशिवाय संवेदनशील भाग, वेगवेगळे पुतळे, मंदिर, मशिद, मठाचा परिसर, बस स्टैंड, रेल्वे स्टेशन परिसर येथे गस्त घालतात.
  • पोलीस ठाण्याचा रात्रगस्त अधिकारी या रात्रगस्त कर्मचारींना चेक करतो.
  • विभागानुसार वरिष्ठ अधिकारीसुद्धा रात्रगस्त कर्मचारी चेक करतात.

रात्रगस्तचे साहीत्य.

  • रात्रगस्त ही नेहमी पोलीस ड्रेसवर करावी.
  • D.B. कर्मचारींनी गरजे प्रमाणे सिव्हील ड्रेस वर करावी.
  • लाठी – काठी.
  • टार्च.
  • शिट्टी पोलीसांची.
  • पेन – कोरे कागद.
  • मोबाईल आवश्यक मोबाईल नंबर सह (त्वरीत संपर्क करीता).
  • मोबाईल मध्ये हद्दीतील, (पोलीस स्टेशन व जिल्याच्या) सवईचे गुन्हेगारांची फोटोसह यादी.

Leave a Comment