फिशिंग (Phishing)
कोर्ट पैरवी अधिकारी
Phishing फिशिंग :- ऑन लाईन पासवर्डची माहिती, फिशिंग ई मेल्स / एसएमएस, पाठवून ग्राहकास कपाटाने/गैरमार्गाने स्वत:चे बॅक खात्याची संपुर्ण माहिती म्हणजेच, युजर नेम, पासवर्ड इत्यादी बाबतची माहिती मिळवून ग्रहकाचे रक्कमेचा अपहार करणे.
- फिर्यादी / बळीत व्यक्ती कडून त्याचे बँक खात्याचे स्टेटमेंट प्राप्त करुन घेणे. त्यास संधिग्ध व्यवहारची नोंद स्पष्ट असावी. (फिर्यादी कडुन भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घ्यावे.)
- बँक खात्याचे स्टेटमेंट वरुन बॅक ट्रान्झेक्शन कोणत्या प्रकारे झाले आहे याची माहिती घ्यावी.
- Online Transaction झाले असल्याचे दिसून आल्यास संबधित बँकेकडून संशयित व्यवहाराचे I.P. Address with Date and Time ची माहिती प्राप्त करुन घेणे. (संबधित बॅक कडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
- Online Transaction बाबतीत संबधित बँकेकडून प्राप्त झालेले I. P. Address with Date and Time संबंधीत Internet Service Provider यांना पाठवून त्याचे Physical Location ची माहिती करुन घेणे. (संबधितांकडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.) मिळालेल्या लोकेशन वर जावुन, तेथील संबंधीत संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व ते वापरणारा आरोपी निश्चित करुन त्यास अटक करुन पुढील तपास करणे.
- आरोपीने संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईल नंबर ची माहिती फिर्यादी व्यक्तीकडून प्राप्त करुन घेणे.
- संबधित मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कडून संशयित Mobile Number चे SDR/CDR प्राप्त करुन घेणे. (संबधितांकडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
- आरोपीचे Mobile Number चे SDR मधील प्राप्त पत्ता व I.P Address ps Physical Address चा प्राप्त पत्ता या ठिकाणी तपास करुन तेथे गुन्हयाशी संबधित मिळून आलेली संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व ते वापरणारा आरोपी निश्चित करुन आवश्यकतेनुसार त्यास अटक करुन पुढील तपास करणे.
- गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय मिळणेसाठी पाठविणे.
- साक्षीदारांचे जबाब नोंदविणे.
- गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.