डाटा चोरी (Data Theft )

डाटा चोरी (Data Theft ) investigation

डाटा थेफ्ट :- संगणकातुन, संगणक मालकाच्या परवानगी शिवाय पेन ड्राईव्ह, वाय फाय इ. मार्गाद्वारे अनधिकृतपणे  डाटा चोरी करणे.

डाटा चोरी (Data Theft ) चा तपास…

  • फिर्यादी व्यक्ती कडून लॉग्ज प्राप्त करुन घेणे. (Print Outs of Server Logs) (फिर्यादी कडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) चे प्रमाणपत्र घेणे.)
  • संशयित IP Address with Date and Time तसेच आरोपीताचे E-mail ID ची माहिती प्राप्त करुन घेणे.
  • प्राप्त झालेले IP Address with Date and Time आय.पी., दिनांक व वेळ संबधित Internet Service Provider यांना पाठवून संशयित संगणक शोधणे. (Internet Service Provider कडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) चे प्रमाणपत्र घेणे.)
  • Internet Service Provider यांचेकडून प्राप्त झालेली माहिती म्हणजेच Physical Location येथे प्रत्यक्ष भेट देवुन तेथील संबधित संगणक पंचनामा करुन ताब्यात घेणे व संशयित आरोपीस अटक करणे.
  • प्राप्त झालेले E-mail ID ई मेल आय. डी. संबधित ई मेल सर्व्हिस प्रोव्हायडर E-mail Service Address Provider यांना पाठवून संशयित I. P. with InternetService Date and Provider Time हे संबधित यांना पाठवून त्यांचे Physical Location माहिती करुन घेणे. (ई मेल सर्व्हिस प्रोव्हायडर कडून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) चे प्रमाणपत्र घेणे.)
  • मिळालेल्या पत्यावर जावुन तेथील संबधित संगणक साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व ते वापरणारा आरोपी निश्चित करुन त्यास अटक करुन पुढील तपास करणे.
  • गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय मिळणेसाठी पाठविणे.
  • साक्षीदारांचे जबाब नोंदविणे.
  • गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.

Leave a Comment