पोलीस पाटील (Police Patil)
पोलीस पाटील बाबत
पोलीस पाटील ची नेमणूक…
- ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमणूक करण्यात येते.
- जिल्हाधिकारी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, कलम 5(1) नुसार पोलीस पाटील ची नियुक्ती करतात.
- गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे काम पोलीस पाटील करतात.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात.
- पोलीस पाटीलाना खाजगी नोकरी करता येत नाही, 24 तास गावामध्ये हजर राहावे लागते, गाव सोडून जाता येत नाही.
पोलीस पाटलांची सर्वसाधारण कामे कामे..
- गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करणे,
- लोकन्यायालयात पंच म्हणून कार्य करुन प्रकरणे निकालात काढण्यास मदत करणे,
- पोलीस तपासात अत्यंत गंभीर व इतर गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती व ठावठिकाणा काढून त्यांना पकडून देण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत करणे,
- गावातील सण, उत्सव, यात्रा, निवडणुका या सर्वच घडामोडींवर लक्ष ठेऊन त्या शांततेत पार पाडणे,
- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे निमंत्रक म्हणून काम पाहणे इ. अनेक कामे पोलीस पाटील हे त्यांच्या कर्तव्यात पार पाडत असतात.
पोलीस पाटील ना राज्यपाल पुरस्कार देण्याबाबत.
-:विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्काराकरिता पोलीस पाटलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.:-
- पुरस्कारासाठी पोलीस पाटील यांची सेवा किमान 10 वर्षे झालेली असावी तसेच संबंधित पोलीस पाटील यांना उल्लेखनिय कामाकरीता 10 प्रशस्तीपत्रके मिळालेली असावी.
- त्यांच्याविरुध्द न्यायालयात कोणताही खटला नसावा.
- चारित्र्य व सचोटी निर्विवाद असावी.
- कोणतीही लहान अथवा मोठी प्रशासकीय न्यायालयीन शिक्षा झालेली नसावी..
-:उल्लेखनिय शौर्य पुरस्काराकरिता पोलीस पाटलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक राहील:-
- यासाठी किती सेवा झाली याची अट नसावी. मात्र त्यासंबंधी केवळ घटना प्रसंग लक्षात घेण्यात यावा. (उल्लेखनीय कामगिरी)
- त्यांच्याविरुध्द न्यायालयात कोणताही खटला नसावा.
- चारित्र्य व सचोटी निर्विवाद असावी.
- कोणतीही लहान अथवा मोठी प्रशासकीय न्यायालयीन शिक्षा झालेली नसावी.
पोलीस पाटील संदर्भात महत्वाचे कायदे व शासन निर्णय..
उपरोक्त शासन निर्णय नुसार पोलीस पाटलांना खालील प्रमाणे सुविधा देण्यात आल्या..
- राज्यातील पोलीस पाटील यांना सध्या देण्यात येणारे मानधन दरमहा रुपये 3000/- वरुन रुपये 6500/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- पोलीस पाटील कल्याण निधीची (वेलफेअर फंड) स्थापना करुन त्यामध्ये पोलीस पाटील यांच्या वाढीव मानधनामधुन दरमहा रुपये 500/- जमा करण्यास मान्यता देण्यात येतो. सदर शासन निर्णय क्रमांकः बिव्हीपी- 0818/प्र.क्र.95/पोल-8 जमा रक्कमेचा विनियोग पोलीस पाटील यांना 1) राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना 2) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व अटल पेंशन योजना (केंद्र शासन पुरस्कृत) या योजनांचा लाभ देण्यासाठी करण्यात यावी. तथापि, या योजनेसाठीची वर्गणी रुपये 500/- पेक्षा जास्त झाल्यास, ती पोलीस पाटील यांच्या मानधनातुन भरण्यात येतो.
- नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी कारवाईमध्ये पोलीस पाटील यांचा मृत्यु झाल्यास, त्यांच्या वारसांना रुपये 1 लाख इतके देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानामध्ये रुपये 5 लाख (अक्षरी रुपये पाच लाख रुपये फक्त) एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- राज्यातील पोलीस पाटील यांना राज्यपाल पुरस्कारासाठी देण्यात येणारी पुरस्कार रक्कम रुपये 5000/- वरुन रुपये 25000/- (अक्षरी रुपये पंच्चवीस हजार फक्त) इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वाचा क्र. 2) येथील शासन निर्णय दि. 01/10/2008 च्या जोड पत्राप्रमाणे नमूद अटी / शर्ती कायम ठेवण्यात आल्या आहेत.