पोलीस पाटील (Police Patil)

पोलीस पाटील बाबत

पोलीस पाटील ची नेमणूक…

 • ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमणूक करण्यात येते.
 • जिल्हाधिकारी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, कलम 5(1) नुसार पोलीस पाटील ची नियुक्ती करतात.
 • गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे काम पोलीस पाटील करतात.
 • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात.
 • पोलीस पाटीलाना खाजगी नोकरी करता येत नाही, 24 तास गावामध्ये हजर राहावे लागते, गाव सोडून जाता येत नाही.

पोलीस पाटलांची सर्वसाधारण कामे कामे..

 • गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करणे,
 • लोकन्यायालयात पंच म्हणून कार्य करुन प्रकरणे निकालात काढण्यास मदत करणे,
 • पोलीस तपासात अत्यंत गंभीर व इतर गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती व ठावठिकाणा काढून त्यांना पकडून देण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत करणे,
 • गावातील सण, उत्सव, यात्रा, निवडणुका या सर्वच घडामोडींवर लक्ष ठेऊन त्या शांततेत पार पाडणे,
 • महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे निमंत्रक म्हणून काम पाहणे इ. अनेक कामे पोलीस पाटील हे त्यांच्या कर्तव्यात पार पाडत असतात.

पोलीस पाटील ना राज्यपाल पुरस्कार देण्याबाबत.

-:विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्काराकरिता पोलीस पाटलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.:-

 • पुरस्कारासाठी पोलीस पाटील यांची सेवा किमान 10 वर्षे झालेली असावी तसेच संबंधित पोलीस पाटील यांना उल्लेखनिय कामाकरीता 10 प्रशस्तीपत्रके मिळालेली असावी.
 • त्यांच्याविरुध्द न्यायालयात कोणताही खटला नसावा.
 • चारित्र्य व सचोटी निर्विवाद असावी.
 • कोणतीही लहान अथवा मोठी प्रशासकीय न्यायालयीन शिक्षा झालेली नसावी.. 

-:उल्लेखनिय शौर्य पुरस्काराकरिता पोलीस पाटलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक राहील:-

 • यासाठी किती सेवा झाली याची अट नसावी. मात्र त्यासंबंधी केवळ घटना प्रसंग लक्षात घेण्यात यावा. (उल्लेखनीय कामगिरी)
 • त्यांच्याविरुध्द न्यायालयात कोणताही खटला नसावा.
 • चारित्र्य व सचोटी निर्विवाद असावी.
 • कोणतीही लहान अथवा मोठी प्रशासकीय न्यायालयीन शिक्षा झालेली नसावी.

पोलीस पाटील संदर्भात महत्वाचे कायदे व शासन निर्णय..

GR : पोलीस पाटील याांच्या मानधनात, राज्यपाल पुरस्कार रक्कमेमध्ये तसेच सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 08/03/2019. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा..)

उपरोक्त शासन निर्णय नुसार पोलीस पाटलांना खालील प्रमाणे सुविधा देण्यात आल्या..

 • राज्यातील पोलीस पाटील यांना सध्या देण्यात येणारे मानधन दरमहा रुपये 3000/- वरुन रुपये 6500/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 • पोलीस पाटील कल्याण निधीची (वेलफेअर फंड) स्थापना करुन त्यामध्ये पोलीस पाटील यांच्या वाढीव मानधनामधुन दरमहा रुपये 500/- जमा करण्यास मान्यता देण्यात येतो. सदर शासन निर्णय क्रमांकः बिव्हीपी- 0818/प्र.क्र.95/पोल-8 जमा रक्कमेचा विनियोग पोलीस पाटील यांना 1) राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना 2) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व अटल पेंशन योजना (केंद्र शासन पुरस्कृत) या योजनांचा लाभ देण्यासाठी करण्यात यावी. तथापि, या योजनेसाठीची वर्गणी रुपये 500/- पेक्षा जास्त झाल्यास, ती पोलीस पाटील यांच्या मानधनातुन भरण्यात येतो.
 • नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी कारवाईमध्ये पोलीस पाटील यांचा मृत्यु झाल्यास, त्यांच्या वारसांना रुपये 1 लाख इतके देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानामध्ये रुपये 5 लाख (अक्षरी रुपये पाच लाख रुपये फक्त) एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 • राज्यातील पोलीस पाटील यांना राज्यपाल पुरस्कारासाठी देण्यात येणारी पुरस्कार रक्कम रुपये 5000/- वरुन रुपये 25000/- (अक्षरी रुपये पंच्चवीस हजार फक्त) इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वाचा क्र. 2) येथील शासन निर्णय दि. 01/10/2008 च्या जोड पत्राप्रमाणे नमूद अटी / शर्ती कायम ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment