News / बातमी

आंतरिक सुरक्षा सेवा पदक.- (Last Chance)

  1. आंतरिक सुरक्षा सेवा पदक, हे पदक गडचिरोली जिल्हा सारख्या कठीण परिस्थिती असणाऱ्या जिल्ह्यात दोन वर्ष काम केल्यास, केंद्र शासन कडून प्रदान केले जाते. मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे कडून जवानांची निवड केली जाते.
  2. सध्या हे पदक 17/09/2022 मध्ये केंद्र शासन GR अन्वये  बंद करण्यात आले आहे.
  3. परंतु सर्वसाधारण पणे असे लक्षात येते की, बरेच पोलिस बांधवांना हे पदक त्यांची अहर्ता असताना सुद्धा काही कारणास्तव प्राप्त झाले नाही.
  4. तरी गडचिरोली जिल्हा पोलीस दला कडून खालील प्रमाणे What’s App मेसेज चे माध्यमातून आव्हान करण्यात आले आहे. ते आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत. (आवाहन :- शहानिशा करून च कार्यवाही करावी.)

सर्व सहकारी अधिकारी/कर्मचारी वर्ग, 2022 पासून आंतरीक सुरक्षा पदक बंद झाले आहे, परंतु शेवटची संधी म्हणून नावे पाठविण्यात येत आहे तरी आपण आवश्यक ती कार्यवाही करावी.

*बक्षीस शाखा गडचिरोली कडुन आंतरिक सुरक्षा सेवा पदक संबंधाने सुचना👇*


1) सदर *पदक* ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यापुर्वी *मिळालेला नाही त्यांचीच नावे पाठवावी, मिळालेल्यांनी नावे देऊ नये.* संबंधीत बारनिशी यांनी रजा वा इतर कारणास्तव बाहेर असणा-यांशी संपर्क साधुन निकष पुर्ण करणा-यांची नावे समाविष्ट करुन एकच यादी तयार करुन घ्यावी.

2) *इंग्रजीमध्ये पुर्ण नाव, पदनाम/ब.नं. व सेवा कालावधी* (अधिकारी – गडचिरोली जिल्ह्यात यापुर्वीचा सेवा कालावधी व सध्या जिल्यातील आमद) अंमलदार – भरती तारिख )

3) *माहिती Excel मध्ये तयार करुन hard copy* (प्रभारी अधिकारी यांचे स्वाक्षरीची)* *soft copy pendriveमध्ये संबंधीत sdpo कार्यालया मार्फतीनेच सादर करावी* (गडचिरोलीतील स्थानिक सर्व शाखांनी reward branch ला थेट आणुन द्यावी.

गडचिरोली जिल्हा बदलून गेलेल्या अधिकारी/कर्मचारी ना सूचना.

4) *केवळ जिल्हा बदली झालेल्या अधिकारी व अंमलदारांनीच पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना उद्देशुन स्वताचे नावाने अर्ज करावे. त्यात गडचिरोली पोस्टींग, कालावधी, बदलीचे गेलेबाबतचा उल्लेख करावा. sign करुन अर्जाची pdf rewardscell@gmail.com वर पाठवावे*

Leave a Comment