कोंबीग ऑपरेशन
कोंबीग ऑपरेशन
कोंबीग ऑपरेशन (combing operation) (हद्दीतील आरोपींची ठिकाणे पिंजून काढणे) गरज..
- पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडनारे जिवीतहानी व वित्तहानी संबंधीचे गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेनेकामी.
- महत्त्वाचे सणवार इ. वेळी गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, परीसरात शांतता राहावी, याकरिता कोंबीग ऑपरेशनची कारवाई केली जाते. यात संशयित ठिकाणे लॉजेस, हॉटेल्स, वेश्यावस्ती, झोपडपट्टीचा भाग पिंजून काढला जातो.
- कोंबीग ऑपरेशन चे कारवाईत पाहिजे असलेले आरोपी, फरार आरोपी, संशयीत इसम, चोरीचा माल इ. मिळुन येतात.
- बरेचदा गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण होऊन ते पोलीस स्टेशन हद्दीतुन निघूनही जातात. यामुळे सहाजीकच गुन्ह्यांना प्रतिबंध होतो.
- पोलीसाच्या दृष्टीने ही कारवाई, गुन्हे प्रतिबंधाच्या संबंधाने अतिशय महत्वपुर्ण असते. या कार्यवाहीमुळे गुन्हेगारांवरती वचक निर्माण होतो, त्यामुळे जनमानसात सुरक्षेची भावना वाढीस लागते व पोलीसांविषयी आदर निर्मान होतो.
कोंबीग ऑपरेशन (combing operation) दरम्यान घ्यायचे साहीत्य..
- पुरेसा बंदोबस्त:- कोंबींग ऑपरेशन दरम्यान बरेचदा, पोलींसांना, आरोपींचे लपण्याची ठिकाने, वेश्यावस्ती, निर्जन ठिकाणे, अशा ठिकानी जावे लागते, त्या ठिकानची परिस्थिती पोलीसांना अनुकुल असतेच असे नाही. त्या मुळे मुबलक बंदोबस्त आवश्यक असतो.
- टिम तयार करावी:- प्रत्येक टिममध्ये अधिकारी, DB पथकाचे कर्मचारी, सशस्त्र जवान, महिला कर्मचारी, सोबत लाठी, बिनतारी संच इ. घ्यावे.
- हिस्ट्रीशिटर्स, माहितगार गुन्हेगार यांचे नावे व फोटो अल्बम. ( मोबाईल मध्ये फोटो व्हिडीओ तयार केल्यास उत्तम )
कोंबीग ऑपरेशन (combing operation) दरम्यान करायची कार्यवाही..
- टिम तयार करावी:- प्रत्येक टिममध्ये अधिकारी, DB पथकाचे कर्मचारी, सशस्त्र जवान, महिला कर्मचारी, सोबत लाठी, बिनतारी संच इ. घ्यावे. तसेच हिस्ट्रीशिटर्स, माहितगार गुन्हेगार यांचे नावे व फोटो अल्बम. ( मोबाईल मध्ये फोटो/व्हिडीओ अल्बम तयार केल्यास उत्तम )
- कोंबीग करावयाची वस्ती, भाग निश्चित करून त्या-त्या भागात जानकार कर्मचारी सोबत टिम पाठवावी. पाठविलेल्या टिम ने त्यांना दिलेला परीसर पंजुन काढावा. त्यांनी अवैद्य दारूचे अड्डे, संशयित ठिकाणे, लॉजेस, हॉटेल्स, वेश्यावस्ती, झोपडपट्टीचा भाग पिंजून काढवा.
- अवैद्य दारू मुद्देमाल, चोरीचा मुद्देमाल, सवयीचे चोरी करणारे, हिस्ट्रीशिटर्स, माहितगार गुन्हेगार, चेक करून त्यांचेवर गुन्ह्यासंदर्भात विचारपुस करावी. बरेचदा मिळालेल्या तडीपार इसमांवरती संबंधित कायद्यान्वये कार्यवाही केली जाते.