वार्षीक तपासनी

पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) यांची वार्षिक तपासणी ( Yearly Inspection )

पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) वार्षिक तपासणी..

  • वार्षीक तपासनीचा उद्देश हा पोलीस स्टेशन चे कामाचा आढावा घेवुन त्याचे मुल्यमापन करणे हा असतो. तपासनी दरम्यान कामकाजात काही उनिवा जानवल्या तर सुचना देवुन त्या पुर्ण करुन घेतल्या जातात. एकंदरीत पोलीस स्टेशन चे काम दिलेल्या नियमांप्रमाणे, संकेताप्रमाणे होत आहे किंवा नाही याची पडतळनी केली जाते.
  • ग्रामीन भागातील पोलीस ठाण्याची व दुरक्षेत्राची वार्षिक तपासणी दरवर्षी जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (SDPO) हे घेत असतात.
  • शहरी भागात पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त हे सुद्धा पोलीस ठाण्याची तपासणी (इन्स्पेक्शन) घेत असतात.

पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) च्या वार्षिक तपासणी दरम्यान करायची कामे..

A) अभिलेख तपासनी.

  • इन्स्पेक्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून संबंधित पोलीस स्टेशनला आगाऊ वार्षिक तपासणीची तारीख कळविली जाते.
  • तारीख मिळाल्या नंतर पोलीस ठाण्यातील व आऊट पोस्टावरील रेकॉर्ड अद्यावत केले जाते.
  • तपासावर असलेले गुन्हे जप्त मुद्देमाल, केस डायऱ्या, गोपनिय कामकाजाचे रेकॉर्ड, क्राईमचे रेकॉर्ड हे अद्यावत करण्यात येतात.
  • तपासणीच्या वेळेला संबंधित अधिकारी रेकॉर्ड तपासून तसेच मुद्देमाल चेक करून त्यावर सुचना, त्रुटी नमुद करून तपासल्याचे सह्या करतात.
  • त्याचप्रमाणे लॉकअप व लॉकअप रजिस्टर चेक केले जाते.
  • मोहरर कडील डे-बुक, रोख रक्कम ही तपासून पडताळणी केली जाते.

B) परेड व दरबार.

  • अभिलेख तपासनी झाल्यावर इन्स्पेक्शन घेनारे अधिकारी एक दिवस परेड व दरबारची तारीख देतात.
  • इन्स्पेक्शन घेनारे अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची परेड घेतात, त्यांचा गणवेश बघतात.
  • कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक हे समक्ष कर्मचाऱ्याला बोलावून चेक केले जाते.  त्याची कामगिरी, त्याची चारित्र्य, त्याच्या अडी-अडचणी, पदोन्नती बाबत विचारपुस करून नोंदी घेतल्या जातात.
  • वरीष्ठ कर्मचाऱ्यास समोर बोलावून त्यांना कायद्याचे व कामाचे कितपत ज्ञान आहे हे पडताळले जाते. बरेचदा परिक्षा सुध्दा घेतली जाते.
  • कर्मचाऱ्यांच्या गणवेश व कामगिरीबाबत बक्षिस सुध्दा दिले जाते.
  • पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार घेऊन त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या जातात, व ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जातो.

पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) वार्षिक तपासणी दरम्यान तपासाचा अभीलेख..

Leave a Comment