तपास पथक (D.B.)

तपास पथक (D.B.)

तपास पथक म्हणजे D.B.=Detective Branch..

  • एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये तपास पथक ठेवायचे की नाही हा निर्णय पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारींचा आसतो.
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात  तपासाकामासाठी उत्साही, होतकरु, कामाची आवड असलेले, ज्यांना कसलेही काम सांगीतले तरी लगेच तयार राहनारे, तसेच युक्तीने कामे करणारे कर्मचारी तपास पथकात निवडले जातात.
  • त्यांचा प्रमुख म्हणून PSI / ASI / हवालदार दर्जाचा अधिकारी असतो.

तपास पथक कामे (D.B.)..

  • तपास पथकाने पोलीस ठाण्यात दाखल होनारे जिवीतहानी व माला संबंधाचे गुन्हे पडताळावे.
  • इतर दाखल गुन्ह्यात आरोपी हवे आहे का हे पाहून त्वरीत आरोपी अटकेची कारवाई करावी.
  • चोरटे शक्यतो मध्यरात्री चोरी करतात व पहाटे पर्यंत आपल्या इश्चित स्थळी पोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रात्री फिरून चोरट्यांचा शोध या तपास पथकाकडुन घेतला जातो.
  • परीसरातील बकी पोलीस ठाण्यात गुन्हेगार अटक आहेत का, त्याची गुन्हे करण्याची शैली कशी आहे, त्यांनी गुन्ह्याची ठिकाणी कशी निवडली आहे, याची माहीती घ्यावी. या माहीती च्या आधारे अशा प्रकारचे गुन्हे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये घडले आहेत काय हे बघावे. संबंधीत आरोपीची विचारपुस करून गुन्हा उघडकीस आनावा.
  •  पथकाताल कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बातमीदार असावेत.
  • बातमीदारांकडुन गुन्हेगार, गुन्हेगार टोळ्या, गुन्ह्याची ठिकाणी यांची माहिती मिळवून गुन्हे उघडकीस आणणे / गुन्ह्यांना प्रतिबंध करणे ही कामे तपास पथकातील कर्मचारी करतात.

Leave a Comment