ईमेल चा वापर करुन केलेल्या गुन्ह्याचा तपास

ईमेल चा वापर करुन केलेल्या गुन्ह्याचा तपास

ई मेल्स द्वारे केलेले गुन्हे:-

 • अश्लिल, घाणेरडे, धमकीचे, अपमानकारक, अभद्र, बदनामीकारक ई मेल्स प्रसारीत करणे.
 • व्यवसाईक ईमेल धारकाचे ईमेल हॅक करुन त्यांना व्यवसायात मोठा नुकसान घडविणे.

ईमेल्स द्वारे केलेल्या गुन्ह्याचा तपास :-

 • प्राप्त झालेले अश्लिल, बदनामीकारक ई मेल्सचे प्रिंटआउट्स फिर्यादी कडून प्राप्त करुन घ्या. (फिर्यादी कडुन भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणे त्या फोटोचा प्रमाणपत्र घ्या.)
 • अश्लिल, बदनामीकारक ई मेल्सचे फुल हेडर्सचे प्रिंट आउट्स फिर्यादी कडून प्राप्त करुन घेणे. (फिर्यादी कडुन त्या बाबतचा भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) चा प्रमाणपत्र घेणे.)
 • अश्लिल, बदनामीकारक ई मेल आय.डी. बाबत संबधित ई मेल सर्विस प्रोव्हायडर यांच्याकडून I.P Address with Date and Time आय.पी, दिनांक व वेळ सह लॉग्स् प्राप्त करुन घेणे. (ई मेल सर्विस प्रोव्हायडर कडुन, भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
 • तसेच email तयार करताना, verification साठी, दुसरा मोबाईल नंबर/ दुसरा email address वापरला असेल तर तो सुद्धा ई मेल सर्विस प्रोव्हायडर यांच्याकडून मागवून घ्यावा. जेणकरून आपल्याला तपास व पुराव्याचे भरपर पर्याय उपलब्ध होतील. तसेच सह आरोपी असल्यास शोध लागेल.
 • ई मेल सर्विस प्रोव्हायडर कडुन प्राप्त झालेले IP Address with Date and Time हे संबंधित Internet Service Provider (ISP) यांना पाठवून त्याचे Physical Address प्राप्त करुन घ्यावे.
 • मोबाईल नंबर मिळाले असतील तर संबंधितांकडून  त्याचा सीडीआर/एसडीआर/लोकेशन मागवून घ्यावे.
 • IP यांच्या कडून प्राप्त झालेली माहिती म्हणजेच Physical Address येथे प्रत्यक्ष भेट देवुन तेथील संबधित संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व संशयित आरोपी निश्चित करुन आवश्यकते नुसार अटक करणे.
 • गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय/अहवाल मिळणेसाठी पाठविणे.
 • साक्षीदारांचे जबाब नोंदविणे.
 • गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.

Leave a Comment