पोलीस ठाणे लॉकअप गार्ड

लॉकअप गार्ड

पोलीस ठाणे लॉकअप गार्ड..

  • ज्या पोलीस ठाण्यात लॉकअपची व्यवस्था आहे किंवा ज्या ठिकानी आरोपी ठेवला जातो त्या ठिकानी आरोपी सोबत सतत आरोपी गार्ड लावला जातो.
  • आरोपी गार्ड मध्ये ०१ हवालदार ०३ पोलीस कॉन्स्टेबल गार्ड ड्युटीकरीता नेमले जातात.
  • सदर गार्ड ड्युटी मधिल हवालदार हा गार्ड अंमलदार म्हणुन काम पाहतो. ते इतर कर्मचारी व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री करतो.
  • ज्या पोलीस शिपाईची गार्ड ड्युटी चालु असते तो एका वेळेला सलग दोन तास आरोपी समोर सशस्त्र पहारा देतो.
  • लॉकअप गार्ड ड्युटीवरील पोलीस कर्मचारी दर २४ तासाला बदलले गेले जावेत.
  • लॉकअप गार्ड पहाऱ्यावर असनाऱ्या कर्मचाऱ्या खेरीज गार्ड ड्युटीवरील इतर कर्मचाऱ्यांनी गार्ड ड्युटीच्या ठिकाणीच आराम करायचा असतो, त्यांना तेथून जाण्याची परवानगी नसते. (आरोपीचा सांभाळ हा आरोपी गार्ड वरील सर्व पोलीस कर्मचारींची जबाबदारी असते.)

लॉकअप गार्ड ची कामे..

  • लॉकअप गार्ड ड्युटी मधिल हवालदार दर्जाचा कर्मचारी हा गार्ड अंमलदार म्हणुन काम पाहतो.
  • गार्ड अंमलदार हा इतर कर्मचारी व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री करतो व त्यांचे वर नियंत्रण ठेवतो.
  • ज्या पोलीस शिपाईची गार्ड ड्युटी चालु असते तो एका वेळेला सलग दोन तास आरोपी समोर सशस्त्र पहारा देण्याचे काम करतो. त्या नंतर दुसरा अंमलदार पाहाऱ्यावर येतो. हि ड्युटी अशी सतत चालु असते.
  • लॉकअप गार्ड पहाऱ्यावर असनाऱ्या कर्मचाऱ्या खेरीज गार्ड ड्युटीवरील इतर कर्मचाऱ्यांनी गार्ड ड्युटीच्या ठिकाणीच आराम करायचा असतो, त्यांना तेथून जाण्याची परवानगी नसते. (आरोपीचा सांभाळ हा आरोपी गार्ड वरील सर्व पोलीस कर्मचारींची जबाबदारी असते. कुणाचेही गार्ड ड्युटीवर कुठलीही अप्रीय घटना घडल्यास त्या अंमलदारासोबत इतर सर्वांना जबाबदार धरले जाते.)
  • लॉकअप गार्ड अंमलदार सेंट्री ड्युटी रजिस्टर व लॉकअप रजिस्टर हे लिहीत असतो.
  • अटकेतील आरोपींचे सामान, पैसे याच्या नोंदीचे रजिस्टर ही लॉक अप गार्ड अंमलदार अद्यावत करतो.
  • आरोपींना जेवण देण्याचे काम तसेच आरोपी तपासकामी बाहेर काढणे व आत ठेवण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत असतात. त्याच्या नोंदी आरोपी आवक-जावक रजिस्टर व स्टेशन डायरीमध्ये केल्या पाहिजे.
  • आरोपी सोबत असतांना कुठल्याही संभ्रमाच्या परीस्थितीत ड्युटी चालु असनारे पाहारेकरींनी आपल्या सोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागे करून, त्याच्या सोबत चर्चा करून कारवाई केली पाहिजे. तपाशी अधिकारी व पोलीस ठाने प्रभारी यास त्वरीत परीस्थिती बाबत अवगत केले पाहीजे.
  • लॉकअप मध्ये सतत नजर ठेवावी. लॉकमधील आरोपींची नियमित चेकींग करावी. काही संक्षयीत वस्तु आढळल्यास त्वरीत आरोपीचे ताब्यातुन बाहेर काढावी. लगेच तपाशी अधिकारी व पोलीस ठाने प्रभारी यास कळवुन त्याचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करावी व स्टेशन डायरी नोंदी घ्याव्यात.
  • काही आरोपी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याने खचुन गेलेले असतात. पोलीस कोठडीत टाकल्याने त्यांना आत्मग्लानी ने घेरले असते अशा वेळेस, लॉकअप गार्ड मधिल कर्मचारींनी, आपल्या ताब्यातील आरोपी आत्महत्या करणार नाही. तसेच तशी संधीही त्याला उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्यावी. (Death in Custody, लॉकअप मधील आरोपीची मृत्यु हा कुठल्याही आरोपी गार्ड, तपासी अधिकारी व संबंधित प्रभारी अधिकारी यांच्या जिवनातील सर्वात कुटू क्षण, दुःस्वप्न (Nightmare) असते. त्यामुळे नियमाप्रमाणेच कार्यवाही होतेय याचाच या प्रक्रियेतील सर्वांनी आग्रह धरावा.)
  • ताब्यात दिलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासनी झाली काय, आरोपीची अटक रजिस्टर व स्टेशन डायरीत नोंद झाली काय, कोठडी आवक जावक रजिष्टर ला नोंदी घेतल्या काय, या बाबत खात्री करावी. त्या शिवाय आरोपी लॉकअपमध्ये ठेवण्यास किंवा लॉकअप मधून काढण्यास मनाई करावी.
  • आरोपीची वैद्यकीय तपासणी लॉकअपमध्ये टाकण्यापूर्वी केली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. मोठ्या प्रमाणात जखमा असल्यास किंवा आरोपीची गुप्त माराणे अथवा अन्य कारणाने तब्येत ढासळत आहे असे वाटल्यास,  त्याबाबत त्वरीत, तपाशी अधिकारी व पोलीस ठाने प्रभारी अधिकारी यांना कळवावे.

लॉकअप गार्ड ने सांभाळायचा अभिलेख….

  • सेंट्री ड्युटी रजिस्टर (पहारेकरी रजिष्टर)
  • लॉकअप रजिष्टर,
  • आरोपीच्या सामानाचे रजिष्टर,
  • आरोपी आवक-जावक रजिष्टर (आरोपींना जेवण देण्याचे काम तसेच आरोपी बाहेर काढणे व आत ठेवण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत असतात. त्याच्या नोंदी आरोपी आवक-जावक रजिस्टर व सोबत-सोबत स्टेशन डायरीमध्ये केल्या पाहिजेत.
  • मानवी हक्क रजिष्टर,
  • सर्वोच्च न्यायालयाच्या अटीचे रजिष्टर,

सर्वोच्च न्यायालय, डी.के. बासु यांची आरोपी अटके बाबत मार्गदर्शक तत्वे..

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

Leave a Comment