गोपनिय शाखा

गोपनिय शाखे बाबत

 • हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल (PC), नाईक पोलीस कॉन्स्टेबल (NPC), पोलीस हवालदार (HC), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो.

गोपनिय ड्युटी कर्मचारी ची कामे..

 • आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आसलेल्या तसेच नजिकच्या भविष्यात होणारे सार्वजनीक  कार्यक्रम, त्याचे स्वरुप, उद्देश, कार्यक्रमास किती  जनसमुदाय उपस्थित राहु शकातो यांची आगावु माहीती काढणे व प्रभारी अधिकारी यांना व वरीष्ठ कार्यालय यांना देणे.
 • कायदा व सुव्यवस्था संबंधीची माहिती आगाऊ गोळा करून वरिष्ठांना देणे.
 • काही संभाव्य घटना घडणार असतील त्याची आगाऊ माहिती गोळा करणे व तात्काळ प्रभारी अधिकाऱ्याला देणे ही प्रामुख्याने जबाबदारी आहे.
 • गोपनिय ड्युटी कर्मचारी हा साध्या कपड्यात ड्युटी करीत असतो.
 • मोर्चा, धरणे, आंदोलन, संप, रास्ता रोको, विविध राजकीय कार्यक्रम तसेच धार्मिक सण, सामाजिक कार्यक्रम यांचे अग्रीम अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठविणे.
 • कार्यक्रम संपल्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून प्रभारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करणे.
 • चारित्र्य तपासणी, पारपत्र तपासणी ही सुद्धा कामे त्यांस करावी लागतात.
 • गोपनिय अहवाल प्रभारी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने वरिष्ठांना सादर करण्याचे काम करतो.
 • वाद्य परवाना, स्फोटक परवाना, आर्म लायसन्स याची पडताळणीची कामे करावी लागतात.
 • हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो.

गोपनिय ड्युटी कर्मचारी यांच्याकडे असलेले अभिलेख – –

 • वाद्य परवाना रजिष्टर
 • हत्यार परवाना धारक रजिष्टर
 • परवानगी रजिष्टर (सर्व कार्यक्रमाच्या)
 • स्फोटक परवाना धारक रजिष्टर
 • पासपोर्ट रजिष्टर
 • चारित्र्य वर्तणूक रजिष्टर
 • गुंडा रजिष्टर
 • कॉन्फीडीशल ए-१ कायम स्वरुपाचे अभिलेख
 • कॉन्फीडीशल ए-२ सुरक्षा संबंध परिपत्रके
 • सी-१ (ड) विशिष्ट गुन्हे व गुन्हेगारीची कार्यपद्धती
 • सी-१(अ) पोलीस ठाण्याची रचना
 • सी-२ कोण कसे ?
 • बी-३ लुक आऊट नोटीस
 • बी – ४ साप्ताहीक गोपनिय आठवडा डायरी
 • बी-५ गोपनिय आवक-जावक रजिष्टर
 • सी- १ (क) गंभीर जातीय घटना
 • सी-१ (ग) वाहतुक समस्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या
 • सी-३ पक्षनिहाय माहिती

“A” अभिलेख

A-१) कायमस्वरुपी परिपत्रके, शासन निर्णय फाईल (कायम स्वरुपी )

पोलीस आयुक्त कार्यालयाकडून (विशेष शाखेकडून ) प्राप्त होणारे स्थायी स्वरुपाचे गोपनिय परिपत्रके / शासन निर्णय या फाईलमध्ये संकलीत करून प्राप्त झालेले शासन निर्णय / परिपत्रके कर्मचाऱ्यांना रोलकॉलवर सतत दोन वेळा वाचन करून दाखवावेत. तसेच प्राप्त परिपत्रकांच्या अनुक्रमणिकेवर दिनांक निहाय नोंदी घ्यावेत.

A-२) अतिमहत्त्वाच्या/महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत परिपत्रके फाईल (कायमस्वरुपी)

पोलीस आयुक्त कार्यालयाकडून (विशेष शाखेकडून) प्राप्त होणारे अतिमहत्त्वाच्या / महत्त्वांच्या व्यक्तींना शासनाने दिलेल्या सुरक्षा संदर्भात शासनाचे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सर्व प्रकारचे सुचना पत्र, परिपत्रके संकलित करावेत. तसेच प्राप्त सुचना पत्र, परिपत्रकांच्या दिनांक निहाय अनुक्रमणिकेवर नोंद घ्यावेत.

“B” अभिलेख

B-१) पोलीस निरीक्षक यांची गोपनिय आठवडा डायरी फाईल (एका वर्षाकरीता) ज्या ठिकाणी पोलीस निरीक्षक दर्जाचा प्रभारी अधिकारी नेमणुकीस आहे, त्यांनी त्याच्या गोपनिय आठवडा डायऱ्या वरिष्ठांना मुदतीत पाठवून स्थळप्रती यांत संकलीत करावेत.

B-२) सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक यांची गोपनिय आठवडा डायरी फाईल (एका वष अकरिता)

ज्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा प्रभारी अधिकारी नेमणुकीस आहे व त्यांनी त्याच्या गोपनिय आठवडा डायऱ्या वरिष्ठांना मुदतीत पाठवून स्थळप्रती यात संकलित करावेत.

B-३) लुक आऊट नोटीसा फाईल (कायमस्वरुपी)

ज्या व्यक्ती संघटना / समित्या / मंडळाच्या सामाजविघातक, राष्ट्र विघातक हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत गुप्तवार्ता विभागाकडून सूचना करण्यात येतात त्या पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखेकडून पुरविण्यात येतात. अशा सर्व प्रकारच्या लुक आऊट नोटीसा यामध्ये संकलीत करावेत. तसेच प्राप्त झालेल्या लुक आऊट नोटीसांचा हेतु साध्य करण्यासाठी त्या नोटीसा / परिपत्रके पोलीस कर्मचाऱ्यांना सतत दोन दिवस रोलकॉलवर वाचन करून दाखवावे. तसेच प्राप्त नोटीसांची परिपत्रकांची अनुक्रमणिकेवर दिनांकनिहाय नोंद घ्यावेत.

B-४) संकिर्ण स्वरुपाचे गोपनिय परिपत्रके व पत्रव्यवहार फाईल

ज्या इंग्रजी व मराठी परिपत्रकांद्वारे शासन / राज्य गुप्तवार्ता विभाग / पोलीस महासंचालक / पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी यांचेकडून कार्यवाही करून अहवाल मागविला जातो अशा सर्व प्रकारच्या पत्रव्यवहारांना यात समावेश करून केलेल्या कार्यवाहीचा अहवालासह यामध्ये संकलीत करावेत.

B-५) गोपनिय पत्रव्यवहाराचे आवक व जावक रजिस्टर्स (पाच वर्ष )

दोन्ही रजिस्टर विहीत नमुन्यात ठेवावेत. (१) आवक रजिस्टरमध्ये वरिष्ठ व इतर कार्यालयाकडून प्राप्त पत्रव्यवहाराच्या आणि (२) जावक रजिस्टरमध्ये वरिष्ठ व इतर कार्यालयाकडे केलेल्या गोपनिय पत्रव्यवहाराच्या यात नोंदी घ्यावेत. तसेच आवक रजिस्टरमध्ये जावक केलेल्या आणि जावक रजिस्टरमध्ये आवक केलेल्या संदर्भाच्या क्रॉस नोंदी घेऊन दरमहा प्रलंबीत प्रकरणाचा मासिक अहवाल महिन्याचे शेवटी काढावा.

“C” अभिलेख

C-१) पोलीस स्टेशनबाबत कायम स्वरुपी गोपनिय माहिती बाबत फाईल

(सदर फाईल मधील A, B, C, D, E, F आणि G या मथळ्याखाली विभागणी करून पुर्नबांधणी करावी.)

A – Organissation of the Police Station (Under this head of full description with the

strenghth and disposition of the Police Station Force should be given)

B – Recrtuting its sources and difficulties

C – Existion of Serious Communal Trouble or faction in the Police Station.

D- Description of special forms of crime and criminal elements pertaining to the police stration, with notes on methods adopted for prevenction, investigation & control.

E- Subversive of revolutionary movement of any kind in the police station. F- Strikes and Labour unrest in the police station.

G – Other matter of particular interest in the police station, such as traffic probems, amenties to policeman, probibition, etc.

येणेप्रमाणे मुद्दे निहाय दर सहा महिन्यांनी किंवा आवश्यकतेनुसार व बदलीनंतर पदभार सोडताना प्रभारी अधिकाऱ्याने स्वतः सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करून नाव व पदनाम नमुद करावे. सदरील मथळ्याखाली स्वतः प्रभारी अधिकाऱ्यांनी सविस्तर नोंदी घेण्याचे काम दुय्यम कर्मचाऱ्यांवर सोपवू नयेत.

C-२) हुज हु (कोण कसा?) फाईल (कायम स्वरुपी )

पो.स्टे. च्या ए-१ फाईलमधील परिपत्रक क्रमांक एलआयबी / ५६३/६१, दिनांक १८/०३/१९६१ अन्वये करण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे सोबत जोडून पुरविण्यात आलेले प्रपत्रक “क” हे प्रत्येक व्यक्तीसाठी फाईलमध्ये समाविष्ट करून फाईलची पुनर्बांधणी करावी. नमुद विहीत प्रपत्रात सदर फाईलमध्ये कार्यक्षेत्रातील राजकीय / सामाजिक / शैक्षणिक / सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींची तसेच पोलीसांच्या कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप करणाऱ्या, प्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक सुरक्षिततेस बाधा निर्माण करणाऱ्या सक्रिय व्यक्तींची आणि कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी पोलीस प्रशासनास मदत करणाऱ्यांची माहिती संकलीत करावी. ज्या ज्या वेळी हालचाली आढळून येतील त्या त्या वेळी अथवा दर सहा महिन्यांनी बी – २ गोपनिय आठवडा डारीवरून प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतहस्ताक्षरातसविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करावी. स्वाक्षरीखाली प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतः नाव व पदनाम नमुद करावे. नोंदी घेण्याचे काम दुय्यम कर्मचाऱ्यांवर सोपवू नये. सदर नोंदी टंकलिखित स्वरुपात असू नयेत.

C-३) राजकीय पक्ष / संघटना/दले / समित्या यांच्या हालचालीबाबत माहिती फाईल (कायम स्वरुपी )

पो.स्टे. च्या ए-१ फाईल मधील परिपत्रक क्रमांक एलआयबी / ५६३/६१, दि. १८/०३/१९६१ अन्वये करण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे सोबत जोडून पुरविण्यात आलेले प्रपत्रक ड हे प्रत्येक पक्ष / संघटनांसाठी धार्मिक संघटना / समित्या/दले / मंडळे यांच्या बाबतची माहिती संकलीत करावी. ज्या ज्या वेळी त्यांच्या हालचाली निदर्शनास येतील त्या त्या वेळी अथवा दर सहा महिन्यांनी बी-२ गोपनिय आठवडा डायरीवरून प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतः सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करावी आणि स्वाक्षरीखाली प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतः नाव व पदनाम नमुद करावे. नोंदी घेण्याचे काम दुय्यम कर्मचाऱ्यावर सोपवू नये.

C-४) वार्षिक निरीक्षण टिप्पण फाईल (कायम स्वरुपी)

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनिय अभिलेखाचे केलेले निरीक्षण टिप्पण आणि त्याबाबत केलेल्या सविस्तर पुर्तता अहवालाच्या स्थळ प्रतीचा यात समावेश करावा.

C-५) योजना फाईल (कायम स्वरुपी )

सदर फाईलमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या (स्किमस्) योजनाचा अंतर्भाव करून आवश्यक त्या त्या वेळी सदरील योजनाची रंगीत तालीम घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करावा.

C-६) गोपनिय पुस्तके फाईल (कायम स्वरुपी)

ए-१ फाईलमधील परिपत्रक क्रमांक जिवीशा / औ/८८/५६१७ दिनांक २५/१०/१९८८ मधील मुद्दा क्र. (६) मध्ये करण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे सदर फाईलमध्ये या कार्यालयाकडून पुरविण्यात आलेली खालील पुस्तके सेट कस्टडीमध्ये ठेवावेत. तसेच सदर पुस्तकांचा दर वर्षी १ जानेवारीला वार्षिक सेफ कस्टडीत सुरक्षित ताबा प्रमाणपत्र पोलीस आयुक्त कार्यालयास (विशेष शाखेस) सादर करावे.

गाईड लाईन्स फॉर डिलींग विथ कम्युनल डिस्टर्बन्सेस (इंग्रजी पुस्तक) जातीय दंगली हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे (मराठी पुस्तक)

C-७) गुंडा रजिस्टर ( कायम स्वरुपी)

सदर रजिस्टरमध्ये पो.स्टे. च्या ए-१ फाईल मधील पोलीस उपमहानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद यांचे गोपनिय परिपत्रक मेमो क्र. एसबी / १३३ / ८६ / १२९, दि. ०१/०३/१९८७ अन्वये व इतर वेळोवेळी विविध परिपत्रकान्वये केलेल्या सुचनाप्रमाणे ए, बी आणि सी या तीन वर्गवारीमध्ये कार्यक्षेत्रातील सक्रीय गुन्हेगारांची माहिती संकलीत करून आवश्यकतेनुसार ए-१ फाईल मधील परिपत्रक क्र. एलआयबी / १३५२/१९६९, दिनांक १३/१०/१९५९ अन्वये पुरविलेले शासन परिपत्रक क्र. एस. बी. – II ईएक्सटी ४०५९, दि. ०८/१०/२१९५९ अन्वये केलेल्या सुचना प्रमाणे सदरील गुंडावर वेळोवेळी योग्य ती कायदेशीर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. –

“ए” नोन गुंडा (माहितगार )

“बी” पोटेन्शीयल गुंड

“सी” कोणत्याही राजकीय परिस्थितीचा फायदा घेणारे गुंड

“डी” चाकूने भोसकणारे

“ई” माहितगार जुगार अड्डे चालवणारे व खेळणारे

“एफ” दारुचे अड्डे चालवणारे (नोन बुटलेगर्स)

“जी” इतर

C-८) रेकॉर्ड रुळी (जुने कालबाह्य गोपनिय अभिलेख नाश करावयाचे रजिस्टर ( कायम स्वरुपी )

पो.स्टे.च्या ए-१ फाईल मधील परिपत्रक क्रमांक जिविशा / औ/ ८८/५३७१ दि. १९/१०/१९८८ अन्वये केलेल्या सुचनानुसार नमुद केलेल्या प्रपत्रात रजिस्टर ठेवावे. त्यातील नमुद मुदतनिहाय रजिस्टरमध्ये ए, बी, सी वर्गवारी निहाय अभिलेखाची छाननी करून कोणतेही गोपनिय अभिलेख कोणाचे आदेशावरून कोणत्या तारखेस किती नास केले याची सविस्तर नोंद करून त्याखाली दिनांकासह स्वाक्षरी करावी.

C-९) चारित्र्य पडताळणी रजिस्टर ( कायम स्वरुपी )

अ. क्र. / प्राप्त झालेल्या संकलनाचा क्रमांक व दिनांक / प्राप्त झाल्याचा आवक क्रमांक व दिनांक / कोणास पाठविले त्या कार्यालयाचे नाव / निर्गती केल्याचा जावक क्रमांक व दिनांक / अभिप्राय या प्रपत्रात रजिस्टर ठेवावे, सदर रजिस्टरमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून इतर कार्यालयाकडून आस्थापनाकडून प्राप्त होणारे ( नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांचे विशेष दंडाधिकाऱ्यांचे, शस्त्र परवाने, परमिट रूम, हॉटेल, ढाबे, स्फोटके विक्रीचे, पासपोर्ट (पातपत्र) व इतर संदर्भातील चारित्र्य पडताळणी करून पाठविलेल्या अहवालाची माहिती ठेवावी.

C-१०) परकिय नागरिकाबाबतचे रजिस्टर (कायम स्वरुपी )

ए-१ फाईल मधील परिपत्रक क्रमांक एलआयबी / ७०२/५९, दि. २१/०५/१९५९ मध्ये करण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे सदर रजिस्टरमध्ये परकिय / विदेशी नागरिकांची माहिती ठेवावी.

C-११) हिंदु हालचाली रजिस्टर ( कामय स्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये हिंदु धर्मीयांचे वेळोवेळी होणारे सण उत्सव मेळावे इत्यादी बाबत ठाणेदार यांनी सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करून त्याखाली नाव व पदनाम नमुद करावे.

C-१२) दलित हालचाली रजिस्टर ( कायम स्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये दलितांचे वेळोवेळी होणारे सण उत्सव मेळावे इत्यादी बाबत ठाणेदार यांनी सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करून त्याखाली नाव व पदनाम नमुद करावे.

C-१३) मुस्लीम हालचाली रजिस्टर ( कायम स्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये मुस्लीम समाजाचे वेळोवेळी होणारे सण उत्सव मेळावे इत्यादी बाबत ठाणेदार यांनी सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करून त्याखाली नाव व पदनाम नमुद करावे.

C-१४) ख्रिश्चन हालचाली रजिस्टर (कायमस्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये ख्रिश्चनाचे वेळोवेळी होणारे सण उत्सव मेळावे इत्यादी बाबत ठाणेदार यांनी सविस्तर नोंदी घेऊन त्याखाली स्वाक्षरी करून त्याखाली नाव व पदनाम नमुद करावे.

C-१५) विधानसभा / लोकसभा / स्थानिक स्वराज्य / शिक्षक / पदवीधर, जिल्हा परिषद/पंचायत समिती / ग्राम पंचायत व इतर निवडणुकांबाबत माहिती रजिस्टर

यामध्ये कार्यक्षेत्रात वेळोवेळी झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुका आचारसंहिता भंगाचे दाखल झालेले गुन्हे व त्यांची निर्गती इत्यादीची (पक्ष / संघटना / गट निहाय) बाबतची सविस्तर माहिती ठेवावी.

C-१६) कार्यक्षेत्रातील स्फोटके विक्री परवाना धारकांचे रजिस्टर ( कायम स्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील ठोक / किरकोळ विक्री परवाना धारकांची माहिती ठेवावी. अ.क्र./परवानाधारकाचे नाव संपूर्ण / परवाना क्रमांक / नुतनीकरणाचा दिनांक / तपासणीचा दिनांक तपासणी अधिकाऱ्याचे नाव व पदनाम / अभिप्राय या इत्यादी ह्या प्रपत्रात माहिती ठेवावी.

C-१७) कार्यक्षेत्रातील शस्त्र परवाना धारकांचे रजिस्टर (कायमस्वरुपी )

सदर रजिस्टरमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील शस्त्र परवाना धारकांची माहिती ठेवावी. (अ.क्र. / शस्त्र परवाना धारकाचे संपूर्ण नाव व संपूर्ण / परवाना क्रमांक / शस्त्र क्रमांक व नुतनीकरणाचा दिनांक / क्षेत्र / अभिप्राय वगैरे ह्या प्रपत्रात माहिती ठेवावी.

C-१८) हॉटेल धाबे, खानावळ परवानाधारक, आस्थापनांची माहिती रजिस्टर ( कायमस्वरुपी )

कार्यक्षेत्रातील एफएल-३, एफएल-२, हॉटेल धाबे ह्या आस्थापनांची सविस्तर माहिती ठेवावी. अनु. क्रमांक परवाना धारकाचे संपूर्ण व संपूर्ण / परवाना क्रमांक व प्रार/ नुतनीकरणाचा चालविण्याचा कालावधी / अभिप्राय वगैरे ह्या प्रपत्रात माहिती ठेवावी.

C- १९) खाजगी सुरक्षा परवानाधारक आस्थापनांची माहिती रजिस्टर कायम स्वरुपी

कार्यक्षेत्रातील परवाना खाजगी सुरक्षा परवानाधारक आस्थापनाची माहिती ठेवावी. (सदर रजिस्टरमध्ये अनुक्रमांक परवाना धारकाचे संपूर्ण नाव व संपूर्ण परवाना क्रमांक / कार्यक्षेत्र केल्याचा दिनांक व स्वाक्षरी / तपासणी अधिकाऱ्यांचे नावे व पदनाम / अभिप्राय आणि वगैरे ह्या रजिस्टरमध्ये माहिती ठेवावी.

पासपोर्ट

केवळ फौजदारी खटला प्रलंबित असल्याने पासपोर्टचे नूतनीकरण नाकारले जाऊ शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय

 • एखाद्या व्यक्तीच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज केवळ त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित असल्याने फेटाळू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 • न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीवर केवळ फौजदारी कारवाई प्रलंबित राहणे, त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण नाकारण्यासाठी पुरेसे नाही.
 • या बाबतीत. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, विक्रोळी यांनी याचिकाकर्त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास परवानगी नाकारली होती, ज्यावर कलम 406, 420, 120(b) RW कलम 34 IPC नोंदवण्यात आले होते.
 • या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, एक आरोपी फरार आहे आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली होती.
 • अपीलमध्ये, उच्च न्यायालयाने नमूद केले की याचिकाकर्त्याला जुलै 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत यूएसला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्याने आधीच्या प्रवासाबाबत न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा कोणताही आरोप नाही. याचिकाकर्त्याला उड्डाणाचा धोका आहे असे सुचविणारे काहीही रेकॉर्डवर नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.
 • याचिकाकर्त्याला अटकपूर्व जामीन देण्याच्या अटींपैकी एक अट ही आहे की, त्याला परदेशात जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने घातलेली अट पाहता तपास यंत्रणेची भीती अनावश्यक आहे.
 • त्यामुळे न्यायालयाने दंडाधिकार्‍यांचा आदेश बाजूला ठेवला आणि पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळू नये, असे निर्देश पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Comment