ईमेल हॅकिंग चा तपास

ईमेल हॅकिंगचे गुन्ह्याचा तपास कसा करावा ?

ईमेल हॅकींग – एखाद्या अधिकृत ई-मेल आयडीचा गैरमार्गाने पासवर्ड मिळवून प्रवेश करणे व, स्वत:च्या फायद्यासाठी माहितीचा वापर करणे.

ईमेल हॅकींग ने केलेले गुन्हे ?

  • ई-मेल मधील मधील माहिती नष्ट करणे,
  • स्वत:च्या फायद्यासाठी चोरलेल्या माहितीचा वापर करणे,
  • तसेच अभद्र ई मेल्स पाठविणे,
  • भितीदायक ईमेल पाठवुन पैशाची मागणी करणे..

ईमेल हॅकिंगच्या गुन्ह्याचा तपास…

  • हॅक झालेल्या ई मेल आयडी वरु पाठविण्यात आलेल्या ई मेल्सचे Print Outs फिर्यादी कडून प्राप्त करुन घेणे. (त्या बाबातचे, भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) चे प्रमाणपत्र घेणे.)
  • हॅक झालेल्या ई मेल आय.डी. वरुन पाठविण्यात आलेल्य ई मेल्सचे फुल हेडर्स Full Headers चे Print Outs फिर्यादी कडून प्राप्त करुन घेणे. (त्या बाबतचे भारतीय पुरावा कायदा कलम ६५  (ब) चे प्रमाणपत्र घेणे.)
  • हॅक झालेल्या ई मेल आय. डी. बाबत संबधित ई मेल सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याकडून तिचे IP Address with Date and Time प्राप्त करुन घेणे. (हि माहीती प्रप्त करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील, पोलीस अधिक्षक कार्यालयातील, सायबर सेल चा वापर करावा.)
  • प्राप्त झालेले IP Address with Date and Time हे संबधित Internet Service Provider (ISP) यांना पाठवून त्याचे Physical Address प्राप्त करुन घेणे. (संबधित Internet Service Provider (ISP) कडुन भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब) प्रमाणपत्र घेणे.)
  • ISP यांच्या कडून प्राप्त झालेली माहिती म्हणजेच Physical Address येथे प्रत्यक्ष भेट देवुन तेथील संबधित संगणकीय साधने पंचनामा करुन ताब्यात घेणे व संशयित आरोपी निश्चित करुन आवश्यकते नुसार अटक करणे.
  • गुन्हयात वापरलेली संगणकीय साधने न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, येथे तपासणी होऊन अभिप्राय अहवाल मिळणेसाठी पाठविणे.
  • साक्षीदारांचे जबाब नोंदवावे.
  • गुन्हयाचे दोषारोप पत्र कोर्टात सादर करणे.

Leave a Comment