स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा अॅक्ट ) १९५६

 • Prevention of Immoral Trafficking Act १९५६
 • स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा अॅक्ट) १९५६
 • पिटा कायदयांतर्गत विशेष पोलीस अधिकारी कोणास म्हणावे :–
 • पिटा कायद्यांतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून, पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी नसणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. ( त्याचे अवलोकन करून त्यानुसारच या कायद्या अंतर्गत कारवाई करावी.)
 • गृह विभाग नोटीफिकेशन नंबर / पी पी ए / ०२०६ / सी आर- ५७ / एस पीएल- ६ दिनांक १४/०३/२००६ व पीपीए / १९९१ / २ / पोल-८/दिनांक २०/०७/१९९२ अन्वये पिटा कायद्यांतर्गत विशेष पोलीस  अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे.

 

 • छापा टाकणेपुर्वी करावयाची कारवाई –

१. मानवी तस्करीची माहीती प्राप्त झालेनंतर जर तपास अधिकारी स्वतः विशेष पोलीस अधिकारी नसतील तर सदर कुंटणखान्याचे झडती वॉरंट घ्यावे. वॉरंट घेणेसाठीही वेळ नसेल अथवा विलंब होत असेल तर पंचनाम्यामधे अथवा स्टेशन डायरी मध्ये तसा उल्लेख करावा.

२. ज्या भागात छापा टाकावयाचा आहे त्या भागातील दोन प्रतिष्ठीत  पंचाना हजर राहणेबाबत लेखी समन्स ध्यावे.

३. छापापुर्व पंचनामा जेथुन खबर मिळाली तेथुन सुरू करावा. उदा.-पोलीस स्टेशनमधे खबर मिळाली असल्यास पोलीस स्टेशन मधुन छापापुर्व पंचनाम्यास सुरवात करावी. 

४. पंचनामा दरम्यान इतर काही साहीत्य वापरायाचे असल्यास पंचनाम्यात योग्य पद्धतीने तपासाचे रेकार्डवर येतील याची दक्षता घ्यावी. उदा.- छाप्यात वापर करावयाचे नोटांचे झेरॉक्स काढावी व त्यावर पंचांच्या सहया घ्याव्यात. त्याचा उल्लेख छापापुर्व  पंचनाम्यात करावा.

५. छाप्यास जाताना सोबत कमीत कमी दोन महीला अधिकारी अथवा अंमलदार घेवुन जावेत.

६. पंचाना व सोबतचे स्टाफला छाप्याचा उद्देश सांगावा. परंतु गोपनियता ठेवायची असेल तर पंचनाम्यामध्ये व स्टेशन डायरीमधे तशी नोंद घ्यावी.

७. छाप्यासाठी एक बनावट गि-हाईक तयार करावे. सदर बनावटी गि-हाईकास पंचनाम्यातील नोटा ध्याव्यात व त्यास काय कारवाई करावयाची आहे हे समजुन सांगावे.

 • छापा टाकताना करावयाची कारवाई-

१. बनावट गि-हाईकासमवेत एका पंचास पाठवावे.

२. छापा टाकलेनंतर कुंटनखान्यात मिळालेले मॅनेजर, मालक व पिडीतेला महीला कर्मचारी यांचे मदतीने ताब्यात घ्यावे.

३. तेथे मिळुन आलेले इतर  गिऱ्हाईक व पिडीतेची अंगझडती ही महीला अंमलदार अथवा महीला पंच यांचेकरवी घ्यावी. तसेच सदर ठिकाणची झडती घेवुन तेथे मिळुन आलेल्या बनावट गिऱ्हाईकासोबत दिलेल्या नोटा हस्तगत करून त्या कशाप्रकारे हस्तगत केल्या हे पंचनाम्यात नमुद करावे.

४. झेरॉक्स काढलेल्या नोटा व छाप्यात मिळालेल्या नोटा यांची पडताळणी करावी. त्याचा उल्लेख पंचनाम्यात करावा. (सदर ठिकाणची व्हिडीओ अथवा फोटोग्राफी घेतांना ही कार्यवाही टिपली याची काळजी घ्यावी.)

५. छापा टाकलेनंतर तेथे मिळुन आलेल्या मालक व पिडीतेचे जबाब घ्यावेत.

६. चौकशीमधे आरोपी कोण, बळीत कोण आहेत हे निष्पन्न करावे व गुन्हा दाखल करावा. पिडीत महिला व आरोपी यांचे मुळ पत्त्याबाबत तपास करावा.

७. कुंटणखान्यातील खोल्यांची परिस्थीती सदर ठिकाणी असलेल्या खाट व बिछान्याची स्थिती तसेच पीडीतेकडे मिळुन आलेले सामानाची माहीती, केराच्या पेटीतील कचरा इ. माहिती, पंचनाम्यामधे नमुद करावी. तसेच कंडोमचे विविध पाकिटे सापडल्यास त्याचा उल्लेख पंचनाम्यामध्ये करावा. (सदर ठिकाणची व्हिडीओ अथवा फोटोग्राफी करावी.)

 • छापा टाकलेनंतर करावयाची कारवाई-

१. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करावे. तसेच पीडीत महीलांची वैदयकीय तपासणी करून त्यांना तात्पुरते रेस्कयु होम (महीला संरक्षण गृह) मध्ये ठेवावे व मा. न्यायालयासमोर हजर करावे व त्यांचे अभिरक्षेबाबत न्यायालयाकडुन आदेश घ्यावेत.

२. बळीत मुलगी जर १८ वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर तिलाही रेस्क्यु होम मधे तात्पुरते ठेवुन तिला बालकल्याण समिती समोर हजर करावे व तिचे बाबत पुढील आदेश घ्यावेत.

३. सदर कुंटणखान्याचे आजुबाजुस राहणारे रहीवाशी दुकानदार यांचेकडे तपास करून सदर जागा ही कुंटणखाना चालवणेसाठी वापर करत होते. या संबंधीचा पुरावा गोळा करावा. तसेच आजुबाजुस राहणारे सामाजीक कार्यकर्ते, महीला संघटनांचे पदाधिकारी यांचेकडे तपास करून त्यांची टिपणे नोंदवावीत.

४. सदर कुंटणखाना कोणाचे नावावर आहे याबाबत ग्रामपंचायत/नगरपालीका यांचेकडुन दाखला घ्यावा.

५. कुंटणखाना हा धार्मिकस्थळ शाळा मंदीर यांचेपासून २०० मीटर अंतरावर असेल तर पीटा कायदयांतर्गत कलम ७ लावावे व गुन्हा दाखल झालेनंतर १५ दिवसाचे आत पीटा अॅक्ट कलम १८(१) अन्वये कुंटणखाना सिलबंद करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त क्षेत्रात मा. पोलीस आयुक्त यांचेकडे व पोलीस अधिक्षक क्षेत्रात मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवावा व त्यावर सुनावणी होवुन आदेश झालेनंतर कुंटणखाना सिलबंद करावा.

६. कुंटणखान्याचे जागेचा वापर स्वतः मालक करत असेल तर अथवा त्याने कुंटणखान्यास जागा भाडयाने जागा दिली असेल तर घर मालकाला सुध्दा आरोपी करावे, भाडेकरार कागदपत्रात सामील करावा.

७. कुंटणखान्यातील वेश्यांचे संबंधाने मालकाने काही रेकॉर्ड ठेवले आहे किंवा काय किंवा तेथे असलेल्या वेश्यांना पैसे देत असलेबाबत काही कागदपत्रे मिळते काय याचा तपास करावा. मिळून आल्यास कागदपत्रे जप्त करावीत.

८. सदर ठिकाणी कुंटणखाना चालवला जातो या संबंधी लोकांकडुन तक्रारी अर्ज आले असल्यास अथवा स्थानिक वर्तमान पत्रात बातमी आली असेल तर त्याचे कात्रण करून तपासाचे कागदपत्रात सामील करावे.

९. कुटनखाना छाप्यात हजर असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे जबाब नोंदवावेत. त्यानी केलेल्या कामानुसार जबाबत विवीधता असावी. Copy & Paste जबाब नोंदवु नये.

१०. हल्ली कुंटणखाना चालवणारे किंवा महीलांचे अनैतिक व्यापार करणारे बँक व्यवहाराने व्यवसाय करतात. रोख रक्कम स्वीकारत नाही. त्याकरिता मॅनेजर व मालकांचे बँक अकाउंटचे स्टेटमेंट चेक करावे व संशयित वाटल्यास अकाऊंट फ्रीज करावे.

११. पिडीत महीला या  मालकापर्यंत अथवा कुंटनखाना चालविणारे पर्यंत कशा पोहोचल्या. त्यातुन त्यांची तस्करी होते काय याचा तपास करावा. त्याकरिता मालक / मॅनेजर / पीडीत महीला यांचे सी. डी. आर. काढावेत.

१२. पिडीत महीला ही परदेशी व्यक्ती असेल तर तिचा पासपोर्ट व व्हिसा पंचनाम्याने जप्त करावा व न्यायालयाकडुन आदेश घेवुन तो एफ. आर. ओ. मार्फतीने तिचे मायदेशी पाठविणेची कार्यवाही करावी.

१३. तपास पूर्ण करून विहीत मुदतीमध्ये दोषारोपपत्र मा. न्यायालयामध्ये सादर करावे.

 • Prevention of Immoral Trafficking Act १९५६
 •  
 • स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा अॅक्ट) १९५६
 •  
 • पिटा कायदयांतर्गत विशेष पोलीस अधिकारी कोणास म्हणावे :– पिटा कायद्यांतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून गृह विभाग नोटीफिकेशन नंबर / पी पी ए / ०२०६ / सी आर- ५७ / एस पीएल- ६ दिनांक १४/०३/२००६ व पीपीए / १९९१ / २ / पोल-८/दिनांक २०/०७/१९९२ अन्वये पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी नसणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचे अवलोकन करून त्यानुसारच या कायद्या अंतर्गत कारवाई करावी.
 •  

मानवी तस्करी (प्रतिबंध, काळजी आणि पुनर्वसन) विधेयक, 2021 बाबत सर्व संबंधित घटकांनी सूचना/हरकती पाठवाव्यात असे आवाहन, महिला आणि बालविकास मंत्रालयाने केले आहे. या विधेयकाचा उद्देश सर्वप्रकारची मानवी तस्करी रोखणे आणि त्यावर कठोर उपाययोजना करणे हा आहे. विशेषतः महिला आणि बालकांची तस्करी थांबवून, अशा पीडितांची योग्य काळजी घेणे, त्यांना संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हे  विधेयक आणले गेले आहे. या पीडितांच्या नागरी अधिकारांचा सन्मान करून त्यांना नव्याने आयुष्य जगण्यासाठी, आवश्यक ती कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक मदत देण्याची व्यवस्था करणे, त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे ही उद्दिष्ट आहे. त्यासोबतच, असे गुन्हे करणाऱ्यांना चाप बसावा,यासाठी, अशा घटनांशी संबंधित व्यक्तींना कठोर शिक्षा करणे, देखील या विधेयकामुळे शक्य होईल. या विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर ते मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल आणि त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर, त्याचे कायद्यात रुपांतर होईल. सीमापार होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकेल.

उपरोक्त उल्लेखित विधेयकाच्या मसुद्यावर आपल्या सूचना/हरकती 14 जुलै 2021 पर्यंत पाठवायच्या आहेत. या सूचना/हरकती santanu.brajabasi[at]gov[dot]in या इमेलवर पाठवाव्यात.

Leave a Comment