पत्र व्यवहार शाखा ( बरणीशी )

पत्र व्यवहार शाखा ( बरणीशी )

  • यांना बरेचदा बारनिशी कारकुन या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  • हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो
  • बारनिशी जवळ अवाक – जावक टपाल बाबत चे रजिस्टर ठेवण्यात आलेले असून प्रत्यक्ष प्रकरणे नमुद करून त्यांना आवक-जावक क्रमांक देण्याचे काम बरनशी  करीत असते.
  • आलेले प्रकरण आवक रजिस्टरमध्ये नोंदवून त्या संबंधीची माहिती / अहवाल जावक रजिस्टरमध्ये नोंदवून क्रॉसनोंदी घेत असते.

पत्र व्यवहार शाखा ( बरणीशी ) ची कामे..

  • बारनिशी जवळ अवाक – जावक टपाल बाबत चे रजिस्टर ठेवण्यात आलेले असून प्रत्यक्ष प्रकरणे नमुद करून त्यांना आवक-जावक क्रमांक देण्याचे काम बरनशी  करीत असते.
  • आलेले प्रकरण आवक रजिस्टरमध्ये नोंदवून त्या संबंधीची माहिती / अहवाल जावक रजिस्टरमध्ये नोंदवून क्रॉसनोंदी घेत असते.
  • वरिष्ठ कार्यालयातून, तसेच इतर कार्यालयातून किंवा जनतेकडून प्राप्त झालेल्या टपालाची नोंद आवक वहीत घेणे. ते टपाल प्रभारी अधिकाऱ्यास दाखविणे, त्याचे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या, सुचनेप्रमाणे वाटप  करणे.
  • पोलीस ठाण्यातून बाहेर पाठविण्यात येणाऱ्या टपालांची नोंद जावक नोंदवहीत घेणे. पोलिस ठाण्यातून बाहेर जाणारे टपाल हे  पोस्टाने किंवा टपाल ड्युटी शिपायाच्या हस्ते बरणिशी पाठवित असतो.
  • पोस्टाने पाठविलेले टपाल व त्यावर लावली जाणारी सरकारी तिकीटे यांचा हिशोब ठेवणे.
  • ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनला समन्स आणि वॉरंट रजिष्टर लिहिण्याचे काम (देखरेख) करणे.
  • कोर्ट व ईतर कार्यालयातून आलेले समन्स व वॉरंट, बिट निहाय समन्स व वॉरंट बजावणीसाठी कर्मचाऱ्यांना देणे.
  • समन्स बजावून अथवा न बजावता आलेले समन्स व वॉरंट, कोर्ट ड्युटी पोलीस कॉन्स्टेबल मार्फत कोर्टात मुदतीचे आत परत करणे. ( तमील न करता परत पाठवायचे समन्स व वॉरंट प्रभारी अधिकारी यांच्या सही व शिक्क्यानिशी कोर्टात पाठवावे.
  • बारनिशी हा वरिष्ठ अर्ज, पब्लिक अर्ज, समन्स, वॉरंट यांचे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला अर्ज निकाली, अर्ज पेंडींग, समन्स, वॉरंट बजावून परत न बजावता, पेंडींग याबाबत रजिस्टरला गोषवारा काढून गुन्हे परिषदेसाठी माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवितो.

बारनिशी कारकुन यांच्याकडे असलेले अभिलेख –

  • आवक रजिष्टर
  • जावक रजिष्टर
  • स्थानिक अर्ज रजिष्टर
  • वरिष्ठ अर्ज रजिष्टर
  • शासकीय मुद्रांक रजिष्टर
  • समन्स रजिष्टर (ग्रामीण भागात )
  • वॉरंट रजिष्टर (ग्रामीण भागात )
  • खावटी वॉरंट रजिष्टर (ग्रामीण भागात )

Leave a Comment