IPC Act Section 300

IPC Act Section 300

  • कलम 300 – खुन (सदोष मनुष्यवध हा खुन केव्हा होतो.) [Murder] :-

    या कलमाच्या वर्णनात जे खालील अपवाद सांगीतले आहे ते वगळता, एरव्ही 

  • एक:– ज्या कृत्यामळे मृत्यु झाला ते कृत्य जीव घेण्याच्या इराध्याने जर केले असेल, तर तो सदोष मनुष्यवध हा खुन समजला जातो, किंवा

    दोन :– ज्या इजेमुळे एखाद्याचा जीव जावु शकतो याची आरोपीस जानीव आहे किंवा माहीती आहे, अशी दुखापत करण्याच्या उद्देशाने जे कृत्य केले असेल, किंवा 

    तीन : – एखाद्या व्याक्तीस दुसऱ्याकडुन अशी दुखापत पोहचवीली जाते, जी दुखापत मृत्यू घडवून आणण्यास सामान्य नैसर्गिक क्रमानुसार पुरेशी असेल तर, किंवा 

    चार :- कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माहीती असते, त्याचे हातुन घडनारे कृत्य इतके भयंकर धोकादायक आहे की, त्याचे परीनामाचे सर्व शक्यता पाहता मृत्यु नक्की घडेल, किंवा अशी शाररीक दुखापत असते की त्यामुळे मृत्यु येण्यासारखा आहे आणी असे कृत्य किंवा दुखापत करतो की त्यास वाजवी समर्थनीय कारण नसते, तर तो सदोष मनुष्यवध हा खुन समजला जातो.

  • उदाहरणे

    ( क) ‘ब’ हा ‘ड’ ला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळी झाडतो. परिणामी ‘ड’ मरतो. ‘ब’ ने खून केला असे समजले जाईल.

    (ख) ‘ड’अशा रोगाने तो बाधलेला आहे की, एखाधा ठोशाच्या दुखापतीने त्याचा मृत्यू घडून येण्याचा संभव आहे हे माहीत असताना ‘ब’ त्याला शारीरिक दुखापत करण्याच्या उद्देशाने ठोसा हाणतो त्या ठोश्यामुळे ‘ड’ मृत्यू पावतो. सामान्य नैसर्गिक क्रमानुसार त्या ठोशाच्या आघाताने एखाद्या धडधाकट प्रकृतीच्या व्यक्तीचा जीव गेला नसता, तरीही, ‘ब’ हा खुनाबद्दल दोषी आहे. पण जर ‘ड’ हा एखाद्या रोगाने बाधलेला आहे हे माहीत नसताना ‘ब’ ने सामान्य नैसर्गिक क्रमानुसार ज्यामुळे एखाद्या धडधाकट प्रकृतीच्या व्यक्तीचा जीव जानार नाही असा ठोसा हाणला आणि अशा बाबतीत जीव घेण्याचा किंवा सामान्य नैसर्गिक श्रमानुसार ज्यामुळे जीव जावु शकेल अशी शारीरिक दुखापत पोचवण्याचा ‘ब’ चा उद्देश नसेल तर, शारीरिक क्षती पोचवण्याचा त्यांचा उद्देश असला (जीव घेनी दुखापत करण्याचा उद्देश नसल्याने) तरी, तो खुनाबद्दल दोषी होत नाही.

    (ग) सामान्य नैसर्गिक क्रमानुसार एखाद्या माणसाचा मृत्यू घडवून आणण्यास पुरेसे होईल अशा प्रकारे ‘ब’ हा ‘ड’ वर धाराधार शस्त्राने वार करतो किंवा त्याला दंडुक्याने जखम करतो. त्याच्या परिणामाने ‘ड’ मरण पावतो. या बाबतीत, ‘ड’ चा जीव घ्यावा असा ‘ब’ चा उद्देश नसला तरीही तो ‘ड’ च्या खुनाबद्दल दोषी आहे.

    (घ) ‘न’ हा कोणतेही कारण नसताना माणसांच्या घोळक्यावर गोळ्यानी भरलेली बंदूक चालवीतो व घोळक्यातील लोकांच्यापैकी एकजण मरतो. कोणत्याही विशिष्ट इसमाचा जीव घ्यावा असा ‘न’ चा पूर्वनियोजीत इरादा नसला तरी सुध्दा, तो खुनाबद्दल दोषी आहे. 

    अपवाद. १- जेव्हा गंभीर व आकस्मिक कारणामुळे आरोपी क्रोधास चढतो व त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला असता, आरोपी जर ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले तिच्या मरनास कारणीभूत झाला किंवा चुकीने किंवा अपघाताने अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत झाला तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही.

    वरील अपवाद हा पुढील परंतुकांना अधीन आहे :-

    पहिले. – रागाचे कारण हे आरोपीने एखाद्या इसमास ठार मारण्यासाठी किंवा तिला अपाय करण्यासाठी म्हणून शोधलेले नसावे किंवा स्वताःहुुुुुुन  उकरून काढलेले नसावे.

    दुसरे.- रागाचे कारण हे कायद्याचे पालन म्हणून केलेल्या किंवा एखाद्या लोकसेवकाने असा लोकसेवक म्हणून आपल्या अधिकाराचा कायदेशीर वापर करून केलेल्या कोणत्याही कर्तव्यामुळे प्रक्षोभन झालेले नसावे.

    तिसरे.- रागाचे कारण हे स्वताःचा खाजगीरित्या बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे प्रक्षोभ झालेले नसावे..

    खुलासा. – अपराध हा ‘खून’ या सदरात न मोडण्याइतपत ते रागाचे कारण गंभीर व आकस्मिक होते किंवा काय हे प्रत्यक्ष परीस्थितील तथ्यवर अवलंबुन असते.

  • उदाहरणे

    (क) ‘ब’ ने ड यास राग येईल असे कृत्य केल्यामुळे संतप्त होऊन ‘ड’ हा ‘ब’ चे मूल ‘ग’ याला उद्देशपूर्वक ठार मारतो. ड च्या रागाचे कारण मुलाने प्रक्षोभित केलेले नाही, तसेच प्रक्षोभामुळे उद्भवलेले कृत्य करताना अपघाताने किंवा दुर्देवाने मुलाचा मृत्यू घडून आलेला नाही. त्यामुळे ड ने खुन केला आहे.

    (ख) ‘ब’ हा ‘ग’ यास गंभीर व आकस्मिक कारणाने राग येईल असे कृत्य करतो. ‘ग’ या प्रक्षोभनामुळे ‘ब’ वर पिस्तूल झाडतो. ल हा ब च्या जवळपास होता, त्या बाबत ग ला माहीती नव्हते. ब च्या जवळपास असलेल्या पण नजरेच्या टप्प्याबाहेर असलेल्या ‘ल’ ला मारण्याचा ड चा उद्देश नसताना, तसेच आपल्या हातून तो मारला जाण्याचा संभव आहे याचीही जाणीव नमताना त्याच्याकडून ‘ल’ मारला जातो. या बाबतीत ‘ड’ ने खून केलेला नाही, तर फक्त सदोष मनुष्यवध केलेला आहे.

    ( ग्) ‘क’ ला ‘य’ या बेलिफाकडून कायदेशीरपणे अटक झाली आहे. ‘क’ अटकेमुळे आकस्मिक- पणे व haranra संतप्त होऊन ‘य’ को ठार मारतो. हा खून आहे, कारण लोकसेवकाने आपल्या अधिकारांचा वापर करताना केलेल्या गोष्टीमुळे प्रक्षोभन झाले होते.

    (घ्) ‘क’ हा ‘य’ ह्या दंडाधिकान्यापुढे साक्षीदार म्हणून उपस्थित होतो. ‘य’ असे म्हणतो की, “‘क’ च्या जबानीतील कोणत्याही शब्दावर माझा विश्वास नाही व ‘क’ ने शपथेवर खोटी साक्ष दिली आहे.” या शब्दामुळे ‘क’ ला आकस्मिकपणे चीड येऊन तो ‘य’ ला ठार मारतो. हा खून आहे.

    (ङ) ‘क’ हा ‘य’ चे नाक ओढण्याचा प्रयत्न करतो, तसे करण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी ‘म’ खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरून ‘क’ ला पकडीत धरतो. परिणामी, आकस्मिकपणे ‘क’ ला कोधावेग येऊन तो ‘य’ ला ठार मारतो. हा खून आहे, कारण खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क बजावत असताना केलेल्या गोष्टीमुळे प्रक्षोभन झाले होते.

    (च्) ‘य’ हा ‘ब’ ला ताला हाणतो, या प्रक्षोभकारणामुळे ‘ख’ ला भयंकर संताप येतो. बाजूला उभा असलेला ‘क’ हा ‘ख’ च्या संतापाचा फायदा घेऊन त्याच्याकरवी ‘य’ ला ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यासाठी ‘ख’ च्या हातात चाकू देतो. ‘ख’ हा ‘य’ ला चाकूने भोसकून ठार मारतो. या बाबतीत ‘ख’ ने फक्त सदोष मनुष्यवध केला असेल, पण ‘क’ हा खुनाबद्दल दोषी आहे.

    अपवाद २. पुरीराचा किंवा मालमत्तेचा खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सद्भावपूर्वक बजावत असताना जर अपराध्याने आपणास कायद्याने दिलेल्या अधिकाराचा अतिक्रम केला व जिच्या- विरुद्ध तो असा बचावाचा हक्क बजावत आहे तिच्या मृत्यूस तो, तसे पूर्वनियोजत नसताना व अशा बचावासाठी आवश्यक असेल त्याहून अधिक अपाय करण्याचा उद्देश नसताना कारणीभूत झाला तर, सदोष मनुष्यवध हा खून होत नाही.

  • उदाहरणे

    ‘य’ हा ‘क’ ला घोड्याच्या चाबकाने मारण्याचा प्रयत्न करतो, पण ‘क’ ला जबर दुखापत होईल अशा रीतीने नव्हे. ‘क’ पिस्तुल बाहेर काढतो. ‘य’ हमला नेटाने चालू ठेवतो. आपण अन्म कोणत्याही मार्गाने चाबकाचा मार चुकवू शकत नाही असे सद्भावपूर्वक समजून ‘क’ हा ‘य’ ला गोळी घालून मारतो. ‘क’ ने खून केलेला नाही, तर नुसता सदोष मनुष्यवध केलेला आहे.

    अपवाद ३. सार्वजनिक न्यायाच्या अभिवृद्धीकरता कार्य करणारा असा लोकसेवक म्हणून किंवा • अशा लोकसेवकाला साहाय्य करत असताना जर अपराध्याने आपणांस कायद्याने दिलेल्या अधिकारांचा अतिक्रम केला आणि जी कृती कायदेशीर व असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य यथायोग्यपणे पार पाडण्यासाठी आवश्यक आहे असे तो सद्भावपूर्वक समजतो ती कृती केल्याने तो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस, तिच्याविषयी दुष्टभाव नसताना कारणीभूत झाला तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही.

    अपवाद ४. – आकस्मिक भांडणातून संतापाच्या भरात आकस्मिकपणे मारामारी सुरू झाली असता पूर्वनियोजित नसताना व अपराध्याने गैरफायदा घेतलेला नसताना किंवा तो क्रूरपणे व अवाजवी रीतीने बागलेला नसताना सदोष मनुष्यवध झाला तर तो खून होत नाही.

    . स्पष्टीकरण. अशा प्रकरणी, कोणत्या पक्षाने प्रक्षोभन केले किंवा कोणी प्रथम हमला केला ही बाब गौण आहे.

    अपवाद ५. — जिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती अठरा वर्षांवरील वयाची असून तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्करला असेल तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही.

  • उदाहरणे

    ‘क’ इच्छापूर्वक १८ वर्षाखालील वयाच्या ‘य’ ह्या व्यक्तीला चिथावणी देऊन आत्महत्या करायला लावतो. या बाबतीत ‘य’ अल्पवयीन असल्यामुळे स्वतःच्या मृत्यूला संमती देण्यास तो अक्षम आहे. म्हणून ‘क’ ने खुनाला अपप्रेरणा दिली असे होते.

Leave a Comment