माझी नोकरी (My Service)
माझी नौकरी
पूर्ण लेख जरूर वाचा आणि नंतरच पुढे जा.
मित्रांनो, आपण पोलीस खात्यात नोकरी करीत असतांना वेळ, काळ, भूक तहान विसरून नोकरी करीत असतो. आपल्याला पाहिले काम पूर्ण करणे महत्वाचे असते. आणि हा एकच प्रश्न आपल्या समोर असते की हे काम मी कसे पूर्ण करू? तेव्हा नोकरी – परिवार – मुलं बाळ वगैर काहीही आठवत नाही. पण या सोबतच आपण एक महत्वाचा प्रश्न स्वतःला करणे विसरून जातो. आणि तो प्रश्न म्हणजे “मी आज जे काही काम केले त्याचे मला आणि माझ्या परिवाराला, फायदा किती आणि तोटा किती?”
आपले बरेच मित्र असतात त्यांना नेहमी बक्षीस मिळतात, 15 ऑगस्ट/26 जानेवारी ला त्यांना DG insignia / राष्ट्रपती पुरस्कार मिळून जातो. त्यांना वरिष्ठ अधिकारी कामाचा माणूस म्हणून जवळ करतात. आणि आपण नंतर करू म्हणून वाटच पाहत राहतो, किंव्हा काहीतरी टोमणा मारून विषय बाजूला सारतो. असे प्रत्येक कार्यालयात असते. काही जवान सतत प्रगती करीत असतात आणि बाकी बॅफूटवर स्कॉड मध्ये मागे लाईनीत उभे असतात.
या एकाच प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आपण पोलीस खात्यासाठी करीत असलेल्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. आणि हे मूल्यमापन सतत करणे गरजेचे आहे.
आपण केलेल्या कुठल्याही कामानंतर स्वतःला प्रश्न विचारा. उदा आज आपण तपासादरम्यान एखाद्या तपासी अमालदर ला आरोपी शोध कमी मदत केली, किंव्हा आपण स्वतःच स्वतःचे हुशारीने, तंत्रज्ञान चा वापर करीत अज्ञात आरोपी शोधून काढला, तर या मूल्यमापनात स्वतःलाच विचारा “आज मी जो आरोपी पकडला / शोधून काढला, त्या बाबीचा मी आपल्या साठी आणि माझ्या परिवारासाठी काय फायदा घेतला? “मी केलेल्या कामासाठी बक्षीस पत्र बनवून वरिष्ठांकडे पाठविले काय? पाठविले असेल तर त्याचा पाठपुरावा सुरू आहे काय? त्याची मी कुठे नोंद करून ठेवली आहे काय? किंव्हा मी आज जे माझ्या पैशाने तपासात बाहेर गेलो त्याचे TA-DA बिल तयार करून पाठविले काय? जेणकरून मी खर्च केलेला पैसा परत मिळेल. (त्यासाठी खूप काही करावे लागत नाही आपलेच तपासाचे आदेश, कागदपत्र आपल्याच ऑफिस मध्ये झेरॉक्स करायचे, आपल्याच ऑफिस मधून फॉर्म भरायचा आणि आपल्याच वरिष्ठांना पाठवायचा. सोपं आहे. पण केले तर फायदा आहे नाही तर तुम्ही पण त्याच लाईनीत उभे आहात.) (तुम्हाला TA-DA किंव्हा रेशन भत्ता चे पैसे कमी दिसतील पण compounding interest चे समिकरणानुसर तुमच्या एका महिन्यात 1000 रुपयाची गुंतवणूक तुमच्या परिवाराला 20 वर्षानंतर कमीत कमी 15,00,000 रू देऊन जाते. अडीअडचणीच्या वेळी हा पैसा काही कमी होत नाही.)
तसेच आपल्या हातून अनवधानाने एखादी चूक झाली तर आपण वरिष्ठांना कळवून त्याच्या नोंदी (आवश्यकतेप्रमाणे) स्टेशन डायरीत घेतल्या काय? जेणेकरून वरिष्ठांचा गैरसमज होऊन मला त्यात शिक्षा येणार नाही.
यामुळे आपल्याला आयुष्यभर माहिती राहील की मी अमुक काम केले होते आणि त्यामुळे मला इतके बक्षीस देण्यात आले होते. तमुक काम तसे चुकीने करण्यात आले, परंतु मी थोडक्यात वाचालो, नाहीतर शिक्षा नक्की आली असती.
या मूल्यमापना मुळे आपण कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या टाळायच्या हे स्वतःच्याच अनुभवातून शिकतो.
या सर्व बाबी साठी आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून मला काय सुविधा सरकार कडून पोलीस प्रशासन कडून दिल्या गेल्या आहेत या माहिती पाहिजे.
त्यामुळे मित्रांनो, त्याच विषयाचे अनुषंगाने या ठिकाणी काही महत्वाचे मुद्द्यावर चर्चा व मार्गदर्शन केले गेले आहे त्याचा जरूर फायदा घ्या.
रजे बाबत करायची महत्वाची कामे.
- किरकोळ रजा ही 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत भोगायची असते. (उपभोगली नाही तर लोप पावते.)
- अर्जित रजा ही 01 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान उपभोगायची असते. (उपभोगली नाही तर सर्विस बुक ला नोंद करून जमा केली जाते. – पूर्ण सेवा कालावधीत फक्त 300 दिवस. – नंतर ची लोप पावते.)
दर वर्षी अर्जित रजा मंजूर करून घ्यावी, रजा भोगावी, रजा रोखिकरन होऊ शकणाऱ्या राजेचे आठवणीने रोखीकरान करून घ्यावे. (अर्जित रजा रोखिकरण फॉर्म, पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)
- दर वर्षी लांब सुट्टी आठवणीने नक्की घ्या. गरज नसेल तरी घ्या. तुम्हाला गरज नसेल पण तुमच्या परिवाराला नक्की आहे. (मी लांब सुट्टी कधी घेताच नाही अशी फुशारकी मिराविण्यात काही राम नाही. ज्या प्रमाणे तुम्ही जेवले नाही तर तुम्हीच उपाशी पोटी राहणार, त्यापेक्षा जास्त महत्त्व या फुशारकीला नाही हे लक्षात घ्या.) याचा अर्थ असा नाही की ऑफिस मध्ये मोठा बंदोबस्त लागणार आहे आणि तुम्ही सुट्टीवर जावे. पण वेळ पाहून आपण नक्की परिवारासह सुट्टी घेतलीच पाहिजे.
बदली (Transfer) बाबत करायची महत्वाची कामे :-
- बदली झाल्यावर पाहिले बदली रजा उपभोगता येथे व नंतर बदलीचे ठिकाणी हजर होता येते, किंव्हा पाहिले हजर होता येते आणि नंतर बदली रजा उपभोगता येते. (आपल्या सोयी नुसार निर्णय घ्यावा.)
- बदली विनंती वरुन नसेल तर ट्रान्स्फर TA मंजुर होतो. तो नक्की घ्या. ( Transfer TA फॉर्म पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)
- जास्त बदल्या होणार नाही याकडे लक्ष द्या. परिवाराची वाताहत होते.
- बदलीवर जाण्याचे पाहिले बक्षीस, ट्रेनिंग प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र याच्या नोंदी कार्यालय कडून सेवा पुस्तकात नक्की करून घ्या.
- त्याच प्रमाणे आपले दुय्यम सेवा पुस्तकातील नोंदी सुधा अध्यावत करावे.
बढती (Promotion) बाबत करायची महत्वाची कामे
बक्षिस (Reward) बाबत करायची महत्वाची कामे
बक्षिस (Reward) बाबत करायची महत्वाची कामे