"निर्भय" पुरस्कार महाराष्ट्र शासन (Nirbhay Puraskar Maharashtra Govt.)

"निर्भय" पुरस्कार बाबत.

             महिलांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी विरूद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस कायदेशिर कडक शिक्षा करणे जितके महत्वाचे आहे तितकेच या प्रकारचे अत्याचार होवू नयेत म्हणून प्रयत्न करणे महत्वाचे आहे. महिलांवर अत्याचार होत असताना सजग व जागरुक नागरीकांनी असे अत्याचार रोखण्याकरिता सहभाग घेतल्यास महिलांमध्ये अधिक सामाजिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

             महिलांवर अत्याचार रोखण्यास सहभाग घेणा-या नागरीकांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास अधिकाअधिक नागरीक यामध्ये सहभागी होतील. सबब, महिलांच्या अत्याचाराच्या विरुध्द कामगिरी करणा-या नागरीकांसाठी शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो.

  • सदरच्या “निर्भय” पुरस्काराचे स्वरुप रक्कम रु. 1 लाख रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक असा असतो.
  • “निर्भय” पुरस्काराकरिता प्रस्तावाचा नमुना, पात्रतेचे निकष व प्रशस्ती पत्रकाचे स्वरुप याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सुचना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी शासनाच्या मान्यतेने प्रसिद्ध केले जातात.
  • पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांवरील अत्याचाराविरुध्द कामगिरी केलेल्या नागरीकांची शिफारस “निर्भय” पुरस्काराकरिता पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवावी लागते.
  • एक वर्षात महिलांवरील अत्याचाराविरुध्द कामगिरी केलेल्या नागरीकांची “निर्भय” पुरस्काराकरिता शिफारस पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत करायची असते.

प्रत्येक वर्षामध्ये शासनाच्या वतीने “निर्भय” पुरस्कार देण्याकरिता प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता समिती..

  • अध्यक्ष – पोलीस महासंचालक,
  • सदस्य – पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग),
  • सदस्य – पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,
  • सदस्य – अपर पोलीस महासंचालक (कायदाव सुव्यवस्था),
  • सदस्य सचिव – अपर पोलीस महासंचालक (आस्थापना)

 

Leave a Comment