दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी
- दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार या दर्जाचे अंमलदार प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतात..
दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी ची कामे..
- दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या ठिकाणी नेमणुकीस असनाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावने व त्यांच्या कामावर नजर ठेवणे.
- दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत आहेत त्या प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारीच्या संपर्कात राहून दुरक्षेत्र बीट हद्दीतील घडामोडी व गुन्हे संबंधीची माहिती प्रभारी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना देणे.
- दुरक्षेत्र / चौकी या ठिकाणी आलेल्या तक्रारीची नोंद ऑकरन्स बुकवर नोंदवून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदणीसाठी पाठविणे व लागलीच तपास / चौकशी सुरु करणे.
- दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या बीट हद्दीतील गावातील पोलीस पाटील व प्रतिष्ठित व्यक्तिंच्या संपर्कात राहून घडणाऱ्या घटनांचा माहिती गोळा करणे व कायदा व सुव्यवस्था राखली जावी या करीता आगावु उपाययोजना अमलात आनने.
- दुरक्षेत्र बीटातील गुन्हेगारांच्या माहितीचे रजिस्टर जे दुरक्षेत्रावर ठेवलेले असतात ते अद्यावत ठेवन्याचे काम दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी करतो..
दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी नी सांभाळायचे अभिलेख..
- ऑकरन्स बुक
- हिस्ट्री शिट,
- (बी) स्टेशन डायरी
- क्राईम रजिष्टर
- जड संग्रह नोंदवही
- वरिष्ठ / पब्लिक अर्ज रजिष्टर
- आवक रजिष्टर
- जावक रजिष्टर
- परिपत्रक फाईल
- हजेरी पट
- गस्त पुस्तिका
- पाहिजे असलेले गुन्हेगारांचे रजिस्टर,
- माहीत असलेले गुन्हेगार इ. चे रजिस्टर
- नमुद बीटातील गुन्हेगारांच्या माहितीचे रजिस्टर