बिनतारी संदेश ड्युटी (RTPC)

बिनतारी संदेश ड्युटी (RTPC)

बिनतारी संदेश ड्युटी (RTPC)

 • प्रत्येक पोलीस ठाण्यात वरीष्ठ कार्यालयातुन माहीती त्वरीत प्राप्त करण्याकरीता बिनतारी वहन संच असतो.
 • त्याच प्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या मोबाईल गाडीवर सुध्दा पोर्टेबल बिनतारी संदेश  संच असतो.
 • पोलीस ठाण्यातील बिनतारी संच हाताळण्यासाठी ऑपरेटर नेमला जातो. त्यास RTPC असे म्हणतात. RTPC हा कर्मचारी शक्यतो पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल दर्जाचा कर्ममचारी असतो.
 • RTPC हा पोलीस ठाण्याकडून त्वरीत प्रसारीत करण्यासाठी मिळालेला संदेश उदा. चोरी, जबरी चोरी, मनुष्य हरवला, दैनंदिन गुन्ह्याचा अहवाल (डिसीआर) DCR-Daily Crime Report बाबतची माहिती इत्यादी प्रसारीत करतो.

बिनतारी संदेश ड्युटी ची कामे..

 • RTPC हा पोलीस ठाण्याकडून त्वरीत प्रसारीत करण्यासाठी मिळालेला संदेश उदा. चोरी, जबरी चोरी, मनुष्य हरवला, दैनंदिन गुन्ह्याचा अहवाल (डिसीआर) DCR-Daily Crime Report बाबतची माहिती इत्यादी प्रसारीत करतो.
 • इतर पोलीस ठाणे व वरिष्ठ कार्यालया कडून, जिल्हा नियंत्रण कक्षाकडून बिनतारी संदेशाद्वारे मिळालेले संदेश लिहून घेतो व ते त्वरीत प्रभारी अधिकारीचे निदर्शनास आनुन देत असतो.
 • पोलीस स्टेशन ला येणारे व पोलीस स्टेशन हुन बाहेर  जाणारे बिनतारी संदेश याची त्याच्याकडे असलेल्या लॉग बुकला त्या त्या वेळेनुसार नोंद घेत असतो.
 • प्रत्येक येणारे-जाणारे बिनतारी संदेश वरील कॉल याची सुद्धा नोंद लॉग बुकात घेत असतो.
 • बिनतारी संच यास जोडण्यात आलेली केबल / वायर यामध्ये छेडछाड होणार नाही याची काळजी घेत असतो व काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाला फोनद्वारे कळवुन  तशी  नोंद स्टेशन डायरीला घेत असतो.
 • सदर ड्युटी ही सतत 24 तास चालु असते. त्यामुळे स्टेशन डायरी अमलगार प्रमाणे ही ड्युटी सुध्दा सतत चालु असते. त्यामुळे रिलीफ (रिलीव्हर) आल्याशिवाय ड्युटी चालु असनारे RTPC ने बिनतारी संदेश वहनाचा चार्ज सोडु नये.
 • RA FAX – RA FAX

बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) यांनी सांभाळायचे यंत्र.. 

 •  बिनतारी वहन संच हा प्रत्येक पोलीस ठाण्यात असतो.
 • पोलीस ठाणे, पेट्रोलिंग करणाऱ्या मोबाईल गाडीवर बिनतारी संच असतो.
 • हा संच हाताळण्यासाठी ऑपरेटर (पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल) नेमला जातो. तो पोलीस ठाण्याकडून प्रसारीत करण्यासाठी मिळालेला संदेश उदा. चोरी, जबरी चोरी, मनुष्य हरवला, दैनंदिन गुन्ह्याचा अहवाल (डिसीआर) बाबतची माहिती इत्यादी प्रसारीत करतो.
 • बिनतारी संच यास जोडण्यात आलेली केबल / वायर यामध्ये छेडछाड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
 • रिलीफ (रिलीव्हर) आल्याशिवाय त्या आरटीपीसीने बिनतारी संदेश वहनाचा चार्ज सोडता कामा नये.

बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) यांनी सांभाळायचे  अभिलेख..

 • लॉग बुक रजिस्टर
 • RF FAX
 • Lan Messanger.

Leave a Comment