दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी

 • दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार या दर्जाचे अंमलदार प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतात..

दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी ची कामे..

 • दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या ठिकाणी नेमणुकीस असनाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावने व त्यांच्या कामावर नजर ठेवणे.
 • दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत आहेत त्या प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारीच्या संपर्कात राहून दुरक्षेत्र बीट हद्दीतील घडामोडी व गुन्हे संबंधीची माहिती प्रभारी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना देणे.
 • दुरक्षेत्र / चौकी या ठिकाणी आलेल्या तक्रारीची नोंद ऑकरन्स बुकवर नोंदवून पोलीस स्टेशनला गुन्हा  नोंदणीसाठी पाठविणे व लागलीच तपास / चौकशी सुरु करणे.
 • दुरक्षेत्र (आऊट पोस्ट ) / पोलीस चौकी / (गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित भागात AOP-Armed Out Post) या बीट हद्दीतील गावातील पोलीस पाटील व प्रतिष्ठित व्यक्तिंच्या संपर्कात राहून घडणाऱ्या घटनांचा माहिती गोळा करणे व कायदा व सुव्यवस्था राखली जावी या करीता आगावु उपाययोजना अमलात आनने.
 • दुरक्षेत्र बीटातील गुन्हेगारांच्या माहितीचे रजिस्टर जे दुरक्षेत्रावर ठेवलेले असतात ते अद्यावत ठेवन्याचे काम दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी करतो..

दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी नी सांभाळायचे अभिलेख..

 • ऑकरन्स बुक
 • हिस्ट्री शिट,
 • (बी) स्टेशन डायरी
 • क्राईम रजिष्टर
 • जड संग्रह नोंदवही
 • वरिष्ठ / पब्लिक अर्ज रजिष्टर
 • आवक रजिष्टर
 • जावक रजिष्टर
 • परिपत्रक फाईल
 • हजेरी पट
 • गस्त पुस्तिका
 • पाहिजे असलेले गुन्हेगारांचे रजिस्टर,
 • माहीत असलेले गुन्हेगार इ. चे रजिस्टर
 • नमुद बीटातील गुन्हेगारांच्या माहितीचे रजिस्टर

Leave a Comment