ड्युटी हजेरी मास्टर

ड्युटी हजेरी मास्टर

 • हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल (PC), नाईक पोलीस कॉन्स्टेबल (NPC), पोलीस हवालदार (HC), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही दर्चाजा अंमलदार असतो.

ड्युटी हजेरी मास्टर यांची कामे..

 •  पोलीस ठाण्यातील व पोलीस ठाणे हद्दीतील जी ठिकाणे ड्युटी कामी प्रभारी अधिकारी द्वारे नेमुन दिलेली आहेत, अशा ड्युटीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी नेमतो.
 • अशा प्रकारे ड्युटी लावलेल्या कर्मचारींची ड्याुटी रजिष्टरमध्ये नोंद घेत असतो.
 • सकाळी व रात्री दोन्ही वेळेस होणाऱ्या हजेरीवर ड्युटी चे वाटप ड्युटी अंमलदार, प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने करत असतो.
 • अचानक उद्भावनाऱ्या तातडीच्या प्रसंगी कर्मचारी ड्युटी करीता कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे काम ड्युटी अंमलदार करीत असतो. अशा वेळेस तो कुठल्या कामाला प्रथमिकता द्यावी हे निश्चित करून आपले निर्णय घेत असतो.
 • कर्मचाऱ्यांची किरकेळ रजा मंजुरी करिता वरीष्ठ अधिकाऱ्यासमोर अर्ज ठेवने, पोलीस स्टेशन मध्ये अडचनिच्या काळात उपलब्ध होवु शकणाऱ्या मनुष्यबळाची माहिती वरिष्ठांना देणे महत्वपुर्ण असते.
 • अति तातडीचे प्रसंग जसे (जातीय दंगलीच्या घटना,  सार्वजनिक मोठे उत्सवाचे बंदोबस्त, अति महत्वाचे बंदोबस्त) करीता, कर्मचारी गोळा करून, बाहेरगावी बंदोबस्त पाठविण्याचे काम सुध्दा हजेरी मास्टर ला पार पाडावे लागतात. 

ड्युटी हजेरी मास्तर यांनी सांभाळायचे अभिलेख – –

 • हजेरी पट रजिस्टर
 • सीक रजा रजिष्टर
 • ड्युटी वाटप रजिष्टर
 • अर्जित रजा रजिष्टर
 • किट जमा रजिष्टर
 • ड्युटीपास
 • किरकोळ रजा रजिष्टर
 • नेमणूक निहाय रजिष्टर

Leave a Comment