पंचनाम्यावरील न्यायानिर्णय Judgement

पंचनाम्यावरील महत्वाचे न्यायानिर्णय Judgement

पंचनाम्यातील पंचांचे विधान फक्त खंडन करण्याकरिता असते :

         लेखी पंचनाम्यात पंच जे काही विधान निवेदन करतो त्याचा वापर फक्त पुढे न्यायालयात खंडन करण्याकरताच करता येतो. भा.पु. कायदा कलम १४५ प्रमाणे तशी तरतूद आहे. पंचांची साक्ष न्यायालयात चालू असता जर तो काही विरुद्ध सांगू लागला, विसंगत सांगू लागला, तर आधीचे पंचनाम्यात त्याने केलेले निवेदन त्याचे विरूद्ध त्याचे जबाबाचे खंडन करण्याकरिता (Contradict) वापरता येते. पण तसे करण्यापूर्वी त्याचे लक्ष त्या भागाकडे वेधले पाहिजे. असे केले तरी तो मुळ पुरावा (substantive) होत नाही.

         पाहा : “महाराष्ट्र राज्य ” AIR 1971 S.T 2256 = (1971) 1 S.C.C.503 = 1971 ( Cr.L.J. 1547).

भा. पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे विविध ठिकाणी [ Places] मधून मुद्देमाल काढून दिला म्हणून वेगवेगळे पंच घ्यावेत असा कायद्याचा दंडक नाही :

          खाद्य घटनेत आरोपीने तपासाकामी वेगवेगळ्या जागांमधून मुद्देमाल काढून दिले त्याचा रीकव्हरी पंचनामा केला आहे. तेव्हा प्रत्येक जागेकरता स्वतंत्र पंच घेतले पाहिजेत अशी कायद्यातत रतूद नाही. तेच ते पंच वापरण्यास मनाई नाही. जरी त्यास पंचांची जोडी वापरून विविध पंचनामे केले तरी सर्व कायदेशीर योग्यच असतात. त्यास हरकत नाही. यांत काही बेकायदेशीर गैर नाही.

        पाहा: “हिमाचल प्रदेश सरकार = वि = ओम प्रकाश” A.I.R\ 1972 S.C 975 = (1972) 1S.C.C 249 = 1972 S.C.C (Cri) 88 = 1972 (Cri J.606)= (1972) 2 S.C.R 765. –

दोन्ही पंच उलटले, फिरले तरीदेखील पुरावा विचारात घेता येतो :

        या घटनेत रक्तमिश्रित लोखंडी गज आरोपी अपिलकर्त्याचे बहिणीच्या घरात मिळून आला. न्यायालयात त्या संदर्भातील पंचनाम्यावरील दोन्ही पंच उलटले, फिरले म्हणून केवळ पुरावा निश्वसनीय ठरत नाही. असे नाही तो विचारात घेता येतो. कारण इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी आहेत. तसेच दोन्ही पंच आरोपीचे जवळचे नातेवाईक असल्याने ते उलटणे सहज शक्य होते. वास्तविक तिसरा पंच सय्यद हबीबूल सवब जो निवृत्त न्यायाधीश म्हणून कागदपत्रात वर्णन केले आहे. त्याची साक्ष सरकार पक्षास घेता आली असती, पण आरोपीतर्फे त्याला का तपासले नाही याला खुल्या तपासणी अधिकाऱ्याकडे कोर्टात केला नाही. तेव्हा अशा परिस्थितीत पोलिसांची साक्ष विश्वसनीय ठरविता येते.

       पाहा: “नासिम अहंमद नवी दिल्ली प्रशासन ” A.I.R 1974 S.C 691= (1974).3 S.C.C 668=1974 S.C.C (Cri) 198= 1974 Cr. L.R (S.C) 86 = (1974) 2 S.C.R.694.

भ्रष्टाचार घटनेत केवळ पंचाच्या साक्षीवर विश्वास ठेवून शिक्षा होणे योग्य नाही. इतर सर्व परिस्थिती पुरावा विचारात घेणे आवश्यक आहे :

         उच्च न्यायालय खालच्या कोर्टाशी सहमत आहे की – ” नटवरलालचा पुरावा संशयित आहे आणि इतर सबळ पुरावा असल्याशिवाय विचारात घेणे योग्य नाही. तरीदेखील उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली कारण खूणेच्या नोटा आरोपीच्या अंगझडतीत सापडल्या आणि पंचाने तसे कबूल केले आहे. एकूण पुरावा आणि परिस्थिती कोर्टाने विचारात घेतली पाहिजे. येथे तर फिर्यादीला सत्याची चाड दिसत नाही. पैशाची मागणी केल्यानंतर दहा दिवसांनी उशिरा गे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मतप्रदर्शन केले की, अशा परिस्थितीत केवळ पं 3/5 विश्वास ठेवता येत नाही, तर इतर सर्व परिस्थिती विचारात घेतली पाहिजे. म्हणून आरापास निर्दोष करण्यात येत आहे.

         पाहा: “गुलाम महंमद ए मलिक गुजरात राज्य” A.I.R 1980 O.S.C. 1558= 1980 ( Sup) S.C.C 684 = (1981) S. C. C (Cri) 586 = 1980 Cr.LJ 1096 1980 Cr.LR S.C 504-1980 U.J (S.C) 818. =

खूनाची घटना परिस्थितिजन्य पुरावा – एक पंच किसन गोविंद राव सतत चार दिवसांच्या झडतीत पंच म्हणून काम करतो. कौटुंबिक शत्रुत्वाचा लेखी पुरावा तेव्हा पंच किसन गोविंदची साक्ष विचारात घेणे धोक्याचे आहे :

  •          या घटनेत समस्येचा नाही. केस परिस्थितिजन्य पुराव्यावर आधारलेली आहे. पुराव्यात तोंडी आणि लेखी आहे की, किसन गोविंदराज आणि आरोपीचे कुटुंब यामध्ये बरेच वर्षांपासून शत्रूत्व आहे. चूक आहे. असे संबंध चांगले नाहीत. निकाल पत्र दाखल आहे. तरीदेखील उच्च न्यायालयाने आरोपीचे चुलते स्वतंत्र राहातात या कारणाने शत्रुत्वाचा पुरावा मान्य केला नाही हे चूक आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने धरते आहे. “केवळ चुलते स्वतंत्र राहातात म्हणून शत्रूत्व नाहीसे झाले आहे असे म्हणता येत नाही. म्हणून आरोपीस दोषमुक्त करण्यात येत आहे. कारण किसन गोविंदराजचा पुरावा विश्वसनिय नाही.”

          पाहा : “गंभीर = वि = महाराष्ट्र सरकार” AIR 1982 S.C 1157=(1982) 2 S.C.C 351= 1982 S.C.C (Cri) 431=1982 Cr.LJ 1243 = 1982 Cr.LR. (S.C) 275=1982 U.J (S.C) 475.

दोन स्वतंत्र पंच साक्षीदार असता तपासले नाहीत त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यावर विश्वास ठेवता येत नाही :

       या घटनेत आरोपीने दागिने काढून दिले आणि पंचापुढे निवेदन केले आणि त्या संदर्भात दोन पंच आणि तसा पंचनामा आहे. तरीदेखील ते दोन्ही स्वतंत्र पंच न्यायालयात तपासले नाहीत. तेव्हा केवळ पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष विश्वसनीय धरता येत नाही. ते दोन्ही पंच सहज कोर्टापुढे तपासता आले असते.

         पाहा : “केरळ राज्य = : वि = थॉमस उर्फ बॉबी’ (1986) 2 S.C.C 411=1986 S.C.C (Cri) 176.

पंच साक्षीदार केवळ शेजारी राहतो या नात्यामुळे त्यांची साक्ष नाकारता येत नाही :

           या घटनेत मयताच्या शेजारी राहणारा म्हणून घेतलेल्या पंचाची साक्ष नाकारता येत नाही. त्याचे विरुद्ध उलटतपासणी खास कारण सूचित केलेले नाही. तसेच तपासणी अधिकारी. याची उलटतपासणी झाली आहे. त्यातदेखील या पंचाविरुद्ध काही खास कारण सूचित केले नाही. तसेच हाच साक्षीदार नंबर ५ याची का खास निवड केली आहे. यांचे कारण दाखविले नाही. तेव्हा त्या पंचाची साक्ष विश्वसनीय ठरविता येत आहे.

         पाहा : “सुजी सुरेंद्र तिवारी, मध्य प्रदेश सरकार” AIR 1991 S.C 1853= (1991) 3 S.C.C 627 = 1991 (Cri) 916 = 1991 (Cr.LJ) 2653=1991 CH.L.R. (SC) 605=JT 1991 (3) S.C 151 = (1991) 3 Crimes 82 S.C S.C.c.

एकच पंच पुन्हा पुन्हा इतर पंचनाम्यात घेतला म्हणून त्याचा पुरावा नाकारता येत नाही :

           केवळ तोच पंच पुन्हा पुन्हा इतर पंचनाम्याकरता वापरला या कारणाकरता त्याची साक्ष नाकारता येत नाही. केवळ हितसंबंधी (INTERESTED) साक्षीदाराची साक्ष नाकारता येत नाही. या संदर्भात पूर्वीच निर्णय झालेले आहेत. त्याची साक्ष कडकपणे तपासली असे सूचित केले आहे.

            पाहा: “सुजी सुरेंद्र तिवारी = वि = मध्य प्रदेश सरकार” AIR 1991 S.C 1853 = (1991) 3 S.C.C 627 = 1991 S.C.C (Cri) 916= 1991 Cri L.J 2653 = 1991 Cr.L.R. (S.C) 605= J.T 1991 (3) S.C O.S.L. = (1991) 3 Crime 82 S.C.

अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यासाठी निरीक्षकाचा पुरावा विश्वसनीय धरला जातो कारण नमुना विकत घेऊन सार्वजनिक कर्तव्य तो करता असतो : निरीक्षकाचा पुरावा जर विश्वसनीय असेल, तर स्वतंत्र पंच साक्षीदाराची गरज नाही. त्याचेविरुद्ध जर खास तक्रार कारण असेल तर गोष्ट वेगळी. कायद्याप्रमाणे तो नमुना घेतल्याचे पैसे आरोपीस देतो आणि आपले कर्तव्य पार पाडत असतो. त्यामुळे त्याची साक्ष स्वीकारता येते. या केसमध्ये नमुना खरेदी केला आणि पैसे दिले या संदर्भात वाद नाही. पाहा : “उत्तरप्रदेश = वि = हनीफ” AIR 1992 S.C 1121 (1992) 3 S.C.C 100 1992 Cri L.J 1429 = = = 1992 Cr.L.R. (S.C) 359- J.T 1992(2) S.C 513 = (1992) 2 Crimes 14.

केवळ दुसरा पंच तपासला नाही म्हणून झालेला पुरवा नाकारता येत नाही : या घटनेत आरोपीने कबुलीजबाब दिला आणि नंतर माल काढून दिला आहे. त्या संदर्भात सरकारपक्षाने एक पंच तपासला आहे. त्याने सविस्तर हकिकत सांगितली आहे. तो पुरावा विश्वसनीय वाटतो. आरोपीतर्फे असे म्हणणे की, दुसरा पंच तपासलेला नाही. तेव्हा झालेला पुरावा विश्वसनीय नाही हे म्हणणे आता स्वीकारता येत नाही. खालचे कोर्टात आरोपीने तशी विनंती करून दुसरा पंच साक्षीदार बोलावला असता त्याची उलटतपासणी करता आली असती. पण तशी कारवाई आरोपीतर्फे केली नाही. तेव्हा “निकाल करण्यात येत आहे.” असे सर्वोच्च न्यायालयाने मतप्रदर्शन केले आहे. पाहा : “प्रसाद रमाकांत खाडे. महाराष्ट्र राज्य ” A.I.R 2000 SC 138 = (1999) 3 S.C.C 493= 1999 S.C.C (Cri) 1487 = 2000 Cri L.J 55: J.T 1999 (8) S.C 302. =

पंच साक्षीदार दुजोरा देत नाही तरीदेखील सरकार पक्षाचा पुरावा स्वीकारता येतो : या घटनेत पंचाने सरकारी केसला दुजोरा दिला नाही तरीदेखील इतर पुरावा विचारात घेता आणि माल जप्त करणारे सरकारी साक्षीदार यांचा पुरावा बळकट विश्वसनीय आहे. तो स्वीकारता येतो. सरकार पक्षाचे दोन्ही साक्षीदार विश्वसनीय आहेत. त्यांचे साक्षीमधून के शाबित होत आहे. पाहा: “पी.पी. फातिमा = वि = केरळ राज्य सरकार” 2004

 

S.C.C. (CRI) 1.

क्रि. प्रो. कोड कलम १०० जर पोलीस अधिकारी पचावर विश्वास ठेवत असतील, तर त्यांना साक्षीला बोलाविले पाहिजे : घरझडती संदर्भात कलम १०० आहे. त्यात विविध तरतुदी आहेत. स्थानिक पंच घेता येतात त्यांचे समक्ष झडती घेता येते. जप्त मालाची यादी आरोपीला देता येते. तेव्हा अशी झडती शाबित करण्यासाठी पोलिसांनी कार्टात पंच साक्षीदार तपासले पाहिजेत. पाहा : AIR 1941 BOM. 149 तसेच AIR 1932 BOM. 181 तसेच AIR 1951 BOM. 186.

पंचनाम्याचा वापर आठवण ताजी करण्याकरिता करता येतो : पोलीस तपासात जर पोलिसांनी पंचनामा केला असला, तर ते पंच कोर्टापुढे केस शाबित करण्याकरिता तपासणे आवश्यक आहे. पण तसे न करता जर पंच पुढे कोर्टात तपासले नाही, पोलीसांविरुद्ध अनुमान काढता येते. पाहा : AIR 1941 Bom. 149 = 42 Cr. L.J 556. तर

पंचनामा पोलीस पुराव्याला पूरक असतो : कि.प्रो.कोड कलम १०३ (१)(२) विचारात घेता पंचनामा पूरक पुरावा होतो. तेव्हा पंचनामा करणे आणि पंच तपास आवश्यक असते. पाहा: AIR 1932 Bom. 181 तसेच AIR 1951 Bom. 186.

पंचनाम्यात कुंपण होत असा उल्लेख नाही. म्हणून घटना घडलीच नाही असे म्हणता येत नाही : या खुनाचे केसमध्ये घटनेपूर्वी एक दिवस दोन शेतामधील कुंपण आरोपींनी मोडून टाकले म्हणून वाद होता असा पुरावा आहे. पण पुढे प्रत्यक्षात जागेच्या पंचनाम्यात कुंपण दाखविले नाही. त्याचा संदर्भ नाही. याच एका कारणाकरता घटना घडलीच नाही असे म्हणता येत नाही. इतर पुरावा विचारात घेता येतो. पाहा : “गुजरात राज्य सरकार = वि = चावडा मनाजी चेलाजी वगैर” 2000 Cri. L.J 1091[Guj.].

भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा बरेच वेळा तोच तो पंच वापरला गेला : या घटनेत पोलिसांतर्फे तोच तो पंच म्हणून साक्षीदार तपासला गेला. परंतु पंचाने ही परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे, तर पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ही सत्य • परिस्थिती उघड केली नाही. म्हणूनच उच्च न्यायालयाने इतर स्वतंत्र पुरावा नसल्याने पुरावा स्वीकारला नाही “हे योग्यच आहे” असे सर्वोच्च न्यायालयाने मतप्रदर्शन केले आहे. पाहा : “गुजरात राज्य सी.बी.आय मार्फत = वि= कुमुदचंद्र प्राण जिवन शहा ” १९९५ 4 Cr.LJ ३६२३ (SC).

Leave a Comment