आरोपीची अटक किंवा जमानत

आरोपी अटक

  • आरोपीस ताब्यात घ्यावे.
  • आरोपी करिता आरोपी गार्ड लावावा.
  • अंमलदार सोबत पाठवून आरोपीची मेडिकल तपासणी करून घ्यावी.
  • आरोपीची पूर्ण शरीराची झडती घ्यावी.
  • झडती दरम्यान मिळालेल्या वस्तूची यादी बनवावी. झडतीमध्ये धोकादायक वस्तु मिळाल्यास त्याप्रमाणे नोंदी घेवून कार्यवाही करावी.
  • CCTNS System मध्ये अटकेची नोंद घ्यावी.
  • अटक करतांना नोंदी घ्यायच्या रजिस्टर मध्ये आरोपी अटकेच्या नोंदी घ्याव्यात. 1) आरोपी अटक रजिस्टर, 2) सर्वोच्च न्यायालय रजिस्टर, 3) लॅकअप रजिस्टर, 4) कोठडी आवक जावक रजिस्टर, 
  • आरोपी अटक केले बाबत आरोपीच्या नातेवाईकांना लेखी सुचंनपत्रा द्वारे माहिती ध्यावी.
  • आरोपीस लॅकअप मध्ये टाकावे.

आरोपी अटक करण्याची तरतुद..

  • CrPC चे कलम 41, पोलिसांना एखाद्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार देते.
  • जर एखाद्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा (ज्या गुन्ह्यासाठी पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात) केला आहे असे मानण्यास वाजवी कारण असेल तर पोलीस संबंधीत व्यक्तीस वारंटाशिवाय अटक करु शकतात.

भादवि चे कलम

विषय

41

पोलीस वॉरंटाशिवाय अटक करू शकतात.

42

नाव-गाव न सांगणे अटक.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 42 विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करण्याच्या पोलिस अधिकार्‍यांच्या अधिकाराशी संबंधित आहे. हे कलम एका पोलिस अधिकाऱ्याला दोन परिस्थितींमध्ये वॉरंटशिवाय व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार देते:

  1. पहिली परिस्थिती: एखाद्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा (असा गुन्हा ज्यासाठी पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू शकत नाही) केला आहे, असा विश्वास ठेवण्याचे कारण पोलीस अधिकाऱ्याकडे असेल, त्याच वेळेस  आणि त्या व्यक्तीने आपले नाव आणि पत्ता देण्यास नकार दिला किंवा खोटे नाव किंवा पत्ता दिला, जो अधिकार्‍याला खोटे असल्याचे मानण्याचे कारण आहे.
  2. दुसरी परिस्थिती: एखाद्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केला आहे असा विश्वास ठेवण्याचे कारण पोलिस अधिकाऱ्याकडे असल्यास (असा गुन्हा ज्यासाठी पोलिस अधिकारी वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात), आणि ती व्यक्ती त्यांचे नाव आणि पत्ता सांगl नसेल किंवा त्या व्यक्तीने दिलेले नाव किंवा पत्ता खोटा आहे यावर अधिकाऱ्याकडे विश्वास ठेवण्याचे कारण आहे.

43

खाजगी नागरिकास आरोपीस अटकेचे अधिकार..

  • CRPC कलम 43 (1) नुसार कुणतीही काजगी व्यक्ती, तिच्या समक्ष एखाद्या व्यक्तीने बिनजमानती/दखलपात्र अपराध केला आहे असे दिसत असेल तर ति व्यक्ती आरोपीस अटक करु शकते. परंतु अटकेनंतर तिने सदर अटक व्यक्तीस त्वरीत पोलीसांसमोर हजर करावे.
  • CRPC कलम 43 (2) नुसार अशा अटक केलेल्या व्यक्तीस  पोलीसांनी परत अटक करावे.
  • CRPC कलम 43 (3) नुसार जर आरोपी व्यक्तीने, वरील CRPC कलम 42, प्रमाणे अपराध केला असल्यास पोलीस त्यास अटक करतील. जर त्याने कुठलाही अपराध केला नाही असे समजन्यास कारण असेल तर त्यास त्वरीत सोडुन दिले जाईल. 

44

दंडाधिकाऱ्याकडून अटक.

45

सशस्त्र सेनादलाच्या सदस्यांना खास संरक्षण.

46

अटक कशी करावयाची पद्धत.

47

बंदिस्त घरात प्रवेश – झडती.

48

अपराध्याचा अन्य ठिकाणी पाठलाग. (भारतभर कुठेही)

49

अटकेनंतर आरोपीवर विनाकारण दबाव नको.

अटक केलेली व्यक्ती पळुन जावु नये म्हणुन जेवढा प्रतिबंध आवश्याक आहे त्यापेक्षा जास्त प्रतिबंध आरोपीवर नको.

50

अटकेची कारणे आरोपीस देणे, तसेच आरोपीस सदर गुन्हा जामीनपात्र आहे किंवा कसे याची माहीती देणे. आरोपी अटक झाल्यास, अटक केलेल्या व्यक्तीच्या मित्राला किंवा नातेवाईकाला आरोपी अटक झाल्याची माहिती देणे आवश्यक आहे.

51

अटक व्यक्तीची झडती.

52

घातक शस्त्रे कबजात घेणे.

53

वैद्यक व्यवसायीने आरोपीची तपासणी.

आर्टिकल पूर्ण होताच प्रसिद्ध करण्यात येईल… 

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

आरोपी जमानत

Accordion Content

Leave a Comment