दुखा:पतीच्या गुन्ह्यतील साक्षीदारांची तपासणी.

दुखा:पत साक्षीदार आणि त्यांची तपासणी.

Who are the main witnesses in the crime of injury?

गुन्ह्यतील साक्षीदार:-

  • घतांनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी.
  • घटणेच्या पार्श्वभूमी बाबत माहिती असणारे फिर्‍यादी, आरोपी, पिडीत ला जाणणारे लोक.
  • घटणे बाबत आरोपींनी माहिती सांगून ज्यांचे समक्ष गुन्हा कबुल केला आहे (गुन्हयाची कबुली ज्या त्रयस्थ इसमाकडे दिली) असे लोक.
  • घटनेला पूर्णत्वास नेने कमी आरोपींनी ज्यांचे कडून हत्यारची जमवाजमव केली असे लोक.
  • घटनास्थळाचे फोटो काढणारे / व्हिडिओ शुटिंग करणारे इसमाचे बयाण घ्यावे.
  • जखमींना दवाखान्यात घेवून जाणारे लोक.
  • जखमींना ज्या वाहनाने घेवून गेले त्या चालक इसमचे बयाण घ्यावे.

………..बयाण लिहिण्याचे आमचे टूल्स आपण वापरुन बघितले काय?………

पोलिस बयाण :-

  • घटनेतील मुद्देमाल CA तपासणी कमी घेवून जाणारे पोलिस लोक.
  • घटनेतीन मुद्देमाल CA कार्यालयातून परत आनणारे पोलिस लोक.
  • जखमीच्या अंगावरील कपडे हजर करणारे पोलीस कर्मचारी यांची बायाने घ्यावी.
  • मुद्देमाल कारकूनाचे जप्त मुद्देमाल ताब्यात दिले बाबत व तो मुद्देमाल सी.ए. तपासणीस पाठविलेबाबतचे सविस्तर बयाण नोंदवावे.

……….मुद्देमाल मोहरर बाबत अधिक माहिती येथे बघा………..

आरोपी अनोळखी असल्यास:-

  • आरोपी मिळून आल्यावर आरोपीची ओळख परेड करावी.

(आरोपीची ओळख पटविणे कामी ज्या लोकांची मदत झाली त्या सर्व इसमांची बायाने घ्यावी.)

  • फोटो / व्हिडिओ फोटोग्राफर.
  • फोटो वरुन ओळख पटविणारे इसम.
  • आरोपीचा स्केच काढनारे इसम.
  • आरोपीस ओळखणारे प्रतिष्ठित लोक.
How to examine witnesses in a crime of injury?

साक्षीदाराची ओळख:- ज्या साक्षीदारचे बयाण घेतले जात आहे त्या साक्षीदाराची ओळख सर्वप्रथम दिली जावी. ( नाव, गाव, पत्ता, वय, जात, मोबाईल क्र.)

गुन्ह्याची तारीख/वेळ/ठिकाण स्पस्ट करावे:- साक्षीदारकडून बायणात गुन्ह्याची तारीख वेळ व ठिकाण स्पस्ट करावे.

ज्या साक्षीदाराचा गुन्ह्यासंदर्भात सहभाग:- नमूद गुन्हा साक्षीदारशी संबंधित असल्यास त्याचा आरोपी किव्हा साक्षीदारशी असणारा संबंध लिहिला जावा. साक्षीदार आरोपीस / फिर्यादिस ओळखतो किव्हा कसे हे नमूद करावे.

अनोळखी आरोपी पिडिता संदर्भात:- साक्षीदार आरोपी / पिडीतास ओळखत नसल्यास त्याच्या शरीरयष्ठी बाबत साक्षीदारच्या बायणात घ्यावे. साक्षीदारस आरोपी परत दिसल्यास तो त्यास ओळखेल किव्हा कसे या बाबत बायणात घ्यावे.

आरोपीच्या सवई:- घटनास्थळावर आरोपीच्या व्यवहार बाबत, सिगरेट पितो, बिडी पितो, दारू पित आला, मराठी/हिन्दी कुठली भाषा बोलतो, कपडे कसे घातलेला होता,

……………बयाण लिहिण्याचे आमचे टूल्स आपण वापरुन बघितले काय?……….

गुन्हा घडला तेव्हा साक्षीदारचे लोकेशन:- गुन्हा घडला तेव्हा साक्षीदार हा घतांनास्थळावर होता किव्हा तो बाहेर होता व त्याला घटनेबाबत नंतर कळाले हे स्पस्ट करावे.

घटनास्थळावरील  साक्षीदारचे आरोपी पासून अंतर:-  साक्षीदार हे घटनास्थळावर असल्यास ते तिथे कसे व कुठल्या कामाने आले होते हे स्पस्ट करून प्रत्यक्ष आरोपी/ पिडीत यांचे पासून साक्षीदार किती अंतरावर होते हे स्पस्ट लिहावे. जेणे करून साक्षीदारणे घटणे स्पस्ट बघितली हे स्पस्ट करता येईल.

प्रकाश:-  घटना घडली तेव्हा वेळ काय झाला होता व साक्षीदारणे घटना कश्याचे प्रकाशात पहिली हे स्पस्ट करावे. 

साक्षीदाराने ऐकलेले आरोपीचे संभाषण:- वाद झाला असल्यास आरोपी व पिडीतमध्ये काय बोलणे झाले, साक्षीदारणे काय ऐकले हे साक्षीदारचे बायणात लिहावे. 

साक्षीदाराने पाहिलेले आरोपीचे हातातील हत्यार/वस्तु:- आरोपीने सोबत हत्यार आणले असल्यास किव्हा घटनास्थळावरील एखादी वस्तु हत्यार म्हणून वापरले असल्यास ते स्पस्ट करावे. 

किती आरोपींनी किती पिडीतास मारले:- आरोपी व पीडित यांची संख्या किती, व कोणत्या आरोपीने कुठल्या पिडीतास मारले/ वाद केला हे बायणात घ्यावे.

आरोपीस कुठे कुठे मारले:- आरोपीनी पिडीतास/फिर्यादीस मारतांना शरीराच्या कुठल्या भागावर मारले त्यामुळे कसं मार लागला हे बायणात घ्यावे.

इतर पुरावे:- घटनेनंतर घटनास्थळी रक्त पडले काय? रक्त आरोपीच्या कपड्यावर उडाले काय? रक्त आरोपीच्या वाहनावर उडाले काय? आरोपीने हत्यार घटनास्थळावरच फेकले की सोबत घेवुन गेला, की थोड्या दूर जावून फेकला, की दुसर्‍या व्यक्तीस दिला. आरोपीने इतर काही वस्तु घटनास्थळावर फेकल्या काय? सिगरेट/बिडीचे थोटुक, दारू बोटल फेकली ?  

पिडीतास मारल्यावर आरोपींचा व्यवहार:- पिडीतास मारल्यावर आरोपीचा व्यवहार कसं होता? त्यांनी आवाज केला, जल्लोष केला, रडला, भाषण दिले, नारे लावले, फटाके फोडले, जे केले ते लिहावे. 

घटनेनंतर आरोपी कुठे व कशाने निघून गेले:- घटनास्थळावरून आरोपी कशाने निघून गेले, पाई गेले, वाहन वापरले, कुठले वाहन. ई.

घटने नंतर पिडीतांनी फिर्यादींनी काय केले:- घटनेनंतर पिडीतांनी काय केले, हॉस्पिटलला गेले, पोलिस स्टेशनला गेले. घाबरून गेले. स्थानिक नेत्याकडे गेले.

इतर माहिती:- 

  • प्रत्येक साक्षीदाराने घटना किती अंतरावरून पाहिली त्याची नोंद प्रत्येक साक्षीदारचे बायणात घेतली जावी.
  • FIR मध्ये नमुद केलेले सर्व साक्षीदारांची बायाने लवकरात लवकर घेतली जावी.
  • एखाद्या साक्षीदाराने एखादा बयाण दिल्या नंतर परत त्या बायनाचे अनुषंगाने काही नवीन बाब संगत असेल तर त्या साक्षीदारचे पुरवणी बयाण नोंदवावे.
  • एकापेक्षा जास्त इसम जखमी असल्यास त्या सर्व जखमीची बायाने घ्यावी. बायणात जखमींचा घटणे संदर्भात काय सहभाग होता हे उजागर करावे.
  • एखादे साक्षीदार महत्वाचे आहे परंतु काही कारणाने त्याचे बयाण घेणे शक्य होत नसल्यास त्याचे करणासह खुलासा आपल्या तपासच्या केस डियरीत नोंद करावे.
  • महत्वाचे साक्षीदारांचे CRPC 164 प्रमाणे जबाब नोंदवावे.