कम्युनिटी पोलिसींग

कम्युनिटी पोलिसींग

  • जनतेच्या दर महिन्याला तसेच सण उत्सवाच्या अगोदर किंवा परिसरात जातीय तणाव निर्माण झाल्यास बैठक घेण्यात येतात. त्या बैठकीत स्थानिक प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा भाग, परीसरातील शांतता, याबाबत चर्चा करून त्या समस्या संबंधीत अधिकारी कडुन समनजुन घेतल्या जातात. व त्या सोडविण्याकरीता पुरेपुर प्रयत्न केला जातो. परीसरीतील प्रश्न पोलीसांना समजतात.
  • नागरीकांच्या समस्या सोडविल्याने नागरीक-पोलीस सुसंवाद वाढतो. लोकांचा नागरीकांवरील विश्वास वाढतो.
  • नागरिकांची पोलीसांच्या कामात उपयुक्त अशी मदत होते.
  • लोकसहभागामुळे काही उघडकीस न आलेले गुन्हे देखील, गुप्त बातमी मिळाल्याने उघडकीस येतात तसेच गुन्ह्यास प्रतिबंध सुध्दा होण्यास मदत होते.
  • बरेचदा जनता-पोलीसांच्या अशा बैठकांना वरिष्ठ पोलीस अधिकारी व तहसिलदार अगर प्रांत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी, पदाधिकारी यांनाही निमंत्रित केले जाते. त्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्यास उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते.
  • ग्रामसुरक्षा समितीची गाव व परिसरात रात्रीची गस्त घातली गेल्याने, दरोडा प्रतिबंधक उपाय होतात. गाव व परिसरात आलेल्या भटक्या टोळ्यांची, अनोळखी इसमांची माहिती पोलीसांना मिळते.
  • पोलीस तपासामध्ये, सण-उत्सव, निवडणुका, विविध मिरवणुका बंदोबस्त इत्यादीवेळी जनतेकडुन पोलीसांना योग्य ती मदत त्वरीत मिळते.
  • पोलीस ठाणे पातळीवर गावांमध्ये असलेल्या जमिनीच्या व इतर कारणाने दोन गटांमध्ये असलेले वाद, वैमनस्य हे पिढ्यानपिढ्या चालु असतात, असे वाद ग्राम पातळीवरच मिटविले जातात. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढला जातो. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समितीचे काम उत्कृष्ट आहे. गाव तंटामुक्त झाले आहे अशा गावांना शासनातर्फे दरवर्षी रोख स्वरुपाचे पारितोषिक देण्यात येते.
  • मोहल्ला कमिटी:- पोलीस ठाणे पातळीवर प्रत्येक मोहल्ल्यात, चौकी किंवा बीट स्तरावर एक मोहल्ला कमिटी तयार केली जाते. संबंधित मोहल्ला कमेटीत चांगले चारित्र्य असनाऱ्या स्थानिक नागरिकांना स्थान दिले जाते. कमेटीतील सदस्य़ांच्या दर महिन्याला तसेच सण उत्सवाच्या अगोदर किंवा परिसरात जातीय तणाव निर्माण झाल्यास बैठक घेण्यात येतात. त्या बैठकीत स्थानिक प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा भाग, परीसरातील शांतता, याबाबत चर्चा करून त्या समस्या संबंधीत अधिकारी कडुन समनजुन घेतल्या जातात. व त्या सोडविण्याकरीता पुरेपुर प्रयत्न केला जातो. नागरीकांच्या समस्या सोडविल्याने नागरीक-पोलीस सुसंवाद वाढतो. लोकांचा नागरीकांवरील विश्वास वाढतो. नागरिकांची पोलीसांच्या कामात उपयुक्त अशी मदत होते. मोहल्ला कमिटीतील लोकसहभागामुळे काही उघडकीस न आलेले गुन्हे देखील, गुप्त बातमी मिळाल्याने उघडकीस येतात तसेच गुन्ह्यास प्रतिबंध सुध्दा होण्यास मदत होते. 

शांतता कमिटी:- ज्या प्रमाने मोहल्ल्यात मोहल्ला कमेटी असते तशी पोलीस ठाणे पातळीवर पोलीस ठाणे हद्दीतील जनतेत प्रभाव असलेल्या चारित्र्यवान सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश करुन शांतता कमिटीची निर्मीती केली जाते. येणारे सण-उत्सव, निवडणुका, जिल्ह्यात व परिसरात निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर सदर शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येतात. अशा बैठकांना वरिष्ठ पोलीस अधिकारी व तहसिलदार अगर प्रांत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी, पदाधिकारी यांनाही निमंत्रित केले जाते. त्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्यास उत्कृष्ट मार्गदर्शन मिळु शकते. शांतता कमिटीच्या सदस्यांकरवी पोलीसांना कायदा व सुव्यवस्था व शांतता राखणे सुलभ होत असते. अशा घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त उपविभागीय व जिल्हा स्तरावर वरिष्ठांना सादर केले जाते. बैठकांमध्ये झालेल्या चर्चे दरम्यान पोलीस खात्याव्यतिरिक्त नागरिकांच्या इतर सामाजिक समस्यांचा विषयही चर्चिला जातो त्या अनुषंगाने संबंधित विभागाला नागरिकांच्या समस्या अवगत केल्या जातात. जेणेकरून जनतेत पोलीसांविषयी आपुलकी व सहानुभूती निर्माण होते.

ग्रामसुरक्षा दल (महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६३ (ब)) :- वरील अधिनीयमा अन्वये, ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच ग्रामीण जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पोलीसांच्या मदतीकरीता ग्रामसुरक्षा दलाची निर्मीती करण्यात आली असून त्यामध्ये गावपातळीवर पोलीस पाटलांच्या नेतृत्वाखाली स्थानिक होतकरु तरुणांना सामील केले जाते. ग्रामसुरक्षा समितीकडून गाव व परिसरात रात्रीची गस्त घालणे, पोलीसांसोबत दरोडा प्रतिबंधक गस्त करणे, गाव व परिसरात आलेल्या भटक्या टोळ्यांची, अनोळखी इसमांची माहिती घेऊन पोलीसांना देणे. पोलीस तपासामध्ये, सण-उत्सव, निवडणुका, विविध मिरवणुका बंदोबस्त इत्यादीवेळी पोलीसांना योग्य ती मदत करणे अशा प्रकारची कामे केली जातात.

पोलीस मित्र योजना :- पोलीस ठाणे पातळीवर हद्दीतील समजदार, चारित्र्यवान तरुण व होतकरू लोकांचा पोलीस मित्र योजनेत समावेश करण्यात येतो. त्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्यांच्याकरवी हद्दीमध्ये दिवसा व रात्रीची गस्त, हद्दीत होणाऱ्या वेगवेगळ्या जातीय व सामाजिक हालचालींची माहिती घोळा केली जाते. घरफोड्या, चोऱ्या, जबरी चोऱ्या व इतर मालमत्तेविरुद्धचे तसेच शरिराविरुद्धचे गुन्हे, देश विरोधी हालचाली / कारवाया, सण-उत्सव, निवडणुका, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी संदर्भात माहिती जमा करणे, मदत करून घेण्यासाठी उपयोग करून घेताल जातो.

तंटामुक्ती अभियान:- पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम पातळीवर गावांमध्ये असलेल्या जमिनीच्या व इतर कारणाने दोन गटांमध्ये असलेले वाद, वैमनस्य हे काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या चालु असतात त्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी दावे न्यायालयात प्रलंबित असतात अशा प्रकरणांमुळे अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व गाव पातळीवर अशांतता असते. अशा जुन्या वादांचे निकारण करण्यासाठी तसेच काही नविन वाद उद्भवल्यास तात्काळ ग्राम पातळीवरच मिटविण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महात्मा गांधी ग्राम तंटा मुक्ती अभियान ही संकल्पना राबविण्यात येत असून याचा सचिव हा त्या भागातील बीट अंमलदार व अध्यक्ष आणि सदस्य त्या गावातील प्रतिष्ठित व वादग्रस्त नसलेले व्यक्तींमधून निवड केली जाते. सदर समितीच्या कामकाजासाठी ग्राम सेवक, पोलीस पाटील यांचाही समावेश असतो. सदर समितीच्या बैठका नियमित घेऊन त्यामध्ये गावामधील तंटे / न्यायालयात प्रलंबित असलेले परंतु तडजोड होऊ शकणारे तंटे चर्चिले जातात. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढला जातो. या बैठकीचे कामकाज व विषय तंटामुक्ती रजिस्टरवर घेतले जातात व त्याचा अहवाल पोलीस ठाण्यामार्फत उपविभागीय स्तरावर पाठविला जातो तेथून पुढे तो जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समितीचे काम उत्कृष्ट आहे. गाव तंटामुक्त झाले आहे अशा गावांना शासनातर्फे दरवर्षी रोख स्वरुपाचे पारितोषिक देण्यात येते.

Leave a Comment