क्राईम राईटर

क्राईम राईटर

  • क्राईम रायटर हा पोलिस स्टेशन चा कर्मचारी असून तो पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची माहिती आकडेवारी स्वरुपात नोंद  करतो. (रेकॉर्ड ठेवतो)
  • हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो.

पोलीस ठाणे क्राईम राईटर (गुन्हे लेखनिक हवालदार) ची कामे..

  • क्राईम रायटर हा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची माहिती (आकडेवारी) रेकॉर्ड तयार करतो व गुन्ह्यासंबंधातील सर्व अभिलेख अद्यावत ठेवतो.  पोलीस ठाण्यात दाखल होणान्या सर्व गुन्ह्यांच्या कागदपत्रे सांभाळुन ठेवतो.
  • दखलपात्र गुन्ह्यासंबंधाने क्रॉस नोंदी घेण्यात आल्या किंवा नाही याची शहानिशा करून क्रॉस नोंदी घेण्याचे काम क्राईम राईटर करतो.
  • पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचे क्राईम रजिस्टर त्यांचेकडे असते. तो वेळोवेळी ते प्रभारी अधिकाऱ्याकडे ठेवून गुन्ह्यांची नोंद त्यात करूवुन, अभिलेख अद्यावत करून घेत असतो. ( पोलिस म‌ॅनुअल नुसार पोलिस स्टेशन च्या प्रभारी अधिकारी ने भाग 5 चे गुन्ह्याचे रजिस्टर स्वतःचे हस्ताक्षरात लिहायचे आहे.)
  • दोषारोप  क्रमांक-तपास पूर्ण झालेल्या गुन्ह्यांचे दोषारोप पत्रावर, दोषारोप क्रमांक टाकून कोर्टाकडे पाठवत असतो. कोर्टात दाखल होणारे सर्व दखलपात्र गुन्हे, अकस्मात मृत्यु, फायनल रिपोर्ट यांच्या अंतिम अहवालाला क्रमांक देतो. 
  • वरिष्ठ कार्यालयातून गुन्हे प्रतिबंधक कारवाई संबंधाने मागितलेल्या माहितीचे अहवाल तयार करणे. गुन्ह्यांविषयी माहिती तसेच प्रशासकीय माहिती तो प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवितो. 
  • मिटींग बाबत ची माहीती तयार करणे. घटक प्रमुखाची मासिक मिटींगची माहिती, तिमाही, सहामाही वार्षिक गुन्ह्यांची आकडेवारीची माहिती तयार करणे. व त्याचे  रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. तसेच गुन्हे परिषदांसाठी, गुन्हे मासिक मिटींगसाठी आगाऊ लागणारी गुन्ह्यासंबंधातील माहिती तयार करून वरिष्ठांना पाठवितो.
  • तपासी अधिकाऱ्याला सहकार्य, गुन्हाच्या तपासात तपासकामी माहीती पुरविणे ही कामे त्याला करावी लागतात.

गुन्हे लेखनिक हवालदार यांच्याकडे असलेले अभिलेख..

  • केस डायरी
  • दोषारोप पत्र स्थळप्रत
  • समरी अहवाल स्थळप्रत
  • क्राईम रजिस्टर (गुन्हे नोंद रजिस्टर) भाग-5,
  • क्राईम रजिस्टर भाग-6,
  • क्राईम रजिस्टर दारुबंदी,
  • क्राईम रजिस्टर
  • अकस्मात मृत्यु रजिस्टर,
  • अंतिम अहवाल, ए, बी, के, एन.सी. अबेटेड समरीचे स्थळप्रत
  •  गुन्हे शाबितीचे रजिष्टर (GCR)
  • गाव गुन्हे पुस्तक (Village Crime Book)
  • माहिगार गुन्हेगारांचे रजिटर (KCR)
  • हिस्ट्रीशिट
  • प्रभारी अधिकारी यांची आठवडा डायरी
  • संदर्भ बुक (Reference Book)
  • पर्सनल फाईल

दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे लेखनिक हवालदार (क्राईम राईटर) यांनी लिहायचे अभिलेख..

  • पहिली खबर बुक रजिस्टर
  • दोषारोप पत्र / फायनल रिपोर्ट स्थळप्रत
  • Village Crime Register (गाव गुन्हे नोंदवही)
  • केस डायरी
  • जावक रजिस्टर (आउटगोइंग रजिस्टर)
  • मुद्देमाल क्रमांक रजिष्टर
  • क्राईम रजिष्टर (क्राईम रजिस्टर भाग-5, क्राईम रजिस्टर भाग-6, क्राईम रजिस्टर दारुबंदी, क्राईम रजिस्टर, अकस्मात मृत्यु रजिस्टर,) (सर्व प्रकारचे ईतर क्राईम रजिस्टर)
  • स्टेशन डायरी
  • गुन्ह्याचा कोर्टातील निकाल रजिस्टर

दखलपात्र गुन्हा उघडकीस आल्यानंतर गुन्हे लेखनिक हवालदार (क्राईम राईटर) यांनी लिहायचे अभिलेख..

  • अटक रजिस्टर
  • माहितगार गुन्हेगारांचे रजिष्टर
  • मुद्देमाल रजिष्टर (मुद्देमाल जप्त झाले असल्यास)
  • निगरानी रजिष्टर (Surveillance Register)
  • पाहिजे असलेले गुन्हेगारीचे रजिष्टर (गुन्ह्यात आरोपी अटक नसल्यास)

दखलपात्र गुन्हे उघडकीस आनने कामी क्राईम राईटर ने अद्यावत ठेवायचे अभिलेख व त्याची  कार्यप्रणाली..

  • क्राईम राईटर ने हिस्ट्रीशिटर इसमांचे रजिस्टर अद्यावत ठेवावे. जेनेकरून आपल्या क्षेत्रातील आरोपी कोन आहेत व त्यांचा ठाव ठिकाना कुठे आहे या बाबत तपाशी अंमलदार ला त्वरीत महीती होईल. 

  • क्राईम राईटर ने शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध अटक व इतर गुन्ह्यातील अटक आरोपीतांच्या सर्च स्लिपा तपासी अमलदार कडुन घ्यावे व फिंगर प्रिंट ब्युरो कडे पाठवावे.

  • क्राईम राईटर ने माला विरुद्ध गुन्ह्यातील आरोपीतांचे फोटो जमा करून त्याचा संग्रह तयार करावा. (आरोपींचा नजिकचे काळातील फोटोंचा अल्बम तयार करणे.)

  • क्राईम राईटर ने मालाविरूद्ध चे गुन्हे दाखल झाले नंतर चौकशी फार्म  (इन्ट्रॉगेशन फॉर्म) तपासी अधिकारी कडुन भरून घेउन वेळेवर गुन्हे शाखा येथे जिल्ह्याचे क्राईम रेकार्ड तयार करने कामी  पाठवावे.

  • माला विरुद्ध चे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपी चा शोध घेने कामी, परिसरातील आरोपी बाबत तपासी अधिकारीने MOB सजेशन (Modus Operandi – Modus operandi can also be defined as a specific method of accomplish a crime.) मागितल्यास ते गुन्हे शाखेकडून प्राप्त करून घेऊन तपासी अंमलदारना पुरविने.

  • पोलीस स्टेशन मध्ये दाखल  गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीतांची गुन्हे करण्याच्या पद्धतीनुसार यादी तयार करणे.

  • सर्च स्लिपांची ट्रेस व अनट्रेसच्या नोंदी सर्चिंग स्लिप रजिस्टर/ट्रेस स्लिप रजिस्टर रजिष्टरला ठेवणे.

  • पॅरोल रजेवरील फरार आरोपी रजिस्टर

  • फरार / नजरेआड गुन्हेगार रजिस्टर

  • भटक्या टोळ्या रजिस्टर

  • माहितगार गुन्हेगार रजिस्टर

  • मालमत्ता गुन्ह्यातील गुन्हेगार फोटो संग्रह (अल्बम)

  • चौकशी ( Introgation) फॉर्म रजिस्टर

  • पाहिजे असलेले गुन्हेगार रजिस्टर

  • सर्व्हेलन्स रजिस्टर

  • हिस्ट्री शीटर रजिस्टर

  • ई फॉर्म रजिस्टर

  • सर्चिंग स्लिप रजिस्टर 

  • ट्रेस स्लिप रजिस्टर

  • तडीपार गुन्हेगार रजिस्टर

  • कोर्ट कन्व्हेक्शन स्लिप रजिस्टर

  • अ रोल रजिस्टर

  • ब रोल रजिस्टर

  • शरिराविरुद्ध गुन्हे रजिस्टर

दखलपात्र गुन्हे उघडकीस आनने कामी क्राईम राईटर ने अद्यावत ठेवायचे अभिलेख.

(या अभीलेखास MOB रजिस्टर्स सुद्धा म्हणतात.. )

 

  • पॅरोल रजेवरील फरार आरोपी रजिस्टर

  • फरार / नजरेआड गुन्हेगार रजिस्टर

  • भटक्या टोळ्या रजिस्टर

  • माहितगार गुन्हेगार रजिस्टर

  • मालमत्ता गुन्ह्यातील गुन्हेगार फोटो संग्रह (अल्बम)

  • चौकशी ( Introgation) फॉर्म रजिस्टर

  • पाहिजे असलेले गुन्हेगार रजिस्टर

  • सर्व्हेलन्स रजिस्टर

  • हिस्ट्री शीटर रजिस्टर

  • ई फॉर्म रजिस्टर

  • सर्चिंग स्लिप रजिस्टर 

  • ट्रेस स्लिप रजिस्टर

  • तडीपार गुन्हेगार रजिस्टर

  • कोर्ट कन्व्हेक्शन स्लिप रजिस्टर

  • अ रोल रजिस्टर

  • ब रोल रजिस्टर

  • शरिराविरुद्ध गुन्हे रजिस्टर

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आपन कटीबध्द आहोत.)

Leave a Comment