CRPC कलम 111, प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी यांनी, सामनेवाला करिता काढायची करणे दाखवा नोटीस.

कार्यकारी दंडाधिकारी यांनी, CRPC 111, अन्वये सामनेवाले करिता काढायची करणे दाखवा नोटीस.

CRPC 1973, कलम 111 :- 

  • पोलीसांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही चा अहवाल, इस्तगाशा कार्यकारी दंडाधिकारी, याचे कडे पाठविल्यावर कार्यकारी दंडाधिकारी, त्या अहवालाचे अवलोकन करून, चौकशीला सुरुवात कारतात. त्याची सुरावत ते कारणे दाखवा नोटीसने करतात.
  • CRPC 1973, कलम 107, 108, 109, 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अहवाल, इस्तगाशा मिळाल्यावर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी संबंधित गैरअर्जदार इसमास त्याचे विरुध्द जमीन व बंधपत्र का घेऊ नये, याचे कारण दाखविण्याची नोटीस काढतात.
  • गैरअर्जदारने दिलेल्या मुदतीत उत्तर न दिले तर त्यास काहीही कारण सांगायचे नाही, असे समजून एकतर्फी कार्यवाही केली जाईल, हे CRPC 1973, कलम 111 च्या कारणे दाखवा नोटीस मध्ये बजावले जाते.
  • कार्यकारी दंडाधिकारी ने काढलेल्या करणे दाखवा नोटीस मध्ये, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीचा थोडक्यात गोषवारा द्यावा. (साक्षीदारांचे नाव, फिर्याद, रिपोर्ट वा जबाबाच्या नकला देऊ नये. सामनेवाल्याला आपला बचाव करता येईल, फक्त इतपतच माहिती द्यावी.)
  • कार्यकारी दंडाधिकारीनी त्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सामनेवाल्या कडून किती रक्कमेची हमी ? किती इसमांची हमी ? किती काळांसाठी हमी ? हमीदार कोणत्या चारित्र्याचे असावेत ? कोणत्या वर्गाचे असावेत ? या बाबी नमुद कराव्या.

CRPC section 111, Show Cause Notice to non-applicant,

  • कार्यकारी दंडाधिकारी यांनी, CRPC कलम 111, अन्वये सामनेवाला करिता काढलेली कारणे दाखवा नोटीस पोलिस बजावतात.
  • पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नी आपल्या पोलीस स्टेशन मधून किती प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे अहवाल, इस्तगाशा, प्रतिबंधात्मक कार्यवाही करिता, कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयात गेल्या व त्यांचे कडून किती करणे दाखवा नोटीस निर्गमित करण्यात आले या प्रमाणावर लक्ष ठेवावे.
  • गरज वाटल्यास कार्यकारी दंडाधिकारी चे संपर्कात राहावे.
  • आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिबंधात्मक कार्यवाही, झाल्यास परिसरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते.
  • जनतेत पोलीसांचे कार्य दिसून येते.
  • गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हे/भांडण करायला घाबरतात.

Leave a Comment