CRPC, कलम 108, प्रक्षोभक साहित्य प्रसृत करणाऱ्या इसमावर प्रतिबंधात्मक कार्यवाही.
CRPC, कलम 108, प्रक्षोभक साहित्य प्रसृत करणाऱ्या इसमा कडून चांगल्या वर्तना करिता जामीन.(Preventive Action)
CRPC 1973, कलम 108 :- प्रक्षोभक साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाचा जामीन घेवून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे.
- प्रक्षोभक सामग्री म्हणजे काय?
या कलमाचे अनुषंगाने प्रक्षोभक सामग्री म्हणजे, एखादी व्यक्ती, धर्म, जात, वंश, जन्मस्थान, धार्मिक स्थळ, विशिष्ट समाज, राष्ट्र, राज्य, तसेच कायद्याने स्थापन झालेले सरकार, यांचे विरोधात, समाजात राग, आक्रोश किंवा शत्रुत्व भडकवणारी सामग्री किंवा माहिती, विशेषत: आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक भाषा वापरून, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवून किंवा द्वेषयुक्त भाषणाचा प्रचार करून, समाजात तेढ निर्माण करतो, सरकार विरोधात तूछतेची भावना निर्माण करतो, राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणण्याचा प्रयत्न करतो, धार्मिक भावना दुखावून समाजात वैर निर्माण करतो. किंव्हा समाजात बिभित्स / अश्लील साहित्य प्रसारित करतो.
प्रक्षोभक सामग्रीचे उदाहरण म्हणजे राग भडकावण्याच्या किंवा भेदभावाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने लोकांच्या विशिष्ट गटावर हल्ला करण्यासाठी वरील बाबी वर अपमानास्पद भाषा वापरणारी सोशल मीडिया पोस्ट असू शकते.
- CRPC चे कलम 108 या कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करिता, जी व्यक्ती भा. दं. वि. च्या कलम 124 (अ), 153 (अ), (ब), 295 (अ), 292, 500(मानहानीची शिक्षा:- दुसर्याची बदनामी करणे), 503 अन्वये शिक्षापात्र अपराध करीत असेल म्हणजेच राष्ट्रविरोधी कारवाई, धर्म, वंश, जन्मस्थान वगैरे कारणावरुन द्वेष वाढविणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधक आरोप करणे किंवा अश्लील साहित्याची विक्री, व्यवहार करीत असेल, त्या वेळेस प्रतिबंधात्मक कार्यवाही करता येते.
- एखादी व्यक्ती उपरोक्त गुन्हा करीत असले बाबत, कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यास, ते सदर इसमाकडून चांगल्या वर्तणुकीसाठी एक वर्ष मुदतीचे बंधपत्र जामीनदारासह किंवा जामीनदाराशिवाय घेतात.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 124 अ : राजद्रोह, प्रजाक्षोभनचे कृत्य करणे : कायद्याने स्थापन झालेल्या शासनाविरूध्द द्वेषाची, तुच्छतेची, अप्रीतीची व शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 153 अ : धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक कृती करणे.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 153 ब : राष्ट्रीय एकात्मतेस बाधक असे आरोप, निवेदन करणे.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 295 अ : धार्मिक समजुती व धार्मिक भावनांचा बुध्दिपुरस्सर अपमान करणे.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 292 : बीभत्स, अश्लील पुस्तकाची विक्री, बाळगणे, जाहीरपणे प्रदर्शित करणे, भाड्याने देणे, त्यांची ने-आण करणे अशी कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर तालुका दंडाधिकारी यांना कारवाई करता येते. या कलमाखाली एक वर्षाकरिता चांगल्या वागणुकीसाठी जामीनदारासह किंवा जामीनदाराविना बंधपत्र का घेण्यात येऊ नये याचे कारण दाखविण्यासाठी फर्मावता येऊ शकते. आणि खात्री पटल्यावर त्यानुसार जामीनदारासह किंवा जामीनदाराविना बंधपत्र घेता येते.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 500 : भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 500 हे मानहानीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. बदनामी ही एक कायदेशीर संज्ञा आहे ज्यात एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचावी या उद्देशाने त्यांच्याबद्दल काहीतरी बदनामीकारक बोलून किंवा लिहून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्यांचे प्रतिष्ठेला हानी पोहोचवितो.
- भा.दं.वि. (I.P.C.) कलम 503 : जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करायला लावण्याच्या उद्देशाने दुसर्या व्यक्तीला, तिचा देह, लौकिक, मालमत्ता किंव्हा ज्या अन्य व्यक्तीशी ती संबंधित आहे अश्या अन्य व्यक्तीचे देह वा लौकिक ला हानी पोहोचवण्याची धमकी दिली किंव्हा भीती दाखविली तर तो फौजदारी गुन्हा मानला जातो, या कृतीला गुन्हेगारी धमकी (criminal intimidation) म्हणतात.
- प्रसिद्ध केले, असे साहित्य जे साहित्य मुद्रण व पुस्तक नोंदणी कायदा 1867 प्रमाणे नोंदणीकृत केले असेल तर तश्या संपादक किंवा मालक यांचेवर राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कारवाई केली जात नाही.
- भा. द.वि. च्या वरील चर्चा केलेल्या कृत्यांबाबत शिक्षा झालेली असेल तर पुन्हा या कलमाप्रमाणे कारवाईचा बोजा योग्य नाही, असे न्यायालयाने त्यांचे मत व्यक्त केले आहे.
- एखादा इसम अश्लील साहित्याचा प्रचार व प्रसार करीत असेल व त्यामुळे पुन्हा अपराध घडण्याची भीती / धोका असेल तर CRPC 1973, कलम 108 प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करयाला पाहिजे.
- या कलमांतर्गत चांगल्या वार्तूनुकिसाठी जमीन घेतला जातो, शांतता ठेवण्यासाठी नाही.