आरोग्य विषयक सुविधा (Health facilities)
महाराष्ट्र शासनाच्या तसेच पोलीस विभागाच्या, आरोग्य विषयक सुविधा (Health facilities)
- कर्मचारी किंवा त्यांचे कुटूंबीय नेमुन दिलेल्या हॉस्पीटल मध्ये भर्ती झाल्यावर पोलीस कल्याण शाखेमधुन फार्म भरुण घ्यावे.
- सोबत रुग्णाचे २ फोटो आणावे.
- तसेच हॉस्पीटल ने सांगीतलेले संबंधीत कागदपत्रे. १. ओळखपत्र २. कुटुंब आरोग्य योजनेचे कार्ड ३, आधार कार्ड ४. रेशन कार्ड इत्यादी.
MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.) (पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)
- पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना वैद्यकीय तपासनीची सुविधा प्रदान केली गेली आहे.
- 45 वर्षावरील अधिकारी/कर्मचारींची वैद्यकीय तपासनी.
- आपले नाव 45 वर्ष वयाचे यादीत आल्यावर, पोलीस कल्यान शाखा, मार्फत पोलीसांनी स्वताःची वैद्यकीय तपासनी करुन घ्यावी.
वैद्यकीय अग्रिम
- जे आजार कुटूंब आरोग्या योजनेच्या ३२ आजारामध्ये बसत नसेल तर त्यांना वेलफेअर मार्फत अर्ज केल्यास वैद्यकीय अग्रीम देण्यात येते.
- कर्मचारी यांनी 1) स्वतःचा अर्ज, 2) वैद्यकीय कागदपत्र व 3) खर्चाबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
- विषेश पोषण आहार
- महीला पोलीसांच्या पहील्या प्रसुतीतसाठी 5000 रुपये.
- महीला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पहिल्या प्रसुतीदरम्यान 1) अर्जासोबत 2) वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
- सुदृढ बालीका अनुदान
- जन्म झालेले अपत्य मुलगी झाल्यास, वरील, विषेश पोषण आहार चे मिळनारे 5000 शिवाय अतीरीक्त 5000 रुपये.
- व सोबत मुलगी झाल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करावे.
- शारीरीक सहाय्य साधने
- चस्म्यासाठी एकावेळी 500 रुपये
- श्रवणयंत्र, कृत्रीम अवयवांसाठी एक वेळेस 5000 रुपये.
- सदर कर्मचारी यांनी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या नावाने अर्ज सादर करावे.