MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.)

MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.) चा लाभ कसा घ्यावा...महत्वाच्या बाबी...

रुग्णालया कडुन पुरविल्या जानाऱ्या सोई सुविधा..

  • महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयातच या योजनेचा फायदा घेण्यासाठी दाखल होणे बंधनकारक आहे.
  • सदर मोफत उपचार हे फक्त रूग्णालयात अंतररुग्न म्हणुन दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी आहेत.
  • उपचाराकरीता लागनारी औषधे रुग्णालयाकडून पुरविली जातील. बाहेरुन औषधे खरेदी करावी लागलीच तर खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम पोलीस अधिकारी / अंमलदार यांना करावी लागणार.
  • किमो थेरपी, डायलिसीस यासाठी बाह्य रुग्ण म्हणून खर्चाची प्रतिपूर्तीची रक्कम रुग्णाने द्यावी.
  • 45 वर्षावरील सदस्याला (फक्त पोलीस अधिकारी / अंमलदार) वार्षीक आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करता येईल.
  • शासकीय / नगरपालिका / जिल्हा परिषद रुग्णालयात 2 ते 5 महिन्यापर्यंत नांव नोंदविलेल्या प्रसूतीसाठी वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती देय राहील.

रुग्णालयात दाखल होतांना जुळवायच्या कागदपत्राचा तपशिल :-

  • रुग्णालयात दाखल होतांना रुग्णालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या, मोफत सुविधा बाबतच्या अर्जावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
  • रुग्णालयात आंतररुग्ण म्हणून दाखल झाल्याबरोबर स्वत:च्या कार्यालयास (शक्यतो पोलीस कल्यान शाखेस), (महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजना कार्यालयास) तात्काळ कळविणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आवश्यक असणारे अर्ज, परिशिष्ट एक हमीपत्र, कुटूंब प्रमाणपत्र भरावे व त्यावर  रुग्णालय सोडण्यापूर्वी स्वाक्षरी करावी. सदर अर्ज न भरल्यास व स्वाक्षरी न झाल्यास, या योजनेचा फायदा मिळणार नाही.
  • रुग्ण नोंदणी फी.
  • रुग्ण प्रवेश फी.
  • रोगाशी संबंधीत नसलेली औषधे.
  • रुग्णासाठी गरजेचा विशिष्ट पथ्य आहार,
  • रुग्णासाठी घेतलेले विशिष्ठ कपडे, इतर साहीत्य
  • नातेवाईकांसाठी घेतलेले अतिरिक्त बेड, जेवण इतर सुविधा खर्च

पोलीस कुटूंब आरोग्य योजनेच्या पॅनलवरील डॉक्टरांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक – 9223329008

दुरध्वनी क्रमांक- 022-22691964, 022-22662060

फॅक्स क्रमांक – 022-22691968

MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.) बाबत थोडक्यत माहीती..

  1. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनानी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू केलेली आरोग्य योजना आहे. या योजनेत विविध आजारांवर वैद्यकीय उपचार आणि हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेतील लाभार्थ्यात पोलिस कर्मचाऱ्यांचे पती/पत्नी, मुले आणि आश्रित पालकांचा समावेश आहे.
  2. या योजनेंतर्गत, पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेद्वारे अधिकृत असलेल्या पॅनेलमधील रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात. 
  3. योजनेचा लाभ घेण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची या योजनेत नावनोंदणी करून अर्ज भरून नियुक्त प्राधिकरणाकडे जमा करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना आणि नावनोंदणी प्रक्रियेचा तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळू शकतो.

(ही योजना पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी शासकीय योजना आहे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांना मोफत वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यात मदत करते.)

GR : MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.) सर्व शासन निर्णय

MPKAY (पोलीस कुटुंब आरोग्य योजना.) आजाराची यादी

Leave a Comment