वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, (Medical Bill Reimbursement)

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या कागदपत्रांची तपासणी व सर्वसाधारण तृट्या.

 1.  शासकीय कर्मचारी यांनी वैद्यकीय खर्चाच्या अनुज्ञेय असणाऱ्या प्रतिपूर्तीच्या सर्व मागण्या उपचार पूर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत वैद्यकीय खर्च प्रतिपूती देयकाची मागणी कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे.
 2. शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येते त्याच लेखाशिर्षाखाली वैद्यकीय खर्च प्रतिपूती देयके खर्ची घालण्यात यावे.
 3. कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देय व अनुज्ञेय रक्कम त्यांच्या कायदेशीर वारसास देण्यात येईल.

(कार्यालयातील कागदपत्र पडताळनी नुसार तृट्या कमी/जास्त होवु शकतात.)

 1. परिशिष्ठ एक मधील अनु क्र. ८ वरील आजाराचे स्वरुप व कालावधी मधील रकाना मध्ये आजाराचे स्वरुप नमुद करुन देयक सादर करावे.
 2. परिशिष्ठ चार मधील प्रमाणपत्र क वैद्यकीय चिकिस्तक यांचे कडुन भरुन देयक सादर करावे.
 3. प्रमाणपत्र ड मधील रुग्णालय नोंदणी क्र. व दिनांक नमुद करुन देयक सादर करावे.
 4. पती/पत्नी शासकीय सेवेत असल्यानस संबंधीत कार्यालयाकडे वैद्यकीय अनुज्ञेय मागणी सादर न केल्याबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांचे ना अदा प्रमाणपत्र सादर करुन देयक सादर करावे.
 5. वैद्यकीय देयकासोबत माता मुळ बाल संगोपन कार्ड व त्यामधील मातेचा आरसीएच (RCH ID NO.) नमुद करुन देयक सादर करावे. (Xerox Attested)
 6. रुग्णालय नोंदनी प्रमाणपत्रावर जिल्हा शल्य चिकिस्तक यांची सही व शिक्का नमुद करुन देयक सादर करावे.
 7. खर्चाचे प्रमाणक रोख पावत्या /डिस्चार्ज कार्ड /औषधे खरेदी Prescription/प्रयोगशाळा चाचणी अहवाल /Emergency Certificate प्रत देयकासोबत सादर करावे.
 8. खाजगी रुग्णालयातील मोतीबिंदु शस्त्रक्रियेवरील खर्च व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वरील औषधोपचार अनुज्ञेय नाही.(शा.नि.क्र.16/08/1999)   (शासन निर्णय बघण्याकरीता येथे क्लिक करा..)
 9. मेडीसीन लिस्ट मधील औषधांची कॅटेगीरी नमुद करुन देयक सादर करावे.
 10. अधिकारी / अंमलदार यांनी स्वतः उपचार घेतल्यास उपचार कालावधीतील रजा मंजुरी आदेश प्रत देयकाला जोडुन सादर करावे.
 11. रक्कम 5000/- वरील (पेक्षा जास्त) अदा रक्कमाकरीता मुद्रांकित पोच पावती (Revnue Stamp ) जोडुन देयक सादर करावे.
 12. वैद्यकीय देयकामधील मुळ अदा केलेली बिल पावती तसेच मेडीसीन बिल पावती वर Paid by me लिहुन अर्जदार यांनी स्वतः स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
 13. वैद्यकीय देयकासोबत जोडलेले छायांकीत प्रत (वेतनप्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/राशन कार्ड) यावर अर्जदार स्वतः स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
 14. आयकर परताव्याचे प्रमाणपत्रावर आहरण व संवितरण अधीकारी यांची स्वाक्षरी नमुद करावी.
 15. रुग्ण अंमलदारावर अवलंबुन असल्याबाबत सेवापुस्तकातील कुटुंबाचा तपशिल प्रत सादर करावा (निवृत्ती वेतन नियम 116 (14) (आई/वडील).
 16. रुग्ण अंमलदारावर अवलंबुन असल्याबाबत सेवापुस्तकातील कुटुंबाचा तपशिल प्रत सादर करावा. (निवृत्ती वेतन नियम 116 (14) महीला अर्जदार करीता (सासु /सासरे).
 17. अर्जदार यांची आई/वडील शासकीय / निमशासकीय वेतन /निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे? या बाबत प्रभारी अधीकारी यांचेकडुन पडताळणी करुन सदर प्रमाणपत्रावर प्रभारी अधीकारी यांची स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
 18. सेवापटाचे पहीले पान, दुसरे पान तसेच नामनिर्देशित पानाचे छायांकीत प्रत देयकाला जोडुन सादर करावे.

(कार्यालयातील कामकाज पद्धती नुसार हा कालावधी कमी/जास्त होवु शकतात.)

 1. कर्मचारी. (देयक तयार करणे)
 2. पोलिस अधीक्षक कार्यालय, वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक लिपीक. (तृटी)
 3. जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon) (देयक प्रमाणीत करणे)
 4. पोलिस उप-महानिरीक्षक, कार्यालय. (Deputy Inspector General Office) (मंजुरी देणे.)
 5. राज्य शासन ( GR मधील नमूद प्रमाणे मोठ्या रकमेच्या देयकाची मंजुरी करिता.)
 6. पोलिस अधीक्षक कार्यालय. (ग्रँड प्रमाणे रक्कम मंजुरी)
 7. कोषागार कार्यालय (Treasury Office)
 8. Payment.

(उपरोक्त पैकी कुठल्याही टप्यावरून आपला बिल त्रुटी वर परत येऊ शकतो.)

GR : वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, (Medical Bill Reimbursement) संबंधित सर्व शासन निर्णय

असे एकुन 28 आकस्मिक आजार.

( शासन निर्णय दि.19/03/2005 नुसार 5 गंभीर व शासन निर्णय दि. 27/03/2020 नुसार 6 अवयव प्रत्यारोपन व काही नवीन आजाराचा समावेश गंभीर आजारात करण्यात आला आहे.

असे एकूण 11 गंभीर आजार आहे. )

Leave a Comment