नाकाबंदी.
नाकाबंदी.
नाकाबंदी ची गरज..
- पोलीस स्टेशन हद्दीत घडनाऱ्या गुन्ह्यच्या प्रतिबंधासाठी..
- पोलीस स्टेशन परीसरात अचानक मोठा गुन्हा उदा. सराफाची दुकाने लुटणे, पेट्रोलपंप लुट, बँकेची कॅश लुटली जाणे, टोळी युद्धात हत्या इ. गुन्हे घडतात. त्या वेळेस संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगार पोलीस स्टेशन परीसरातुन पळुन जावु नये, त्यांना वेळीच पकडुन त्यांचे कडुन मुद्देमाल हस्तगत केला जावा या उद्देशाने..
- तसेच कुठल्याही गुन्ह्यातील संक्षयीत आरोपी पळुन जावू नये, तसेच संशयित मालाची वाहतुक पकडण्याकामी..
- पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील गुन्हेगारांच्या टोळ्या, समाजकंटक यांना प्रवेश करण्यापासुन थांबविण्यासाठी/ त्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी लावण्यात येते.
नाकाबंदी कशी लावतात..
- नाकाबंदी ही शहराच्या मुख्य रस्त्यावर गाड्या योग्य रितीने अडवता येतील अशा ठिकाणी, बॅरिकेटस् किंवा इतर अडथळे वापरून लावली जाते.
- नाकाबंदीत कर्मचाऱ्यांनी पुर्ण तयारीनीशी व बचाव व स्वःसंरक्षणाच्या साहीत्यानीशी अशा प्रकारे तयारी करून नाकाबंदी करावयाची असते. बरेचदा आवश्यकते नुसार हत्यार बंद पोलीस सुध्दा सोबत घेतले जातात.
- नाकाबंदीसाठी घ्यायचे साहीत्य– लाठी, ढाल, शिटी, टॉर्च, लाल/हिरव्या रंगाची बॅटन, बिनतारी संदेश यंत्र, (संशयित वाहनांचे नंबर) (संशयित इसमाची माहिती)
नाकाबंदी कशी करावी..
- पोस्टे हद्दीत नाकाबंदी करताना माहिती मिळालेल्या वाहनाशी मिळती जुळती वाहन येतांना दिसल्यास प्रथम त्यास हात दाखवुन, रात्री बॅटन चा वापर करून थांबवावी. (भरधाव वेगाने येनारे वाहनास आडवे जावुन वाहन अडवु नये. बरेचदा बेकायदेशीर वाहने, अवैद्य मालाची वाहतुक करणारे व्यक्ती घाबरलेली असतात, अशी वाहने पोलीसांच्या अंगावर येन्याची शक्यता असते.)
- थांबवलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून घ्यावी. (वाहन उभे झाल्यावर त्या वाहनाच्या समोरुन जावू नये, वाहनाचे मागील बाजूने ड्रायव्हरच्या बाजुला जाऊन ड्रायव्हरची चौकशी करावी.)
- थांबविलेल्या वाहानाची कागदपत्रे तपासतांना संशय आल्यास वाहनाची चावी काढून घ्यावी.
- ड्रायव्हरला गाडीखाली उतरवुन त्याची व गाडीची झडती घ्यावी, झडती घेतांना आपले जवानांना चे हाताने घ्यावी. झडती घेनारे जवान व आपल्या सुरक्षेची पुर्ण दक्षता घ्यावी. वाहन चालकास विचारपुस करावी.
- वाहनात स्त्रिया, मुले, वृध्द व्यक्ती, आजारी व्यक्ती, असल्यास त्यांच्याशी आदरपूर्व वागावे.
- विनाकारण सर्वच हलकी व जड वाहने अडवुन रहदारीला खोळंबा करु नये.
- चेक केलेल्या गाड्यांचे नंबर ची नोंदनी करावी. चालकाचे नाव व मोबाईल नंबर नोंद करून घ्यावे.
- नाकाबंदी दरम्यान, संशयित गुन्हेगार व वाहने मिळाल्यास त्यांचे वर या संकेत स्थळावर उहापोह केलेल्या कायद्यान्वये कार्यवाही करावी.
नाकाबंदी दरम्यान पोलीसांना उपयोगी असे कायदे व त्यांची कलमे..
नाकाबंदी दरम्यान पोलीसांना उपयोगी असे कायदे व त्यांची कलमे..
- मोटार वाहन कायदा.
- भा.द.वि.
- गोवंशीय जनावारे वाहतुक.
- रेतीचोरी/रेशन वाहतुक करीता तहशीलदार यांची कार्यवाही.
- लाकुड चोरी करीता वनविभागाची कार्यवाही.
- सुगंधित तंम्बाखु/गुटखा वाहतुक करीता औषध व अन्न प्रशासनाची कार्यवाही.
- बेकायदेशीर रोख रक्कम मिळाल्यास इन्कम टॅक्स (Income Tax Department) विभागाची कार्यवाही.