वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक (Medical Bill Reimbursement) करीता रुग्नालयातुन प्राप्त करावयाचे कागदपत्र.

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक (Medical Bill Reimbursement) करीता रुग्नालयातुन प्राप्त करावयाचे कागदपत्र.

  • जेव्हा आपन उपचार करुन रुग्णालयातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या मनात घरी जायचा विचार प्रबल असतो. रोगी बरा झालेला असतो आणी सर्व जन डिस्चार्ज कधी मिळतो याकडेच लक्ष देवुन असतात. पण त्याच वेळेस आपन एक महत्वाचे काम करणे विसरतो आणी त्यामुळे मग आपल्याला त्याच दवखाण्याच्या वरंवार फेऱ्या मारत बसावे लागते. आपल्या सुट्ट्या पण संपलेल्या असतात, आणी विनाकारण त्रास होने सुरु होतो.

हे महत्वाचे काम म्हणजे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या कागदपत्रांची जमवाजमव करणे.

दवाखाण्यातुन बाहेर पडतांना खालील कागदपत्रे व त्यावर सही शिक्याची पुर्तता करुन घ्यावी.

  • Discharge Card घेणे. (त्यावर डॉक्टर चा सही शिक्का आहे काय चेक करणे, नसेल तर दवाखाण्यातच त्याची पुर्तता करणे.)
  • मुळ बिल पावती (डॉक्टर चे चार्जेस चा खर्च)घेणे. (त्या बिल पवती वर GST क्रमांक असने आवश्याक आहे. नसेल तर त्याच वेळेस सदर बाब डॉक्टरच्या लक्षात आणुन देने व त्या प्रमाणे पुर्तता करुन घेणे.) (GST क्रमांक शिवाय बिल पास होत नाही हे लक्षात ठेवा.)
  •  Medical Store (फार्मशी) मधुन विकत घेतलेल्या औषधाचे प्रत्येक बिल जमा करणे व त्या बिल वर डॉक्टर सा. चे सही व शिक्का मारुन घेणे.
  • (OPD Case Paper) डॉक्टरने लिहुन दिलेले औषधीचे पेपर जमा करणे. (त्यावर डॉक्टर चे सही शिक्का घ्या)
  • रुग्नालय नोंदणी प्रमाणपत्र घेणे. (Attested Copy)

यानंतर भाग दुसरा सुरु होतो. (आपल्याला परत एकदा रुग्नालयात जावे लागते.)

  • बिल तयार केल्या नंतर आपनास वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकावर ज्या – ज्या ठिकानी आवश्याक आहे. त्या त्या ठिकानी पेज वर डॉक्टर चे सही शिक्का घेणे गरजेचे आहे.

(कार्यालयातील कागदपत्र पडताळनी नुसार तृट्या कमी/जास्त होवु शकतात.)

  1. परिशिष्ठ एक मधील अनु क्र. ८ वरील आजाराचे स्वरुप व कालावधी मधील रकाना मध्ये आजाराचे स्वरुप नमुद करुन देयक सादर करावे.
  2. परिशिष्ठ चार मधील प्रमाणपत्र क वैद्यकीय चिकिस्तक यांचे कडुन भरुन देयक सादर करावे.
  3. प्रमाणपत्र ड मधील रुग्णालय नोंदणी क्र. व दिनांक नमुद करुन देयक सादर करावे.
  4. पती/पत्नी शासकीय सेवेत असल्यानस संबंधीत कार्यालयाकडे वैद्यकीय अनुज्ञेय मागणी सादर न केल्याबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांचे ना अदा प्रमाणपत्र सादर करुन देयक सादर करावे.
  5. वैद्यकीय देयकासोबत माता मुळ बाल संगोपन कार्ड व त्यामधील मातेचा आरसीएच (RCH ID NO.) नमुद करुन देयक सादर करावे. (Xerox Attested)
  6. रुग्णालय नोंदनी प्रमाणपत्रावर जिल्हा शल्य चिकिस्तक यांची सही व शिक्का नमुद करुन देयक सादर करावे.
  7. खर्चाचे प्रमाणक रोख पावत्या /डिस्चार्ज कार्ड /औषधे खरेदी Prescription/प्रयोगशाळा चाचणी अहवाल /Emergency Certificate प्रत देयकासोबत सादर करावे.
  8. खाजगी रुग्णालयातील मोतीबिंदु शस्त्रक्रियेवरील खर्च व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वरील औषधोपचार अनुज्ञेय नाही.(शा.नि.क्र.16/08/1999)   (शासन निर्णय बघण्याकरीता येथे क्लिक करा..)
  9. मेडीसीन लिस्ट मधील औषधांची कॅटेगीरी नमुद करुन देयक सादर करावे.
  10. अधिकारी / अंमलदार यांनी स्वतः उपचार घेतल्यास उपचार कालावधीतील रजा मंजुरी आदेश प्रत देयकाला जोडुन सादर करावे.
  11. रक्कम 5000/- वरील (पेक्षा जास्त) अदा रक्कमाकरीता मुद्रांकित पोच पावती (Revnue Stamp ) जोडुन देयक सादर करावे.
  12. वैद्यकीय देयकामधील मुळ अदा केलेली बिल पावती तसेच मेडीसीन बिल पावती वर Paid by me लिहुन अर्जदार यांनी स्वतः स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
  13. वैद्यकीय देयकासोबत जोडलेले छायांकीत प्रत (वेतनप्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/राशन कार्ड) यावर अर्जदार स्वतः स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
  14. आयकर परताव्याचे प्रमाणपत्रावर आहरण व संवितरण अधीकारी यांची स्वाक्षरी नमुद करावी.
  15. रुग्ण अंमलदारावर अवलंबुन असल्याबाबत सेवापुस्तकातील कुटुंबाचा तपशिल प्रत सादर करावा (निवृत्ती वेतन नियम 116 (14) (आई/वडील).
  16. रुग्ण अंमलदारावर अवलंबुन असल्याबाबत सेवापुस्तकातील कुटुंबाचा तपशिल प्रत सादर करावा. (निवृत्ती वेतन नियम 116 (14) महीला अर्जदार करीता (सासु /सासरे).
  17. अर्जदार यांची आई/वडील शासकीय / निमशासकीय वेतन /निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे? या बाबत प्रभारी अधीकारी यांचेकडुन पडताळणी करुन सदर प्रमाणपत्रावर प्रभारी अधीकारी यांची स्वाक्षरी नमुद करुन देयक सादर करावे.
  18. सेवापटाचे पहीले पान, दुसरे पान तसेच नामनिर्देशित पानाचे छायांकीत प्रत देयकाला जोडुन सादर करावे.

Leave a Comment