पोलिस स्टेशनला जप्त असलेल्या विशीष्ठ मुद्देमालाची विल्हेवाट लावणे बाबत कार्यपद्धती. (Procedure regarding disposal of impounded property (seized) to police station.)

गुन्हयांमध्ये हस्तगत केलेला व पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या मुद्देमालाची निर्गती कश्या प्रकारे करावी या बाबत मार्गदर्शन...

मुद्देमाल मोहरर ने गुन्हे समरी न्यायालयातून प्राप्त करावी.

(Moharar should obtain the Crime Judgement/Summary from the court.)

 • गुन्हे समरी/ गुन्हे निकाल प्राप्त करणे जप्त असलेला मुद्देमाल ज्या गुन्ह्यातील आहे, त्या गुन्ह्यांची निर्गती काय झालेली आहे?
 • निकाल लागला असल्यास मा. न्यायालयाने निकालपत्रात जप्त मालाबाबत काय निर्देश दिलेले आहेत? याबाबत माहिती प्राप्त करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

पोलिसांचे गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याचे व विल्हेवाट लावण्याचे अधिकार बाबत संशीप्त..

(Regarding the power of the police to seize and dispose of the property in crime)

 • पोलीसांना गुन्ह्यामधील व गुन्हयासंबंधीत वस्तू CRPC 102, प्रमाणे जप्त करण्याचे अधिकार आहेत…
 • गुन्हयातील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट CRPC 451, 457 प्रमाणे करण्याची तरतूद आहे. (गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल हा संबंधित गुन्ह्यांच्या निकालाच्या आदेशात दिल्याप्रमाणे विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.)
 •  सुनावणी (Under Trial) चालू असलेल्या गुन्ह्यासंदर्भात CRPC 457 प्रमाणे पध्दत वापरुन सदर गुणहयातील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाते.

मौल्यवान व किंमती मुद्देमालाची निर्गती (Valuable-Property/Items Disposal)

मौल्यवान व किंमती मुद्देमाल (Valuable-Property/Items)

A) सोन्याचांदीचे दागिने असलेला मुद्देमाल:- मुद्देमालात सोन्याचांदीचे दागिने असल्यास त्यांचे वजन व कॅरेटबाबत अधिकृत तपासणीदार / सराफांकडून तपासणी करुन घेऊन त्याचे प्रमाणपत्रासह माल सुरक्षित ठेवावा. गुन्ह्यातील जप्त मौल्यवान / किमती मुद्देमालाबाबत संबंधित न्यायालयाशी संपर्क साधून आदेश प्राप्त करुन घेऊन / गुन्ह्यातील फिर्यादीशी संपर्क साधून मुद्देमालाची निर्गती करावी.

B) घरफोडी, जबरी चोरी किंवा दरोड्यातील मौल्यवान मुद्देमाल:-  मौल्यवान / किंमती असा मुद्देमाल विनाकारण मुद्देमाल कक्षात ठेवणे योग्य नसून संबंधित न्यायालयाने CRPC 451 नुसार आदेश देणे आवश्यक आहे. असा मुद्देमाल जर घरफोडी, जबरी चोरी किंवा दरोड्यातील असेल तर तो फिर्यादीस द्यावा त्यासाठी –

 • मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करावा.
 • मुद्देमालाचे फोटो काढावेत.
 • मुद्देमाल ज्याच्या ताब्यात द्यावयाचा आहे. अशा इसमांकडून आवश्यक त्यावेळी किंवा कोर्ट सुनावणीच्यावेळी सादर करण्याची हमी देणारे बंधपत्र घ्यावे.
 • पुरव्याकमी काढलेले फोटोग्राफ्स संबंधित न्यायालयास पाठवावे.  न्यायालयाने पुराव्याकामी काढण्यात आलेल्या फोटोग्राफ्सची खात्री करावी. त्यात फिर्यादी, आरोपी तसेच ज्याच्या ताब्यात मुद्देमाल द्यावयाचा आहे, त्याची सही असणे आवश्यक आहे.
 • किंमती मुद्देमाल ताब्यात देणे योग्य परिस्थिती नसेल तर अशा वेळी असा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशाने पोलीस अधिकारी सविस्तर पंचनामा करुन बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकतो. (ही प्रक्रिया मुद्देमाल जप्त केल्यानंतर जास्तीत जास्त एक आठवड्यात करणे गरजेचे आहे.)

रोख रक्कम निर्गती (Disposal of Cash Amount)

रोख रक्कम निर्गती (Cash Amount)

रोख रक्कम :-

 • मौल्यवान / किमती मुद्देमालाचे निर्गतीसाठी वर दिलेल्या पध्दतीप्रमाणेच रोख रक्कमेची निर्गती करावी..
 • गुन्ह्यात जाप्त केलेला व पंचनाम्यात नंबर लिहिलेल्या नोटांच्या बाबतच्या रोख रकमा या वर्ष निहाय गुन्हे क्रमांक टाकून आणि सुरक्षित पॅकिंग करुन जतन करुन ठेवाव्यात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र दाखल झाले असल्यास सदरच्या रकमा न्यायालयात जमा कराव्यात. त्याबाबत मा. न्यायालयाशी पत्रव्यवहार करावा,

बेवारस जप्त मुद्देमाल निर्गती.

बेवारस जप्त मुद्देमाल निर्गती.

Disposal of unclaimed confiscated / seized property.

 • बेवारस स्थितीत सापडलेला मुद्देमाल महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 82 प्रमाणे जप्त करण्याचे अधिकार आहेत.
 • जो बेवारस मुद्देमाल जप्त केला आहे, त्याची विल्हेवाट महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 84 व 85 अन्वये करण्याची तरतूद आहे..
 • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 प्रमाणे बेवारस मालमत्तेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत उद्घोषणा (Proclamation) काढून त्यात मालमत्तेचे वर्णन तसेच उद्घोषणा पत्राचा कालावधी निश्चित करतील.
 • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 83 प्रमाणे मालक हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 प्रमाणे केलेल्या उद्घोषणेप्रमाणे मिळून आल्यास आणि त्याने मालमत्तेचा मालकी हक्क सिध्द केल्यास मालमत्ता ‘अशा मालकाच्या ताब्यात देणे.
 • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 87 प्रमाणे मालक हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 प्रमाणे केलेल्या उद्घोषणेप्रमाणे मिळून न आल्यास तो मालमत्ता सरकार जमा करुन पोलीस अधीक्षकांचे आदेशाप्रमाणे लिलावाद्वारे विक्रीस काढली जाते.
 • बेवारस मालाबाबत उपरोक्त कार्यपध्दती अवलंबून निर्गती करावी.

दारु सारखे पदार्थ / नशाबंदी मुद्देमाल निर्गती बाबत.

1,000/- रू. पर्यंत च्या दारूबंदी चा मुद्देमालाचे निर्गती बाबत.

Regarding Disposal of prohibition goods/ liquor up to 1,000/- Rupees.

 • शासन परिपत्रक, गृह मंत्रालय, क्र.म.शा./परिपत्रक/ईएसटी/2369/4946/पीआरओ-3, दि.11.08.1980 चे अवलोकन करुन त्यानुसार दारुबंदीच्या गुन्ह्यात 1,000/- रु. पर्यंतच्या जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्याबाबत पोलीस उप अधीक्षकांना अधिकार देण्यात आले आहेत.
 • सदरचे परिपत्रक समजून घेवून, त्यातील तरतुदींनुसार दारुबंदी च्या गुन्ह्यातील जप्त मालाची विल्हेवाट / निर्गती करावी.

किंमत 1000 रू. पेक्षा जास्त रुपयाच्या दारूबंदी चा मुद्देमाल चे निर्गती बाबत.

Regarding Disposal of prohibition goods/ liquor more than 1,000/- rupees.

 • दारूबंदी च्या 1,000/- रू. किंमती पर्यंत चा मुद्देमाल उप विभागीय पोलिस अधिकारी यांचे आदेशाने नष्ट केला जाती तर त्या पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल नष्ट करणे करिता सर्वोच्य न्यायालयाचे खालील मार्गदर्शन चा आधार घेवून कार्यवाही करावी.

सुंदरभाई अंबालाल देसाई विरुध्द गुजरात राज्य (ए.आय. आर. 2003 एससी 638) (या न्यायनिर्णय मध्ये केलेल्या मार्गदर्शन अनुसार खालीलप्रमाणे कारवाई करावी.)

 • मुद्देमाला चा सविस्तर पंचनामा करावा.
 • आवश्यक ते नमुने घेऊन रासायनिक तज्ञांकडे पाठवून द्यावे.
 • मा. न्यायदंडाधिकारी यांचे आदेश घेऊन मोठ्या प्रमाणावरील जप्त दारुची मा. न्याय दंडाधिकारी च्या आदेशा प्रमाणे विल्हेवाट लावावी.

जिवनावश्यक वस्तु कायद्याखाली जप्त मुद्देमालाचे निर्गती बाबत.

जिवनावश्यक वस्तु कायद्याखाली जप्त मुद्देमालाचे निर्गती बाबत.

Regarding Disposal of goods / seized under the Essential Commodities Act.

 • पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तु कायद्या खालील गुन्ह्यात ज्वलनशील अथवा इतर वस्तु जप्त असल्यास त्याची निर्गती करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांचेशी पत्रव्यवहार करुन जप्त मालाची निर्गती करण्याबाबत आदेश प्राप्त करुन घ्यावेत.
 • तसेच गॅस सिलेंडर जप्त असल्यास सिलेंडर मधील गॅस ज्या कंपनीचा आहे, त्या संबंधित कंपनीशी संपर्क साधावा. न्यायालयाचे परवानगीने सदर मुद्देमाल, संबंधित गॅस कंपनीकडे ठेवून घेणे बाबत पत्रव्यवहार करावा.
 • पोलीस ठाण्यात जप्त असलेले स्फोटके / ज्वलनशील पदार्थ नाश करण्यासाठी न्यायालयाशी तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन आदेश प्राप्त करून निर्गती करावी.

अकस्मात मृत्युचे चौकशीत जप्त मुद्देमालाचे निर्गती बाबत.

अकस्मात मृत्युचे चौकशीत जप्त मुद्देमालाचे निर्गती बाबत.

Regarding Disposal of goods / seized under the Accidental Death Inquiry.

 • अकस्मात मृत्यु दाखल प्रकरणांमध्ये जप्त / ताब्यात घेण्यात आलेल्या मुद्देमाला संबंधी अखेर समरी अहवालातील उपविभाग दंडाधिकारी / विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेश / निर्देशाप्रमाणे कारवाई करावी.
 • अकस्मात मृत्यु प्रकरणात संबंधित कार्यालयाकडून  समऱ्या मंजूर झालेल्या असतात. अश्या मंजूर समारी प्राप्त करून घ्याव्यात. 
 • अश्या प्राप्त समारींची पोलीस ठाण्यात प्राप्त समरी रजिस्टर ला नोंद घ्यावी.
 • प्राप्त समरीतील अकस्मात मृत्यूच्या चौकशीत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा आढावा घेऊन, त्यात जप्त मालासंबंधी काय निर्देश आहेत. याची खात्री करुन त्याप्रमाणे तात्काळ निर्गती करावी.

एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985, मधील जप्त अंमली पदार्थ नाश करण्याची कार्यपध्दती.

एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५, मधील जप्त अंमली पदार्थ नाश करण्याची कार्यपध्दती.

Regarding Disposal of narcotics goods / seized under NDPS Act 1983.

 • एन.डी.पी.एस.ॲक्ट 1985 अन्वये दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तसेच न्यायालयातून निकाल लागलेला व न्यायालयाने मंजुरी दिलेला जप्त अंमली पदार्थ नाश करण्यासाठी केंद्र शासनाच्या दि. 16.01.2015 च्या अधिसुचने नुसार तसेच भारत सरकार यांचेकडील स्थायी आदेश क्र. 01/89, दि. 13.06.1989 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या सुचनातील तरतुदीनुसार अंमली पदार्थ आपले जिल्हास्तरावर गठीत केलेल्या नाश समिती मार्फत नाश करण्यात यावा.
 • मुद्देमाल नाश केले बाबतचा अहवाल संचालक, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, नवी दिल्ली यांना सादर करावा.
 • सदर मुद्देमाल नाश अहवालाची प्रत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास पाठवावी.

Leave a Comment