दुखापतीच्या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा..

दुखापतीच्या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा..

How to write a crime scene panchnama in offence of bodily injury?

दुखापतीच्या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा कसा करावा?

 • तपासी अंमलदार ने त्वरीत घटनास्थळावर भेट द्यावी.) (घटनास्थळावर उशीरा भेट दिल्यास महत्वाचे पुरावे नष्ट होवु शकतात.)
 • घटनास्थळावर पंचनामा करणे कामी दोन प्रतिष्ठीत पंच बोलवावे. (पंचांना समन्स/सुचनापत्र द्यावे)
 • पंचनामा तयार करतांना घेतलेले पंच प्रथमच पंच म्हणून कामकरीत आहेत याची खात्री करावी.
 • पंचनाम्यासाठी घेतलेले पंच आरोपी फिर्यादी यांचे नातेवाईक आहेत किंवा कसे या बाबत शाहनिशा करुन खात्री करावी.
 • घटनास्थळाचा पंचनामा करतांना पंचांना गुन्ह्याची हकीगत समजावून सांगावी. तसे  त्यांना देण्यात येनाऱ्या सुचनापत्रात लिहावे.
 • पंचांना हकीगत सांगीतले बाबत पंचनाम्यात सुध्दा नमुद करावे.
 • घटनास्थळाचा पंचनामा लिहीतांना त्यातील सर्व रकाने भरावे, तसेच घटनास्थळाचा स्केच स्वतः तपासी अंमलदार ने काढावा.
 • घटनास्थळावरील पंचनामा करताना घटनास्थळावरील एखादी ईमारत/ झाड/ स्थावर/अचल वस्तु केंद्रस्थानी ठेवून त्या अनुशंगाने घटनास्थळ निश्चित केले जावे. (चल वस्तु अथवा जंगम वस्तु चे अनुशंगाने घटनास्थळ निश्चित केल्यास, चल वस्तु हलविल्यावर, न्यायालयात साक्षपेशी दरम्यान, घटनास्थळाची जागा निश्चितपणे सांगता येनार नाही.)
 • दुखापत हत्याराने झाली असल्यास व घटनास्थळावर हत्यार पडलेले दिसत असल्यास, घटनास्थळावरून गुन्हयाचे अनुशंगाने हत्यार व संशयीत वस्तू जप्त करावी.
 • घटनास्थळावरील कुठलीही वस्तु पुराव्याच्या दृष्टीने कमी महत्वाची आहे असे मनुन घेवु नये. (घटनास्थळावरील सर्व वस्तुंत पुराव्याचे दृष्टीने उपयुक्तता शोधावी.)
 • “ज्या बाबी जेथे असायला पाहीजेत त्या तिथे नाहीत व ज्या बाबी जेथे नसायला पाहीजेत त्या तिथे आहेत.” अशा सर्व वस्तु/बाबींना संक्षयाचे दृष्टीने बघावे.
 • घटनास्थळावरील हत्यार/ संक्षयीत वस्तु हे निश्चित केलेल्या अचल वस्तूपासुन नेमके किती अंतरावर पडले आहे याची निश्चित मोजमाप करु ते घटनास्थलाचे पंचनाम्यात लिहावे. (अंतर मिटर, फुट, इंच या मापकात लिहावे. मोजुन लिहील्या जानाऱ्या आकड्या समोर अंदाजे लिहु नये.)
 • घटनास्थळावर मिळालेल्या वस्तूचे पॅकिंग लेबलींग/ सिलींग घटनास्थळाचे जागेवरच केले जावे. तसे घटनास्थळ पंचनाम्यावर नमुद करावे.
 • घटनास्थळ पंचनामा तयार करतांना फार मोठ्या प्रमानात पुराव्याच्या दृष्टीने उपयुक्त वस्तु मिळुन आल्यास, त्या घटनास्थळ पंचनाम्यात त्याचे पुर्ण वर्णनासह लिहीने श्यक्य नसल्यास त्या वस्तुंचा पंचनाम्यात उल्लेख करुन त्याचा वेगळा जप्ती पंचनामा तयार करण्यात येतो असे घटनास्थळ पंचनाम्यात नमुद करावे व  त्या वस्तुंचा वेगळा जप्ती पंचनामा तयार करावा. (असा जप्ती पंचनामा घटनास्थळ पंचनाम्याचे नंतर लगेच करावा.)
 • घटनास्थळावरील वस्तु, हत्यार, कपडे व इतर पुरावे सदृश्य वस्तू हाताळतांना हॅण्डग्लोजचा वापर करावा.
 • घटनास्थळावर संक्षयात वस्तु मिळुन आल्यास व ते आरोपींचीच असल्याची खात्री झाल्यास श्वानपथक ला पाचारण करावे.
 • घटनास्थळावर बोटाचे संक्षयीत ठसे मिळुन आल्यास ठसे तज्ञांना पाचारण करावे.
 • पंचनामा कशाच्या प्रकाशात केला त्याचा उल्लेख पंचनाम्यात करावा.
 • घटनास्थळ पंचनाम्यावर तपासी अंमलदार ने स्वताः सही करुन, घटनास्थळावरच पंचाच्या सहया घ्याव्या.
 • घटनास्थळ पंचनाम्यावर  पंचनामा सुरू केल्याचा व संपविल्याचा दिनांक वेळ नमुद करावा.
 • घटनास्थळाचे अक्षंश/रेखांश काढावे व घटनास्थळ पंचनाम्यात नमुद करावे.
 • घटनास्थळ पंचनामा करतांना, आवश्यकता नुसार फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करावी.
 • फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी जतन केलेल्या मेमोरी कार्टची हॅश व्हॅल्यु काढावी. (हॅश व्हॅल्यु काढतांना त्याचा पंचनामा करावा.)
 • व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीकडून भारतीय पुरावा कायदा 65(ब) प्रमाणे प्रमानपत्र घ्यावे.
 • फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करणारे कर्मचारी यांचे (बयान) तपास टिपण घ्यावे.

शाररीक दुखापतीच्या गुन्ह्यात बरेचदा आरोपी अटक पंचनामा व 27 भा.पु.का. प्रमाणे मेमोरंडम पंचनामा सुध्दा केला जातो.