हा पोलीस कर्मचारी असुन त्याची नेमनुक संबंधित पोलीस स्टेशनला असते.
संबंधित पोलीस स्टेशन ज्या JMFC न्यायालयाच्या अधीन असते त्या ठिकाणी तो कामकाज पाहतो.
कोर्ट ड्युटी कर्मचारी हा JMFC कोर्टात सादर करावयाचे PCR/MCR चे रिमांड रिपोर्ट, इतर तपासाचे कागदपत्र, पोलीस स्टेशन ला दाखल झालेल्या गुन्ह्याची पहिली खबर (Court FIR Copy) नियमितपणे घेवून जातो व JMFC कोर्ट मध्ये दाखल करीत असतो.
बजावलेले समन्स, व न बजावलेले समन्स, वॉरंट JMFC कोर्टात दाखल करीत असतो, परत निघालेले वारंट/समन्स ताब्यात घेवुन समन्स वारंट कर्मचारीस तामील करणे कामी देत असतो.
संबंधित JMFC कोर्टातुन मिळालेले समन्स, वॉरंट, नोटीसा तपास / चौकशीकामी मिळालेले प्रकरणे आणून प्रभारी अधिकाऱ्याकडे सादर करीत असतो.
JMFC कोर्टात JMFC कोर्ट ने मागीतलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल दाखल करणे, कोर्टाच्या निकालानंतर मुद्देमाल निर्गतीबाबतचे आदेश घेवुन संबाधित प्रभारी अधिकाऱ्याकडे सादर करतो. त्याचा लेखा-जोखा ठेवतो.
पोलीस स्टेशन चे गुन्ह्यातील, कोर्टातील चालु केसेसचा निकाल लागल्यानंतर परिशिष्ठ “ई” फॉर्म भरून त्यावर कोर्टाची स्वाक्षरी घेऊन पोलीस स्टेशनला आणुन दाखल करतो.
शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या बोटाचे ठसे (कन्व्हेक्शन स्लिप) घेण्याचे काम देखील कोर्ट ड्युटी कर्मचारी करतो.