गुन्हा दाखल ते न्यायनिर्णय टप्पे

गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे..

गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे..

  • गुन्हा दाखल करणे:- एखादा गुन्हा घडल्यावर फिर्यादी/तक्रारदार पोलीस स्टेशनला येतो व त्याची दखलपात्र तक्रार कळवितो. त्याची फिर्याद ऐकुन घेवुन, ठानेदार किंवा त्याचेवतीने स्टेशन डायरी अंमलदार ती तक्रार लेखी स्वरुपात लिहुन घेतो किंवा संगनकावर टाईप करतो. सदर तक्रार तपास कामी पोलीस स्टेशन च्या संबंधीत रजीस्टर मध्ये किंवा संगनकावर (CCTNS प्रनालीमध्ये ) त्याची नोंद करून घेतो. व त्याची एक प्रत पोलीस स्टेशन चे संगनकीय किंवा हस्तलिखीत स्वरूपात, सत्यप्रत (OC-Original Content) फिर्यादीस देतो. { त्या प्रतीवर इंग्रजीत, First Information Report (Under Section 154 Cr.P.C.) व देवनागरी लिपीत, प्रथम खबर अहवाल (कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहीता) असे लिहीलेले असते. } व त्यावर फिर्यादीची सही घेतो. ही सर्व कार्यवाही झाल्यास फिर्याद दाखल झाली असे समजावे. तसेच ज्या वेळेस फिर्यादी अदखलपात्र गुन्हा नोंदवितो त्या वेळेस मिळनाऱ्या सत्यप्रतीवर, इंग्रजीत, N.C.R. (Under Section 155Cr.P.C.) व देवनागरी लिपीत, एन.सी.आर. (कलम १५५ द.प्र.सं.) असे लिहीलेले असते. दाखल अधिकारींने घडलेल्या हकिगत प्रमाणे त्या त्या कायद्याचे कलमे फिर्यादीवर नोंद करावी. बरेचदा गुन्हा दाखल करतांना द्विभाषीकाचा वापर करावा लागतो त्या वेळेस फिर्यादीवर द्विभाषीकाची सुध्दा सही घ्यावी.
  • केस डायरी :- ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो तेव्हा गुन्ह्याची पहीली केस डायरी ही दाखल अधिकारी लिहीत असतो. व तो गुन्हा प्रभारी अधिकारी चे अदेशान्वये ज्या तपाशी अधिकाऱ्याकडे दिला त्याचे नावे, पुढील तपास कामी गुन्हा … यांना दिला असा शेरा लिहुन, दाखल अधिकारी त्या खाली स्वतःची सही करतो. गुन्ह्याच्या तपासातील प्रगती प्रमाणे पुढील उर्वरीत, केस डायऱ्या संबंधित तपासी अंमलदार लिहीत असतात. ज्या वेळेस गुन्हा एका तपासी अधिकाऱ्याकडुन दुसऱ्या तपाशी अंमलदाराकडे वर्ग केला जातो. ( म्हणजे उर्वरीत तपासा करीता दुसरा तपाशी अधिकारी नेमला जातो.) तेव्हा चालु प्रभारी अधिकारी ( पुढील तपास कामी प्रभारी अधिकारींचे आदेशान्वये संबंधीत गुन्हा …. यांना दिला असा शेरा लिहुन पुर्ण तपास डायरी पुढील तपाशी अंमलदारांचे ताब्यात देतो. पुढील तपास कामी गुन्ह्याची तपास डायरी घेनारा अधिकारी सुध्दा सदर तपास डायरी पुढील तपास कामी ताब्यात मिळाली असा शेरा लिहुन खाली सही करतो. ) गुन्ह्याच्या तपासाच्या डायऱ्या रोजच्या रोज लिहाव्या. या लिहीलेल्या तपास डायऱ्या रोजच्या रोज वरिषठ अधिकारी कडे पाठवाव्या. पोलीस मॅनुअल भाग – 3, नियम 225(2) प्रमाने झालेल्या तपासाप्रमाणे लिहीलेल्या केस डायऱ्या रोजच्या रोज पाठविने बंधनकारक आहे.
  • तपास :- या संकेतस्थळावर उहापोह केल्या प्रमाणे गुन्ह्याचा तपासी अधिकारी तपास करतो. सर्वप्रथम फिर्यादीस बोलावुन फिर्याद परत ऐकुन/समजुन घ्यावी. तक्रारदारास परत काही सांगायचे असल्यास ऐकुन घ्यावे. (तक्रारदारास परत विचारपुस करण्याचा उद्देश हा गुन्ह्यात पुराव्याच्या बाबी शोधने हा असावा.) एखादी नविन बाब तक्रारदार सांगत असेल तर पुरवनी बयानात लिहुन घ्यावे. फिर्यादी सोबत घटनास्थळावर जावे. जातांना सोबत दोन अब्रुदार पंच घ्यावेत, फोटोग्राफर घ्यावा. त्या ठिकानचा घटनास्थळ पंचनामा करावा. आरोपी चे नाव निष्पन्न असेल. त्याचा शोध घेवुन त्यास आवश्यकतेनुसार अटक करावी. आरोपीचे नातेवाईकांस कळवावे.  गुन्हा जामिनपात्र असेल तर जामीन करावा. ( सध्याच्या प्रचलीत निर्णया प्रमाणे गुन्ह्यातील शिक्षा ही 7 वर्षाचे खाली असेल व गुन्ह्याचे पुढील तपासात आरोपीची आवश्यकता नसेल तर गुन्ह्यात आरोपीस अटक करु नये. त्यास वेळोवेळी गरजे प्रमाणे हजर राहण्याचे, सुचनापत्र घ्यावे.) गुन्हा माला विरुध्द घडलेला असेल तर सदर माल आरोपी कडुन हस्तगत करावा. माल मिळत नसेल तर माहीतीगार संभावित आरोपीच्या झडत्या घ्याव्यात. झडतीचे पंचनामे करावेत. स्थानिक गुन्हे शाखे ला ई फार्म भरुन पाठवावे. त्यांचे कडुन सजेशन प्रप्त करुन सुचनेप्रमाणे त्या आरोपींच्या घरझडत्या घ्याव्यात.
  • दोषारोपपत्र:- गुन्ह्याचे पुर्ण तपासाअंती, तपासी अधिकारीस तपासलेल्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग दिसत असेल तर त्या-त्या आरोपींचे नावे दोषारोप लिहीतो व संबंधित न्यायालयात संपरीक्षेसाठी  पाठवितो. ज्या आरोपीचा गुन्ह्यात काहीही सहभाग नाही असे दिसत असेल, त्यांना CrPC चे कलम 169 अन्वये त्यास जमानत घेऊन सोडून दिले जाते.

Leave a Comment